एसबीआय कार्ड आणि फ्लिपकार्ट यांच्यात धोरणात्मक भागीदारी; फ्लिपकार्ट एसबीआय को-ब्रॅंडेड क्रेडिट कार्ड लॉन्च
एसबीआय कार्ड आणि फ्लिपकार्ट यांच्यात धोरणात्मक भागीदारी;
फ्लिपकार्ट एसबीआय को-ब्रॅंडेड क्रेडिट कार्ड लॉन्च
मुंबई,26ऑगस्ट 2025: एसबीआय कार्ड हा भारताचा सर्वात मोठा, अस्सल क्रेडिट कार्ड पुरवठादार असून फ्लिपकार्ट ही स्वदेशी ई-कॉमर्स मार्केटप्लेस मानली जाते. आपापल्या क्षेत्रातील या दोन मातब्बरांनी एकत्र येऊन ‘फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड’ लॉन्च केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) चेअरमन श्री. चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी आणि एसबीआयचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अश्विनी कुमार तिवारी यांच्या उपस्थितीत हे अद्वितीय को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यात आले. समजदार ग्राहकांना त्यांच्या बहुतांश खरेदीवर फायदेशीर खरेदीचा अनुभव देण्यासाठी फ्लिपकार्ट एसबीआय कार्ड क्यूरेटेड कॅशबॅक फायद्यांसह काळजीपूर्वक तयार केले गेले आहे. हा शुभारंभ एसबीआय कार्ड आणि फ्लिपकार्टच्या अधिक मूल्य, लवचिकता आणि औपचारिक क्रेडिट प्राप्तीसह खरेदीदारांना सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. ग्राहक अगदी सहज डिजीटली क्रेडिट कार्डकरिता Flipkart App, आणि SBI Card SPRINT द्वारे SBI Card.com एसबीआय कार्ड वेबसाईटमार्फत अर्ज करू शकतात.
फ्लिपकार्ट एसबीआय कार्डद्वारे ग्राहक मिंत्रावर केलेल्या खर्चावर 7.5% कॅशबॅक मिळवू शकतात. तसेच फ्लिपकार्ट, शॉप्सी आणि क्लियरट्रिपवर केलेल्या खर्चावर 5% कॅशबॅक मिळवू शकतात. ग्राहक मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, फॅशन, फर्निचर, उपकरणे, घरगुती सामान, प्रवास आरक्षण आणि बरेच काही यासह फ्लिपकार्ट इकोसिस्टममध्ये उत्पादने आणि सेवांच्या विस्तृत श्रेणीमध्ये खरेदी करण्यासाठी फायदेशीर मूल्य प्रस्तावाचा वापर करू शकतात. याव्यतिरिक्त, ग्राहकांना Zomato, Uber, Netmeds आणि PVR सारख्या निवडक ब्रँडवर 4% कॅशबॅक आणि इतर सर्व पात्र खर्चांवर 1% अमर्यादित कॅशबॅक मिळू शकतो. फ्लिपकार्ट एसबीआय कार्ड ऑटो-क्रेडिट ऑफ कॅशबॅक सुविधेसह येते जे स्टेटमेंट जनरेशनच्या दोन दिवसांच्या आत एसबीआय कार्ड खात्यात पात्र कॅशबॅकचे ऑटो-क्रेडिट देते, ज्यामुळे त्रास-मुक्त अनुभवाची खातरजमा होते.
एसबीआय कार्डच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर सलिला पांडे म्हणाल्या, “एसबीआय कार्डमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आकांक्षांशी सुसंगत असलेली श्रेणीतील सर्वोत्तम उत्पादने वितरीत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. फ्लिपकार्टच्या भागीदारीत फ्लिपकार्ट एसबीआय कार्ड सुरू करणे हे या दिशेने आणखी एक पाऊल आहे. भारतातील ई-कॉमर्सच्या वेगवान वाढीमुळे, ग्राहक प्रत्येक खरेदीत अखंड आणि फायदेशीर अनुभव शोधत आहेत. फ्लिपकार्ट एसबीआय कार्ड एक फायदेशीर आणि अखंडित पेमेंट अनुभव मिळवून देण्यासाठी विचारपूर्वक तयार करण्यात आले आहे.”
फ्लिपकार्ट ग्रुपचे चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले, "फ्लिपकार्टमध्ये आम्ही आमच्या सगळ्या कृतींमध्ये नेहमीच ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवले आहेत. व्यापक परिसंस्थेसाठी सामायिक मूल्य निर्माण करण्यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक नाविन्यपूर्ण आर्थिक प्रस्ताव सादर केले आहेत. एसबीआय कार्डच्या भागीदारीत हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारतातील औपचारिक पतपुरवठ्याचे लोकशाहीकरण आणि विस्तार करण्याची आमची बांधिलकी यातून प्रतिबिंबित होते. जास्तीत जास्त मूल्य प्रदान करण्यासाठी तयार केलेल्या उपाययोजनांसह, भारतातील लाखो कुटुंबांना त्यांच्या आकांक्षा आत्मविश्वासाने पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
फ्लिपकार्ट एसबीआय कार्डचे जॉइनिंग आणि वार्षिक नूतनीकरण शुल्क ₹500 असून त्याशिवाय कर लागू आहे. अर्ज यशस्वी झाल्यावर कार्डधारक ₹1,250 चे स्वागतार्ह लाभ मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, कार्ड सदस्यत्व वर्षात ₹ 3,50,000 वार्षिक खर्चाचा टप्पा गाठल्यावर ते ₹ 500 च्या रिन्यूअल फी रिव्हर्सलचा आनंद घेऊ शकतील. क्रेडिट कार्ड स्टेटमेंट सायकलमध्ये 1% इंधन अधिभार माफी देखील देते. कॉन्टॅक्टलेस कार्ड हे मास्टरकार्ड तसेच व्हिसा पेमेंट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment