चित्रनगरीच्या बाप्पाचे उत्साहात आगमन
३२ वर्षांची समृद्ध परंपरा
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात `चित्रनगरीच्या बाप्पाचे 'चे सोमवारी ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर उत्साहात आगमन झाले. या आगमनाबरोबरच चित्रनगरीतील ३२ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली.
राज्याचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र उत्साही वातावरण आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गणेशोत्सव भव्य दिव्य साजरा करण्यात येणार आहे. याकरिता चित्रनगरी गणेशोत्सव समिती कार्यरत आहे.
देशभरात भव्य गणेशमूर्ती व आकर्षक देखावे असलेल्या मुंबईतील गणेशोत्सवाची ख्याती आहे. त्याचबरोबर हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होणाऱ्या गोरेगावमधील दादासाहेब फाळके चित्रनगरीत विराजमान होणारा गणरायही प्रसिद्ध आहे. गेल्या ३२ वर्षांपासून हा गणेशोत्सव चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबरच सर्व कलाकारांच्या श्रद्धेचे स्थान आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरीतील या मानाच्या `चित्रनगरीच्या राजा'ची आज सायंकाळी दिमाखात आगमन मिरवणूक काढण्यात आली. `योद्धा ढोल-ताशा' पथकाच्या गजराबरोबरच लेझीमच्या सूरात निघालेल्या मिरवणुकीने परिसर दुमदूमून गेला होता. या मिरवणूक सोहळ्याप्रसंगी महमंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, मुख्यलेखावित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे उपस्थित होते. तसेच चित्रनगरीतील अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच मोठ्या संख्येने निर्मिती संस्थेचे कर्मचारी, भाविक मिरवणुकीत सहभागी झाले.

.jpeg)
Comments
Post a Comment