केनडियर चे नवी मुंबई वाशी मध्ये नवीन दालन सुरू
केनडियर चे नवी मुंबई वाशी मध्ये नवीन दालन सुरू
केनडियरच्या नवी मुंबईतील 8व्या शोरूमने ब्रँडच्या रिटेल विस्ताराच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला
आधुनिक आणि ट्रेंड-आधारित डिझाईन्ससाठी प्रसिद्ध असलेला कल्याण ज्वेलर्सचा लाइफस्टाइल ज्वेलरी ब्रँड केनडियरने नवी मुंबईतील वाशी या गजबजलेल्या व्यावसायिक हबमध्ये आपले नवे रिटेल शोरूम सुरू केले आहे. सेक्टर 30A, प्लॅटिनम टेक्नो पार्क येथे असलेले हे नवे शोरूम मुंबईतील केनडियरचे 8वे शोरूम आणि देशातील 79वे शोरूम ठरले आहे. आजच्या चोखंदळ ग्राहकांसाठी स्टायलिश आणि सहज उपलब्ध दागिन्यांसाठी असलेली त्यांची बांधिलकी यातून अधोरेखित होते.
ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून शाहरुख खानची घोषणा झाल्यानंतर लगेचच या वाशी शोरूमचे उद्घाटन होत असून केनडियरच्या मजबूत विस्तार धोरणातील आणखी एक टप्पा म्हणून हे महत्त्वाचे पाऊल आहे. नवी मुंबईतील वाशी हे कॉर्पोरेट, रिटेल आणि लाइफस्टाइल ग्राहकांचं उत्कृष्ट मिश्रण असलेलं ठिकाण असल्याने केनडियरच्या ओम्निचॅनेल ब्रँड म्हणून वाढीसाठी हे परिपूर्ण स्थान ठरतं.
केनडियर ब्रँड आपल्या हलक्याफुलक्या आणि बहुपयोगी दागिन्यांसाठी ओळखला जातो. जेन झी, काम करणारे व्यावसायिक आणि फॅशन-प्रेमी पुरुषांमध्ये हा ब्रॅंड विशेषतः लोकप्रिय आहे. किफायतशीर किंमतींसह समकालीन, आधुनिक व ट्रेंड-आधारित डिझाईन्सवर लक्ष केंद्रित करून, केनडियर ग्राहकांना त्यांची वैयक्तिक स्टाइल सहजपणे दाखवण्याची संधी देते. हे कलेक्शन्स गिफ्टिंगसाठीही उत्तम पर्याय ठरत असून खास क्षण साजरे करण्यासाठी आदर्श आहे. या नव्या शोरूमच्या उद्घाटनानिमित्त केनडियरकडून खास ऑफर्स दिल्या जात आहेत.
वाशी, नवी मुंबईतील या नव्या स्थानासह, केनडियर डिजिटल सोयीसुविधा आणि प्रत्यक्ष अनुभव यांचं परिपूर्ण मिश्रण देण्याची आपली परंपरा पुढे सुरू ठेवत आहे. डिजिटल-फर्स्ट ब्रँड असूनही वाढत्या रिटेल उपस्थितीद्वारे ग्राहकांना अधिक सखोल अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे. कल्याण ज्वेलर्सची विश्वासार्हता आणि परंपरा यांचे पाठबळ असलेला केनडियर ब्रँड, दागिन्यांची खरेदी अधिक स्मार्ट, सुलभ आणि अनुभवात्मक बनवत आहे.
Comments
Post a Comment