बी.ए.जी. कन्वर्जन्स लिमिटेडचा आयपीओ 30 सप्टेंबर 2025 रोजी होणार खुला
बी.ए.जी. कन्वर्जन्स लिमिटेडचा आयपीओ 30 सप्टेंबर 2025 रोजी होणार खुला
● एकूण इश्यू साइज – कमाल 56,00,000 इक्विटी शेअर्स (प्रत्येकी ₹10 चे अंकित मूल्य)
● आयपीओ साइज – ₹48.72 कोटी (वरच्या प्राइस बँडवर)
● प्राइस बँड – ₹82 – ₹87 प्रति शेअर
● लॉट साइज – 1,600 इक्विटी शेअर्स (किमान 2 लॉट)
मुंबई, 26 सप्टेंबर 2025 – बी.ए.जी. कन्वर्जेन्स लिमिटेड (बी.ए.जी.), जी एक डिजिटल मीडिया कंपनी आहे आणि News24 व E24 चे संचालन वेब, अॅप्स, सोशल मीडिया, यूट्यूब आणि कनेक्टेड टीव्ही प्लॅटफॉर्मवर करते, ज्यामध्ये बातम्या, मनोरंजन, क्रीडा, अध्यात्म, ऑटो आणि टेक, बिझनेस आणि इतर विषयांचा समावेश आहे, ही कंपनी मंगळवार, 30 सप्टेंबर 2025 रोजी आपला IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) खुला करणार आहे. या इश्यूद्वारे कंपनी ₹48.72 कोटी (अप्पर प्राईस बँडनुसार) उभारण्याचे उद्दिष्ट ठेवते. कंपनीचे शेअर्स NSE Emerge प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहेत.
या इश्यूअंतर्गत प्रत्येकी ₹10 दर्शनी मूल्य असलेल्या एकूण 56,00,000 इक्विटी शेअर्सची विक्री होणार असून, किंमत पट्टा प्रति शेअर ₹82 - ₹87 इतका निश्चित करण्यात आला आहे.
इक्विटी शेअर वाटप:
• QIB अँकर हिस्सा – कमाल 15,60,000 इक्विटी शेअर्स
• क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स – कमाल 10,40,000 इक्विटी शेअर्स
• नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स – कमाल 8,32,000 इक्विटी शेअर्स
• रिटेल इंडिवीज्युअल इन्व्हेस्टर्स – किमान 18,88,000 इक्विटी शेअर्स
• मार्केट मेकर – 2,80,000 इक्विटी शेअर्स
आयपीओतून मिळालेली निव्वळ रक्कम विद्यमान व्यवसायाचा विस्तार, कंटेंटचे अधिग्रहण/उत्पादन, ब्रँड बिल्डिंग खर्च आणि सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल. अँकर हिस्सा 29 सप्टेंबर 2025 रोजी उघडेल आणि इश्यू 03 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत इन्वेंचर मर्चेंट बैंकर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड आणि रजिस्ट्रार आहेत.
बी.ए.जी. कन्वर्जेन्स लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती अनुराधा शुक्ला, यांनी व्यक्त केले – “बी.ए.जी. कन्वर्जेन्स लिमिटेड 2007 पासून News24, News24 Sports, आणि E24 बॉलिवूड, दर्शन 24, ऑटो 24 (MotoX24), प्रादेशिक बातम्या यांद्वारे भारताच्या डिजिटल मीडिया क्षेत्राला आकार देत आहे, जे वेब, मोबाईल अॅप्स, सोशल मीडिया आणि कनेक्टेड टीव्हीवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. आमच्याकडे 2.9 कोटींपेक्षा जास्त यूट्यूब सब्सक्राइबर्स, 3.1 कोटी फेसबुक फॉलोअर्स आहेत, तसेच इन्स्टाग्राम, ट्विटर आणि आमच्या वेबसाईटवर मजबूत उपस्थिती आहे. आम्ही देशभरातील प्रेक्षकांना प्रामाणिक, आकर्षक आणि वेळेवर बातम्या व मनोरंजन पुरविण्यास कटिबद्ध आहोत.
या आयपीओमधून मिळणाऱ्या निधीमुळे आम्हाला आमचा व्यवसाय वाढविणे, उच्च-गुणवत्तेच्या कंटेंटच्या निर्मिती व अधिग्रहणामध्ये गुंतवणूक करणे आणि आमच्या ब्रँडची उपस्थिती अधिक बळकट करणे शक्य होईल. यामुळे आमच्या कामकाजात सुधारणा होईल आणि वाढ जलद गतीने होईल. यामुळे आम्ही भारतभरातील आमच्या प्रेक्षकांना विश्वासार्ह व संबंधित कंटेंट पुरवत राहू शकू.”
इन्वेंचर मर्चंट बँकर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष,श्री कानजी बी. रीता, यांनी सांगितले – “बी.ए.जी. कन्वर्जेन्स लिमिटेडला त्यांच्या आयपीओ प्रवासात मदत करताना आम्हाला आनंद होत आहे. कंपनीने News24, News24 Sports, आणि E24 बॉलिवूड, दर्शन 24, ऑटो 24 (MotoX24), प्रादेशिक बातम्या यांद्वारे भारताच्या डिजिटल मीडिया क्षेत्रात मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे, जी विविध प्लॅटफॉर्मवर कोट्यवधी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचते.
या आयपीओतून मिळणारा निधी बी.ए.जी. कन्वर्जेन्सला आपले कामकाज विस्तारण्यास, उच्च-गुणवत्तेच्या कंटेंट निर्मिती व अधिग्रहणामध्ये गुंतवणूक करण्यास आणि आपल्या ब्रँडची उपस्थिती अधिक बळकट करण्यास मदत करेल. यामुळे कंपनीला आपला व्यवसाय वाढवणे, व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आणि भारताच्या गतिशील डिजिटल मीडिया बाजारात दीर्घकालीन वाढ कायम ठेवणे शक्य होईल.”
Comments
Post a Comment