ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स लिमिटेड ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री
ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स लिमिटेड
ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग
विक्री (आयपीओ)
गुरुवार, 24 जुलै 2025 रोजी होणार सुरू
·
प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरसाठी किंमत पट्टा 85 रु. ते 90 रु.
इतका निश्चित
·
बोली / इश्यू सुरू होण्याचा दिनांक – गुरुवार, 24 जुलै 2025 आणि बोली / इश्यू समाप्त होण्याचा दिनांक – सोमवार, 28 जुलै 2025
·
प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – बोली/इश्यू सुरू होण्याच्या एक कार्यदिवस
आधी, म्हणजे बुधवार, 23 जुलै 2025
·
किमान 166 इक्विटी शेअर्ससाठी आणि
त्यानंतर 166 च्या पटीत बोली लावता
येईल
· कर्मचारी आरक्षित कोट्यात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी प्रति इक्विटी शेअर 3 रु. इतकी सवलत दिली जाईल
ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स लिमिटेड (“कंपनी”) गुरुवार, 24
जुलै 2025
रोजी आपल्या प्राथमिक समभाग
विक्रीच्या (आयपीओ) अनुषंगाने बोली /इश्यू सुरू करणार आहे. प्रमुख
गुंतवणूकदार बोली दिनांक – बोली/इश्यू सुरू होण्याच्या एक कार्यदिवस आधी, म्हणजे बुधवार, 23 जुलै 2025 आहे.
बोली / इश्यू समाप्त होण्याचा दिनांक – सोमवार, 28 जुलै 2025 आहे.
या इश्यूमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू असून त्यांचे एकूण मूल्य 759.60 कोटी रु. इतके आहे.
इश्यूचा किंमत पट्टा 85 रु. ते 90 रु. प्रति इक्विटी शेअर इतका निश्चित करण्यात आला आहे.
या इश्यूमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी 75.96 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे आरक्षण करण्यात आले आहे (“कर्मचारी आरक्षित हिस्सा”). पात्र कर्मचाऱ्यांना या कोट्यात प्रति शेअर 3 रु. ची सवलत दिली जाणार आहे (“कर्मचारी आरक्षण हिस्सा सवलत”).
तसेच, BEL शेअरहोल्डर्ससाठी 303.84 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी
शेअर्सचे प्रमाणानुसार आरक्षण असेल (“BEL समभागधारक आरक्षण हिस्सा”). कर्मचारी आरक्षण कोटा
आणि BEL शेअरहोल्डर्स आरक्षण
कोटा वगळून उरलेला इश्यू भाग “Net Issue” म्हणून ओळखला जाईल.
[बोली किमान 166 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 166 च्या पटीत लावता येईल (“Bid
Lot”).] यामधून मिळणारी रक्कम कंपनी आणि तिच्या मटेरियल सबसिडियरी SRP प्रॉस्पेरिटा हॉटेल व्हेंचर्स
लिमिटेड यांनी घेतलेल्या काही
कर्जाचे पूर्णतः किंवा अंशतः आगाऊ भरणा/परतफेड करण्यासाठी, एकूण 4681.4
दशलक्ष रु. इतकी रक्कम वापरण्यात येणार आहे. यामध्ये कंपनीने
घेतलेले 4136.9 दशलक्ष रु. आणि मटेरियल सबसिडियरीने घेतलेले 544.5
दशलक्ष रु. यांचा समावेश आहे.
प्रमोटर BEL कडून जमीन खरेदीसाठी विचाराधीन रक्कम 1075.2 दशलक्ष रु. भरण्यासाठी अशा अजून न ठरलेल्या अधिग्रहणांद्वारे इनऑर्गॅनिक वाढ, इतर धोरणात्मक उपक्रम व सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी या आयपीओ मधून मिळणारी रक्कम वापरली जाणार आहे.
ही ऑफर SCRR च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित 2018 नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 75% पेक्षा कमी नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील.
Comments
Post a Comment