नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचा ४,८०० कोटी रुपयांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी उघडणार
नॉलेज रिअॅल्टी ट्रस्टचा ४,८०० कोटी रुपयांचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी उघडणार
·
किंमतपट्टा ९५ रु. ते १०० रु. प्रति युनिट असा निश्चित
·
बोली/इश्यू उघडण्याची तारीख - मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख - गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५
·
अँकर तारीख - अँकर गुंतवणूकदार बोलीची तारीख बोली/ऑफर उघडण्याच्या तारखेच्या एक कामकाजाच्या दिवसापूर्वी, सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी आहे.
·
किमान बोलीचा आकार रु. १५,००० आहे, जो किमान गुंतवणूक रक्कम आहे. अँकर इन्व्हेस्टर्स आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स व्यतिरिक्त इतर बोलीदारांकडून किमान १५० युनिट्ससाठी आणि त्यानंतर १५० युनिट्सच्या पटीत बोली लावता येतात.
नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट (REIT), भारतातील सर्वात मोठी रीट (REIT), ग्रॉस अॅसेट व्हॅल्यू (जीएव्ही) आणि लिस्टिंगवर सर्वात भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण कार्यालय असलेले रीट (REIT) यांनी इश्यूसाठी किंमतपट्टा ९५ रु. ते १०० रु. प्रति युनिट निश्चित केला आहे.
बोली/इश्यू मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी उघडेल आणि गुरुवार, ०७ ऑगस्ट २०२५ रोजी बंद होईल. किमान बोलीचा आकार रु. १५,००० आहे, जो किमान गुंतवणूक रक्कम आहे. अँकर इन्व्हेस्टर्स आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स व्यतिरिक्त इतर बोलीदारांकडून किमान १५० युनिट्ससाठी आणि त्यानंतर १५० युनिट्सच्या पटीत बोली लावता येतात.
यामध्ये नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट (इश्यू) द्वारे रु. ४,८०० कोटीपर्यंतच्या युनिट्सचे नवीन जारी करणे समाविष्ट आहे. हा इश्यू बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) रेग्युलेशन्स, २०१४ (REIT रेग्युलेशन्स) आणि ११ जुलै २०२५ च्या ‘रीट’ मास्टर सर्क्युलरच्या नियमांचे पालन करुन केला जात आहे, ज्यामध्ये इश्यूचा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भाग (स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर भाग वगळून) रीट रेग्युलेशन्सनुसार, संस्थात्मक गुंतवणूकदारांना प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल आणि इश्यूचा किमान २५ टक्के (स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर भाग वगळून) बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटपासाठी उपलब्ध असेल.
REIT (रीट)चे प्रायोजक सत्त्व डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि BREP एशिया एसजी एल अँड टी होल्डिंग (NQ) प्रा. लि. (ब्लॅकस्टोन फंड्सची पोर्टफोलिओ कंपनी) आहेत. अॅक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेस लिमिटेड हे ट्रस्टी आहे आणि नॉलेज रिअल्टी ऑफिस मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी ट्रिनिटी ऑफिस मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) हे REIT (रीट)चे व्यवस्थापक आहेत.
सत्त्व ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक बिजय अगरवाल म्हणाले: “तीस वर्षांपूर्वी, आम्ही सत्त्व सुरू केले, असा विश्वास होता की भारत जागतिक दर्जाच्या ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चरला पात्र आहे. नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट ही त्या दृष्टिकोनाची परिणती आहे. ब्लॅकस्टोनसोबतची आमची भागीदारी परिवर्तनकारी ठरली आहे - केवळ प्रमाणातच नाही तर योग्य सहकार्य खरोखरच अपवादात्मक काहीतरी निर्माण करू शकते आणि सर्व गुंतवणूकदारांसाठी प्रीमियम ऑफिस रिअॅस्टेट सुलभ बनवते हे दाखवून देते.
ब्लॅकस्टोन रिअॅल्टी इस्टेटचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आशीष मोहता म्हणाले, आमचा दीर्घकालीन भागीदार सत्त्वसोबत नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट सुरू करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ब्लॅकस्टोन २०११ मध्ये सुरुवात करून या क्षेत्रात सुरुवातीचा विश्वास ठेवणारा होता आणि तेव्हापासून तो भारतातील सर्वात मोठा ऑफिस मालक बनला आहे. नॉलेज रिअॅल्टी ट्रस्ट हे भारतीय ऑफिस मार्केटमधील आमच्या दृढ विश्वासाचे आणि गुंतवणूकदारांना आकर्षक संधी उपलब्ध करून देण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
नोलेज रिअॅल्टी ट्रस्ट ही जीएव्ही* आणि एनओआय* च्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी REIT (रीट) असेल अशी अपेक्षा आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत, पोर्टफोलिओमध्ये ४६.३ एमएसएफ क्षेत्रफळ असलेल्या २९ ग्रेड ए ऑफिस प्रॉपर्टीजचा समावेश आहे, ज्यामध्ये ३७.१ एमएसएफ पूर्ण झालेले क्षेत्रफळ आणि ९.२ एमएसएफ बांधकामाधीन आणि भविष्यातील विकास क्षेत्र आहे. मालमत्ता धोरणात्मकदृष्ट्या सहा शहरांमध्ये (हैदराबाद, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, गुरुग्राम आणि अहमदाबादमधील गिफ्ट सिटी) स्थित आहेत आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक क्षमता केंद्रे आणि आघाडीच्या देशांतर्गत कंपन्यांचा समावेश असलेल्या विविध भाडेकरू रोस्टरला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत.
Comments
Post a Comment