क्योरफूड्स इंडिया लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

 

क्योरफूड्स इंडिया लिमिटेडने सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

क्योरफूड्स इंडिया लिमिटेड ही ग्राहक पसंती आणि आहार गरजांना पूरक अशा व्यापक खाद्यपदार्थांची सेवा पुरविणारी इंटरनेट आधारित मल्टी-ब्रँड फूड सर्व्हिसेस कंपनी आहे. कंपनीने आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्याकडे दाखल केले आहे. 31 मार्च 2025 पर्यंतच्या स्थितीनुसार, क्योरफूड्स ही आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ऑपरेशन्समधून मिळालेल्या महसुलाच्या आधारे (फूड डिलिव्हरी मार्केटप्लेस वगळून) भारतातील दुसऱ्या क्रमांकाची डिजिटल-फर्स्ट फूड सर्व्हिसेस कंपनी आहे.

ही ऑफर ₹1 दर्शनी मूल्याच्या नवीन शेअर्सच्या इश्यूमधून एकूण ₹8,000.00 मिलियन इतकी रक्कम उभारणाऱ्या नवीन इश्यूचा आणि 48,537,599 इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश करते. या ऑफर फॉर सेलमध्ये आयर्न पिलर पीसीसी (आयर्न पिलर पीसीसीसेल सी आणि सेल यांच्या वतीने) कडून 19,088,670 शेअर्स, क्रिमसन विंटर लिमिटेडकडून 9,759,660 शेअर्स, ॅक्सेल इंडिया व्ही (मॉरिशस) लिमिटेड कडून 4,575,330 शेअर्स, चिराटे व्हेंचर्स इंडिया फंड फोरकडून 3,666,020 शेअर्स, ग्लोबल -कॉमर्स कॉन्सॉलिडेशन फंड एल.पी. कडून 3,524,213 शेअर्स, चिराटे व्हेंचर्स मास्टर फंड फोर कडून 2,790,619 शेअर्स, अल्टेरिया कॅपिटल फंड टूस्कीम वन कडून 1,431,150 शेअर्स, क्योरफिट हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कडून 1,281,510 शेअर्स, श्रीपाद श्रीकृष्ण नाडकर्णीकडून 1,154,490 शेअर्स, होरायझन टेक्नो प्रायव्हेट लिमिटेडकडून 930,900 शेअर्स आणि झेफायर पीकॉक इंडिया ग्रोथ फंडकडून 335,037 शेअर्सचा समावेश आहे; हे सर्व विक्री करणारे भागधारक (सेलिंग शेअरहोल्डर्स) म्हणून ओळखले जातात.

कंपनी आयपीओमधून मिळणाऱ्या ₹152.54 कोटींच्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग प्रामुख्याने विस्तार आणि उपकरणांच्या खरेदीसाठी करणार आहे. यामध्ये ₹126.32 कोटींचा वापर नवीन क्रिस्पी क्रिम क्लाउड किचन्स, रेस्टॉरंट्स, किऑस्क्स आणि सेंट्रल किचन्स स्थापन करण्यासाठी केला जाणार आहे; ₹19.91 कोटी निवडक विद्यमान क्लाउड किचन्समध्ये नव्या ब्रँड्सचा समावेश करून, त्यांचा विस्तार करण्यासाठी वापरले जातील आणि ₹6.31 कोटी यंत्रसामग्री, उपकरणे खरेदी, तसेच धोरणात्मक उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहेत.

31 मार्च 2025 पर्यंत, क्योरफूड्सचा भारतातील 70 पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि गावांमध्ये एकूण 502 ठिकाणी सेवा पुरवत होती. त्यात ऑफलाइन नेटवर्कमध्ये पाच सेंट्रल किचन्स, 281 क्लाउड किचन्स, 99 किऑस्क्स, 122 रेस्टॉरंट्स आणि 13 वेअरहाउसेस यांचा समावेश आहे, जे उच्च पादचारी क्षेत्रांमध्ये धोरणात्मकदृष्ट्या स्थित आहेत, जेणेकरून प्रवेश सुलभता वाढविता येईल.

कंपनीची ऑनलाइन पोहोच स्विगी लिमिटेड आणि एटरनल लिमिटेड (पूर्वी झोमॅटो लिमिटेड, ज्यात झोमॅटो समाविष्ट आहे) सारख्या आघाडीच्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसह मजबूत एकात्मिकतेवर आधारित आहे, तसेच तिच्या स्वतःच्या वेबसाइटवरून सहज ऑर्डरिंग आणि पेमेंटच्या पर्यायांची सेवा उपलब्ध आहे. कंपनीच्या पुरवठा साखळीच्या आधारावर 13 समर्पित वेअरहाउसेस ऑपरेशनल हबजवळ स्थित असून, यामुळे संसाधन व्यवस्थापन वेळेवर घटकांची डिलिव्हरी सुनिश्चित केली जाते.


Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202