मेडिमिक्स आयुर्वेदिकने अतिस्थानिक वाढ आणि सांस्कृतिक गूंज यांना पाठबळ देण्यासाठी मिस अमृता खानविलकर सोबत काम करण्यास केली सुरुवात

 मेडिमिक्स आयुर्वेदिकने अतिस्थानिक वाढ आणि सांस्कृतिक गूंज यांना पाठबळ देण्यासाठी मिस अमृता खानविलकर सोबत काम करण्यास  केली सुरुवात

मेडिमिक्स एक वारसा असलेला आयुर्वेदिक स्किनकेअर ब्रँड असून प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री, अमृता खानविलकर, सोबत आपल्या प्रादेशिक आणि सांस्कृतिक नात्याला बळकटी देत आहे.


मुंबई, भारत | 15.07.2025- मेडिमिक्स भारतातील एक अग्रगण्य आयुर्वेदिक पर्सनल केअर ब्रँड असून आपला मुख्य भौगोलिक क्षेत्रांमधील प्रादेशिक नाते बळकट करण्यासाठी आपली खेळी बदलताना अमृता खानविलकर आपली नवीन ब्रँड ॲम्बेसेडर असेल, असे अभिमानाने जाहीर करत आहे.

अमृता ही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती, तिचे अष्टपैलुत्व, अभिजात लावण्य आणि सखोल सांस्कृतिक मुळ, यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. रिॲलिटी शो मधील स्पर्धक ते प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील सर्वात परिचित चेहऱ्यांपैकी एक, असा तिने प्रेरणादायी प्रवास केलेला आहे. मेडिमिक्सचे स्वतःचे तत्त्वज्ञान म्हणजे, काळानुसार विकसित होत असताना नैसर्गिक क्षमता वाढवणे आणि परंपरेचे स्वागत करणे आहे. अमृताचा प्रेरणादायी प्रवास मेडिमिक्सचे तत्त्वज्ञान दर्शवित आहे.

मेडिमिक्सकडे पाच दशकांहून अधिक काळाचा वारसा असून परंपरेतील ज्ञान आणि आजच्या ग्राहकांच्या गरजा यांचे एकत्रीकरण करणाऱ्या काळानुसार सिद्ध झालेल्या आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्ससाठी मेडिमिक्सवर लाखो लोकं विश्वास करत आहेत. ब्रँड मुख्य भौगोलिक क्षेत्रांमधील प्रेक्षकांशी मजबूत नाते तयार करण्याचा निरंतर प्रयत्न करत असून याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, ब्रँड सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागीदारींवर आपले लक्ष दृढ करीत आहे. अमृता खानविलकर यांच्यासारख्या प्रादेशिक सुप्रसिद्ध व्यक्तीसोबत सहयोग साधून महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये त्याच्या उपस्थितीला बळकटी देण्याचे आणि भारताच्या हृदयस्थानी नैसर्गिक स्किनकेअर आणि समग्र आरोग्याच्या संदेशाचा प्रसार करण्याचे उद्दीष्ट मेडिमिक्सने ठेवलेले आहे. तिच्या व्यापक मोहकतेमुळे  आणि विश्वसनीयतेमुळे नेहमी खरेपणा आणि भरवश्यावर विश्वास ठेवणाऱ्या ब्रँडची अमृता एक आदर्श चेहरा बनलेली आहे.

मेडिमिक्स बऱ्याच काळापासून त्याच्या आयुर्वेदिक परंपरेत रुजलेल्या प्रभावी, औषधी वनस्पतींवर आधारित उत्पादनांशी समर्पक आहे. ब्रँडच्या केंद्रस्थानी त्याच्या 18 औषधी वनस्पतींच्या शक्तीचे सत्त्व आहे. हे सामग्रीचे एक अद्वितीय मिश्रण आहे जे वेळोवेळी परिपूर्ण केले गेले आहे आणि कौटुंबिक रहस्य म्हणून पिढ्यानपिढ्या पुढे सांगितले गेले आहे. प्रत्येक मेडिमिक्स साबणाचा मूलाधार तयार करते. मेडिमिक्सने तरल पदार्थांमध्ये पोर्टफोलिओमध्ये अधिक भर घातली असून बॉडीवॉश, हँडवॉश आणि फेसवॉश श्रेणींमध्ये प्रवेश करताना आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत आहे. असे करून मुख्य भौगोलिक क्षेत्रांमधील ब्रँडचा शिरकाव आणखी वाढवित आहे.

मेडिमिक्स आणि अमृता हे दोघे स्वस्थ त्वचेसाठी नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक नाते आणि आयुर्वेदाचे गुण, म्हणजे संपूर्ण मेडिमिक्स पोर्टफोलिओ श्रेणीसाठी स्किनफिटला आधार देण्याकरिता एकत्र आले आहेत आणि म्हणून या दोघांसाठी हा सहयोग एक महत्त्वाचा टप्पा आहे. 

आपल्या नव्या भूमिकेबद्दल अमृता खानविलकर म्हणाली: "मेडिमिक्स मला नेहमीच आपलेसे वाटले आहे. हे नाव माझ्या वाढीच्या काळाचा भाग होते आणि माझा यावर नेहमीच विश्वास होता. आणि आता तर मी अधिकृतपणे मेडिमिक्स कुटुंबाचा एक भाग बनले आहे. म्हणून मला विश्वास बसणार नाही इतके खास वाटत आहे. हे फक्त एखाद्या ब्रँडची जाहिरात करण्यापुरते नसून हे माझ्या प्रवासात मला आधार देणाऱ्या लोकांना मी खरंच विश्वास केलेल्या गोष्टी सांगण्याविषयी आहे. नैसर्गिक घटक आणि आयुर्वेदाप्रती त्यांची बांधिलकी माझा स्वतःचा असा विश्वास दर्शविते की आपण आपल्या नैसर्गिक स्वभावाला स्वीकारले पाहिजे आणि त्वचेची सर्वात सौम्य आणि प्रभावी पद्धतीने काळजी घेतली पाहिजे."

अनुपम कठेरिया, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, चोल्याइल प्रायव्हेट लिमिटेड, हे उत्पादन, ठिकाण आणि प्रसार धोरणे नव्याने परिभाषित करताना वाढीसाठी निश्चित केलेल्या नवीन क्षितिजाबद्दल बोलले. चोल्याइल येथे ग्राहकांच्या अपेक्षांना पार करणारी दर्जेदार उत्पादने प्रदान करण्याची आमची बांधिलकी आमच्या सुसंगत वाढीतून दर्शविली गेली आहे आणि घरगुती पॅनल डेटामध्ये दिसून आल्यानुसार घरगुती वापरात वाढीमुळे आणि खपचे प्रमाण वाढण्यामुळे यास चालना मिळाली आहे. आमच्या मुख्य बाजारपेठा आणि ब्रँड्स बळकट करण्याच्या धोरणास अनुसरून आम्ही अतिस्थानिक अभियान सुरु करत आहोत जेणेकरून हँडवॉश, बॉडीवॉश आणि फेसवॉश या तरल पदार्थांच्या श्रेणीत खोलवर लक्ष घालता येईल. हे उपक्रम आयुर्वेदाच्या शक्तीच्या माध्यमातून आपणास 'स्किनफिट' बनवण्याची आपली बांधिलकी प्रबळ करत आहेत. 

श्री. कठेरिया म्हणाले: "आम्हाला अभिमान आहे की ब्रँड ॲम्बेसेडरच्या रूपात अमृता खानविलकर मेडिमिक्स कुटुंबात सामील झाली आहे. तिची सुडौलता, खरेपणा आणि प्रेक्षकांशी असलेले सखोल नाते तिला मेडिमिक्सच्या मूल्यांची परिपूर्ण प्रतिकृती बनवते. मेडिमिक्समध्ये, आम्ही नेहमीच अशा स्किनकेअरवर विश्वास ठेवला आहे जो परंपरेत रुजलेला असून सुद्धा आजच्या जीवनशैलीशी संबंधित आहे. अमृता सोबत काम करून नैसर्गिक, आयुर्वेदिक सेवेचा आमचा संदेश देशभरातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची आम्ही आशा करतो. मेडिमिक्स सोबत आयुर्वेदाचे गुण, चांगल्या त्वचेसाठी - आता स्वीकारले गेले पाहिजे."

अमृता खानविलकर मेडिमिक्सचा नवा चेहरा असल्याने ब्रँड उत्सुकतेने आधुनिक जीवनशैलीशी खरी, समग्र आरोग्याची परंपरा एकत्र करणाऱ्या ग्राहकांशी असलेले नाते अधिक बळकट करण्याची वाट पाहत आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202