महिंद्रा ट्रॅक्टरच्या अर्जुन सिरीजने भारतीय शेतकऱ्यांचे सबलीकरण करत पूर्ण केली यशस्वी 25 वर्ष
महिंद्रा ट्रॅक्टरच्या अर्जुन सिरीजने भारतीय शेतकऱ्यांचे सबलीकरण करत पूर्ण केली यशस्वी 25 वर्ष
25 वर्षांपासूनचा विश्वासू साथीदार असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या अर्जुन सिरीजने शक्ती, उत्पादकता आणि अतुलनीय विश्वासार्हतेसह भारतभर शेतीत घडवले परिवर्तन
महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचा (कृषी साहित्य व्यवसाय) भाग असलेली महिंद्रा ट्रॅक्टर्स संख्यात्मक दृष्टीने जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक आहे. कंपनी आपली वैशिष्ट्यपूर्ण ट्रॅक्टर मालिका ‘महिंद्रा अर्जुन सिरीज’ ची 25 वर्षे अभिमानाने साजरी करत आहे. भारतातील सर्वात विश्वासार्ह ट्रॅक्टर ब्रँड्सपैकी एक असलेली महिंद्रा अर्जुन सिरीज ही मजबूत, बहुपयोगी आणि उच्च हॉर्सपॉवर असलेली सिरीज असून शेती आणि बिगर शेती कामांमध्ये जास्तीत जास्त ऑपरेटर कम्फर्ट व उत्तम ग्राहक मूल्य देण्यासाठी ओळखली जाते. या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त, महिंद्रा ट्रॅक्टर्स अभिमानाने संपूर्ण अर्जुन सिरीजसाठी स्टँडर्ड 6 वर्षांची वॉरंटी देत आहेत.
2000 मध्ये तीन हॉर्सपॉवर प्रकारांसह सादर झालेली महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीज सतत अपग्रेड होत आली आहे. त्यायोगे शेती आणि हॉलज ऑपरेशन्सच्या म्हणजेच जड माल, पिके किंवा साहित्य लांब अंतरावर किंवा मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याचे काम यांसारख्या मागण्या पूर्ण करता येतात. त्यामध्ये TREM III व TREM IV सारख्या बदलत्या उत्सर्जन मानकांचे पालन केले जाते. आज ही सिरीज 2WD आणि 4WD अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असून पॉवर रेटिंग्स 60 हॉर्सपॉवर पर्यंत आहेत. महिंद्राच्या अॅडव्हान्स्ड mDI आणि CRDe 4-cylinder इंजिन टेक्नॉलॉजीजद्वारे चालवली जाणारी महिंद्रा ट्रॅक्टर्सची अर्जुन सिरीज सर्वोत्तम पॉवर आणि इंधन कार्यक्षमता सादर करते. ही ट्रॅक्टर मालिका म्हणजे शेतकऱ्यांची पहिली पसंती आणि हेवी-ड्युटी हॉलज ऑपरेशन्ससाठी एक विश्वासार्ह भागीदार आहे.
गिअर शिफ्ट करणे सोपे व्हावे, उच्च मॅक्स टॉर्क आणि उत्कृष्ट बॅकअप टॉर्क यासाठी ड्युअल क्लच टेक्नॉलॉजीसह असलेला कॉन्स्टंट मेष ट्रान्समिशन हा गिअरबॉक्सचा एक प्रकार अचानक वाढलेले ओझे सांभाळणे किंवा कमी वेगात काम करणे यासाठी महिंद्रा अर्जुन सिरीजला सक्षम बनवतो. क्लास-लीडिंग PTO पॉवर आणि अॅडव्हान्स्ड हायड्रॉलिक्स सिस्टीम्समुळे प्रत्येक प्रकारच्या अंमलबजावणीसाठी अप्रतिम कामगिरी सुनिश्चित होते. त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त उत्पादकता साध्य करू शकतात. जमीन तयार करणे, पिकांसाठी पडलिंग, डीप टिलेज, ऊस वाहतूक आणि कापणी सारख्या महत्त्वपूर्ण शेती कामांसाठी ही सिरीज अतुलनीय ठरते.
या महत्वपूर्ण टप्प्याबद्दल बोलताना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट बिझनेसचे अध्यक्ष विजय नाकरा म्हणाले, “आम्हाला महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजचा प्रचंड अभिमान आहे हे असे नाव आहे ज्यांनी भारतभरातील 2.5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. महिंद्राची ख्याती असलेल्या मजबूतपणातून तयार झालेली ही महिंद्रा अर्जुन सिरीज 25 वर्षांपासून शेती आणि हॉलज दोन्हीमध्ये विश्वासार्ह भागीदार ठरली आहे. पंजाबच्या गव्हाच्या शेतांपासून, महाराष्ट्राच्या कापूस पट्ट्यांपर्यंत किंवा तामिळनाडूच्या भातखाचरांपर्यंत महिंद्रा अर्जुन सिरीज भारताच्या विविध शेती क्षेत्रांमध्ये समृद्धीला बळकटी देत आहे.”
महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजमध्ये 5 मॉडेल्स आहेत. यांत्रिकीकरणामध्ये गुंतवणूक करणारे शेतकरी असोत, मोठे जमीनमालक असोत किंवा हॉलज ऑपरेटर्स; यापैकी प्रत्येक मॉडेल वेगवेगळ्या शेती गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजची विक्री संपूर्ण देशभरातील महिंद्राच्या विस्तृत डीलर नेटवर्कद्वारे केली जाते. यामध्ये फार्म इम्प्लिमेंट्सची संपूर्ण रेंज उपलब्ध आहे. जोडीला या ट्रॅक्टर सिरीजसाठी महिंद्रा फायनान्समार्फत सोयीस्कर आणि आकर्षक वित्तीय योजनाही उपलब्ध आहेत.
Comments
Post a Comment