नेक्स्ट्राने आर्थिक वर्ष 2024-25 साठी सस्टेनेबिलिटीचा अहवाल प्रसिद्ध
नेक्स्ट्राने आर्थिक वर्ष 2024-25 साठी सस्टेनेबिलिटीचा अहवाल प्रसिद्ध
- या वर्षी कंपनीनं 15% जास्त प्रदूषण कमी केलं, म्हणजे एकूण 188,507 tCO2e एवढी घट झाली.
- डेटा सेंटर्समध्ये लागणाऱ्या विजेपैकी 49% वीज पुनर्नवीनीकरणीय उर्जेतून (जसं सौर, वारा इ.) घेतली गेली.
- नेस्टवेव उपक्रमामुळे महिलांची नोकरीतली संख्या तब्बल 130% नी वाढली.
मुंबई, 25 अगस्त, 2025: नेक्स्ट्रा डेटा लिमिटेड (नेक्स्ट्रा बाय एयरटेल) ने आज वित्त वर्ष 2024-25 चा सस्टेनेबिलिटी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये कंपनीनं स्मार्ट, मोठ्या प्रमाणात वापरता येईल अशी आणि टिकाऊ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याबाबत झालेली प्रगती सांगितली आहे.
हा अहवाल शाश्वतेच्या तीन स्तंभांमध्ये नेक्स्ट्राची वचनबद्धता आणि प्रगती अधोरेखित करतो स्वच्छ ऊर्जा आणि स्मार्ट ऑपरेशन्सद्वारे पर्यावरणीय प्रभाव कमी करणे, सामाजिक समावेश आणि सुरक्षितता वाढवणे आणि पारदर्शकता आणि जबाबदारीसह प्रशासनाला बळकटी देणे.
सीईओ, अॅशिष अरोरा यांनी सांगितले: नेक्स्ट्रा मध्ये सस्टेनेबिलिटी हा आमच्या प्रत्येक कामाचा केंद्रबिंदू आहे. मग तो डिझाईन असो, कन्स्ट्रक्शन असो किंवा ऑपरेशन्स. या वर्षी आम्ही इंडस्ट्रीसाठी नवे बेंचमार्क तयार केले आहेत. आम्ही देशातले पहिले डेटा सेंटर आणि फक्त 14वी कंपनी आहोत ज्यांनी RE100 जागतिक उपक्रमात प्रवेश केला आणि 100% पुनर्नवीनीकरणीय उर्जेचा वापर करण्याची वचनबद्धता दिली. तसेच आम्ही देशातले पहिले आहोत ज्यांनी AI चा मोठ्या प्रमाणावर वापर करून उर्जा कार्यक्षमता वाढवली आणि कार्यप्रदर्शन सुधारले.”
2024-25 मधली महत्वाची कामगिरी
- तब्बल 482,800 MWh पुनर्नवीनीकरणीय ऊर्जा कराराद्वारे घेतली – 2021 च्या आधारभूत वर्षाच्या तुलनेत 3x जास्त
- आधारभूत म्हणून आर्थिक वर्ष 2021 च्या तुलनेत सरासरी वीज वापर परिणामकारकता (PUE) 10% ने कमी केली
- 85/100 चा कर्मचारी प्रतिबद्धता गुण मिळवून कामाच्या ठिकाणी विश्वास वाढवला
- 99% पुरवठादार भारतातलेच ठेवले त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत केली आणि लवचिक पुरवठा साखळी वाढवली,
- धोरणात्मक पुरवठादारांच्या 98% साठी ईएसजी मूल्यांकन आयोजित करून संपूर्ण मूल्य साखळीमध्ये शाश्वतता सुनिश्चित केला
- बांधकामात 6.15 दशलक्ष सुरक्षित व्यक्ती-तास सुनिश्चित केले
Comments
Post a Comment