ग्लोटीस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 29 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू
ग्लोटीस लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 29 सप्टेंबर 2025 पासून होणार सुरू
· ग्लोटीस लिमिटेड (“Company”) चा प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 120 रुपये ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 129 रुपये पर्यंतचा (“इक्विटी शेअर्स”) किंमतपट्टा निश्चित.
· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 आहे.
· बोली/ऑफर सोमवार, 29 सप्टेंबर 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार 1 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल.
· बोली किमान 114 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 114 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
ग्लोटीस लिमिटेड (“Company”) कंपनी प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्रीसाठीची (“Offer”) बोली/ऑफर सोमवार 29 सप्टेंबर 2025 पासून सुरू करणार आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार 1 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल.
कंपनीच्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 120 रुपये ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 129 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 114 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 114 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
प्राथमिक समभाग विक्रीमध्ये विक्री समभागधारकांकडून 160 कोटी रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि ऑफर फॉर सेल मध्ये 1,13,95,640 पर्यतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. त्यामध्ये रामकुमार सेनथीलवेल आणि कुट्टाप्पन मणीकंदन (एकत्रितपणे “प्रवर्तक विक्री समभागधारक”) यांचे प्रत्येकी 56,97,820 पर्यतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR नियम 6(1) च्या नियमनात आहे. ही ऑफर SEBI ICDR नियम 32(2) च्या अनुषंगाने केली जात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या 30% पेक्षा जास्त नसलेला भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. (BSE आणि NSE एकत्रितपणे “Stock Exchanges”) पॅटोमॅथ कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर (“BRLMs”) आहेत.
Comments
Post a Comment