अर्बन कंपनी लिमिटेडची 1900 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू
अर्बन कंपनी लिमिटेडची 1900 कोटी रु. ची
प्राथमिक समभाग विक्री 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू
· प्रत्येकी 1 रुपये (“इक्विटी शेअर्स”) दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 98 रुपये ते 103 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· बोली/ऑफर बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 9 सप्टेंबर 2025 असेल
· बोली किमान 145 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 145 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
· कर्मचारी राखीव भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 9 रु. इतकी सूट दिली जाईल
अर्बन कंपनी लिमिटेड (“कंपनी”) आपल्या इक्विटी शेअर्सच्या प्राथमिक समभाग विक्री संदर्भात बोली/ऑफर बुधवार 10 सप्टेंबर 2025 रोजी खुली करणार आहे. एकूण ऑफर साईज मध्ये 19,000 दशलक्ष रु. किंमतीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. त्यामध्ये विक्री समभागधारकांकडून 4,720 दशलक्ष रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि 14,280 दशलक्ष रु. मूल्याच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 9 सप्टेंबर 2025 असेल. बिड / ऑफर बुधवार, 10 सप्टेंबर 2025 रोजी खुली होऊन शुक्रवार, 12 सप्टेंबर 2025 रोजी बंद होईल.
ऑफरचा किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअरसाठी 98 रुपये ते 103 रुपये निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 145 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 145 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. कर्मचारी राखीव भागात बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 9 रु. इतकी सूट दिली जाईल.
कंपनी इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणारा निव्वळ निधीचा उपयोग पुढीलप्रमाणे केला जाईल: (i) नवीन तंत्रज्ञान विकास आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी खर्च, अंदाजित रक्कम 1,900.00 दशलक्ष रु. [190 कोटी रु.], (ii) कार्यालयांच्या भाडेपट्टीसाठी देयके, अंदाजित रक्कम 750.00 दशलक्ष रु. [75 कोटी रु.], (iii) विपणन उपक्रमांसाठी खर्च, अंदाजित रक्कम 900.00 दशलक्ष रु. [90 कोटी रु.] आणि (iv) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी.
ऑफर फॉर सेल मध्ये प्रति इक्विटी शेअर दर्शनी मूल्य 1 रु.असलेल्या शेअर्सचा समावेश आहे: ॲक्सेल इंडिया IV (मॉरिशस) लिमिटेड कडून 3,900 दशलक्ष रु. पर्यतचे [390 कोटी रु.], बेस्सेमर इंडिया कॅपिटल होल्डिंग्स II लिमिटेड कडून 1,730 दशलक्ष रु. [173 कोटी रु.], एलेव्हेशन कॅपिटल V लिमिटेड (पूर्वी SAIF पार्टनर्स इंडिया V लिमिटेड) कडून 3,460 दशलक्ष रु. [346 कोटी रु.], इंटरनेट फंड V पीटीई. लि. कडून 3,030 दशलक्ष रु. [303 कोटी रु.] आणि VYC11 लिमिटेड कडून 2,160.00 दशलक्ष रु. [216 कोटी रु.] (“गुंतवणूकदार विक्री समभागधारक”) शेअर्स समाविष्ट आहेत. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे सादर करण्यात येत असून रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरयाणा (“ नवी दिल्ली RoC”) यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. हे शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
Comments
Post a Comment