टीव्हीएस आयएलपीतर्फे भारतातील सर्वात मोठा वेअरहाऊसिंग InvIT एनएसई वर लिस्ट; 1,300 कोटी रु. हून अधिक निधी उभारणार
टीव्हीएस आयएलपीतर्फे भारतातील सर्वात मोठा वेअरहाऊसिंग InvIT एनएसई वर लिस्ट;
1,300
कोटी रु. हून अधिक निधी उभारणार
IFC
कडून 348
कोटी रु. (41 दशलक्ष डॉलर) ची गुंतवणूक — भारतातील वेअरहाऊसिंग InvIT मधील त्यांची पहिली इक्विटी
गुंतवणूक
भारतातील ग्रेड A
वेअरहाऊसिंग आणि औद्योगिक
पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य विकसक टीव्हीएस इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक्स
पार्क्स (टीव्हीएस आयएलपी) यांनी आज राष्ट्रीय
शेअर बाजारावर (NSE) त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट (InvIT) — टीव्हीएस
इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्टचे यशस्वी लिस्टिंग करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
लिस्टिंग समारंभात बोलताना टीव्हीएस इंडस्ट्रियल अँड लॉजिस्टिक्स पार्क्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि उपाध्यक्ष रवि स्वामिनाथन म्हणाले: “आजचा दिवस आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसाठी केवळ लिस्टिंगमुळेच नाही तर आणखी एका ऐतिहासिक कारणामुळे खास आहे. आजपासून बरोबर 20 वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही 8 जुलै 2005 रोजी टीव्हीएस आयएलपी ची स्थापना केली तेव्हा टीव्हीएस SCS आणि रवि स्वामिनाथन फॅमिली यांच्यातील भागीदारीची सुरुवात झाली होती. भारतातील लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आमचा ठाम विश्वास आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील दूरदृष्टी यांमुळे ही भागीदारी आकाराला आली. जे स्वप्न आपण पाहिले ते आज टीव्हीएस आयएलपी ला भारतातील पहिल्या कॉर्पोरेट ग्रेड A वेअरहाऊसिंग विकसकाच्या रूपात उभे करत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, टीव्हीएस आयएलपीने सातत्याने भारतातील वेअरहाऊसिंग आणि औद्योगिक पायाभूत सुविधांच्या मापदंडाची नव्याने व्याख्या केली आहे. आमचा प्रवास या क्षेत्रातील सखोल कौशल्य आणि दर्जा व अंमलबजावणीवर अखंड लक्ष यावर आधारित आहे.
भारताच्या वेअरहाऊसिंग क्षेत्रातील पहिला कॉर्पोरेट डेव्हलपर-प्रणीत InvIT होणे हे दीर्घकालीन दूरदृष्टी आणि प्रभावी अंमलबजावणी यांचे उत्तम उदाहरण आहे. टीव्हीएस इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट आम्हाला मूल्य खुले करण्याची, जागतिक भांडवल आकर्षित करण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतातील पायाभूत सुविधांचा विकास वेगाने पुढे नेण्याची संधी देत आहे.”
Comments
Post a Comment