महानगर गॅस लिमिटेड सुरु करत आहे तिची नवी ब्रँड मोहीम: ‘मुंबई चालते, एमजीएल वर’
महानगर गॅस लिमिटेड सुरु करत आहे तिची नवी ब्रँड मोहीम: ‘मुंबई चालते, एमजीएल वर’
महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल), या भारताच्या एका आघाडीच्या नैसर्गिक वायू वितरण कंपनीने तिची नवी ब्रँड मोहीम ‘मुंबई चालते, एमजीएल वर’ हिचे अनावरण केले आहे, जिच्या मार्फत मुंबई शहर आणि त्या पलीकडील क्षेत्राला ऊर्जा पुरवण्याची तिची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होत आहे.
या मोहिमेचे औपचारिक उद्घाटन एमजीएलचे अध्यक्ष श्री संदीप गुप्ता यांच्या हस्ते बीकेसी येथील एका विशेष समारंभामध्ये, व्यवस्थापकीय संचालक श्री आशु सिंघल, उप व्यवस्थापकीय संचालक श्री अजय सिन्हा आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तीनहून अधिक दशकांपासून, मुंबई आणि सभोवतालच्या प्रदेशांतील घरे, व्यवसाय, उद्योग आणि वाहनांकरिता पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पासून कंप्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) पर्यंत एमजीएल हा सुरक्षित, विश्वसनीय आणि निर्वाहक्षम ऊर्जा उपाययोजना पुरवणारा आधारस्तंभ राहिला आहे. ही नवी मोहीम अशा वेळी सुरु होत आहे जेव्हा ग्राहकांच्या अपेक्षा जलद गतीने बदलत आहेत, आणि पर्यावरणाबाबत जबाबदार राहणे, सोय पुरवणे आणि विश्वास निर्माण करणे यांवर त्यांचा जास्त भर आहे.
हा बदल ओळखून, एमजीएलने मुंबईकरांबरोबरचे भावनिक नाते अधिक दृढ करण्यासाठी नव्या रीतीने ब्रँड लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रवास सुरु केला आहे, ज्यामध्ये एमजील फक्त एक ऊर्जा पुरवठादारच नव्हे, तर शहराची जीवनज्योत आणि वृद्धि सुरु ठेवण्यासाठी आवश्यक असणारा एक अपरिहार्य जोडीदार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करत आहे.
एमएक्स ॲडव्हर्टायझिंगच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही मोहीम, भारताची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असणारे मुंबई शहर कसे एमजीएलमुळे ‘सुरु राहते’ हे अधोरेखित करते. ‘मुंबई चालते, एमजीएल वर’ ही टॅगलाईन शहर जागृत ठेवण्यातील एमजीएलचे मूक तरी लक्षणीय योगदान ठसवते, मग ते लाखो स्वयंपाकघरांतील स्वयंपाकासाठीच्या इंधनातून असो, रस्त्यांवरून धावणाऱ्या गाड्यांना ऊर्जा पुरवण्यातून असो, किंवा अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेणाऱ्या उद्योगांना ऊर्जा पुरवण्यातून असो.
ही ध्येयदृष्टी साकार करण्यासाठी, एमजीएलने एक एआय-प्रणित कार्यपद्धती अंगीकारली आहे, जिच्या मार्फत ही मोहीम छापील, रेडिओ, बाह्य आणि डिजिटल मंचांवरून राबवली जात आहे. कथाकथनाची ही अभिनव शैली आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (कृत्रिम प्रज्ञेच्या) शक्तीचा वापर करून मुंबईचा आत्मा आणि तो जागृत ठेवण्यातील एमजीएलची भूमिका नेमकी टिपून घेते.
उद्घाटनाच्या मुहूर्तावर आपले मनोगत व्यक्त करत एमजीएलचे अध्यक्ष, श्री संदीप गुप्ता म्हणाले, ‘‘मुंबई हे शहर कधीही न थांबणारे आहे, आणि एमजीएल ही मुंबईला सुरु ठेवणारी एक शक्ती असण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या मोहिमेतून आमच्या विश्वसनीयतेचा आणि विश्वासार्हतेचा वारसा तर दिसून येतोच, पण त्याबरोबरच एका निर्वाहक्षम आणि प्रगतीशील भविष्यासाठीची आमची ध्येयदृष्टीसुद्धा दिसून येते. ‘मुंबई चालते, एमजीएल वर’ ही फक्त टॅगलाईन नाही; हा सोहळा आहे मुंबईकरांसोबतच्या आणि मुंबई सोबतच्या एमजीएलच्या निरंतर नात्याचा.’’
यास दुजोरा देत, एमजीएलचे व्यवस्थापकीय संचालक, श्री आशु सिंघल म्हणाले, ‘‘30 हून अधिक वर्षांपासून, एमजीएल म्हणजे सुरक्षित आणि पर्यावरणास पूरक ऊर्जा हे समीकरण अस्तित्वात आहे. या मोहिमेतून, आम्ही मुंबईच्या दैनंदिन आयुष्याला बळ देणारी - घरांना, उद्योगांना आणि परिवहनाला कार्यक्षमपणे आणि सर्वतोपरी काळजी घेऊन इंधन पुरवणारी आमची भूमिका अधोरेखित करण्याचे लक्ष्य बाळगतो. नव्या तंत्रज्ञानाचा आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षांना अंगीकारत असतानाच, एमजीएल शहराच्या विकासाच्या गाथेतील एक विश्वसनीय साथीदार राहण्यास कटिबद्ध राहणार आहे.
Comments
Post a Comment