द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडने 4 सक्रीय फंड्स एनएफओज सोबत पदार्पण करत
भारतातील पहिली महिला-नेतृत्व असलेली AMC बनून रचला इतिहास
वाढ, स्थिरता आणि तरलता देण्याच्या उद्देशासह फ्लेक्सी कॅप फंड, आर्बिट्राज फंड, एथिकल थीमॅटिक फंड आणि लिक्विड फंड सादर; ONDC नेटवर्कवर पदार्पण करणारा पहिला एनएफओ
द वेल्थ कंपनी अॅसेट मॅनेजमेंट होल्डिंग्स कंपनी प्रा. लि. ही पॅंटोमॅथ ग्रुप कंपनी असलेल्या द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडची गुंतवणूक व्यवस्थापक आहे. एकाच वेळी चार सक्रीय फंड्स न्यू फंड ऑफर्स (एनएफओज) सोबत पदार्पण करण्यासाठी भारतातील पहिली महिला-नेतृत्व असलेली अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC)
बनून कंपनीने इतिहास रचला आहे.
या सोबतच आणखी एक महत्वपूर्ण टप्पा म्हणजे ही AMC आपले एनएफओज ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मवर सादर करणारी देशातील पहिली कंपनी ठरली असून म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिक सोपी आणि सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या ध्येयाला पुढे नेत आहे. यासह द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड ही पहिली अशी म्युच्युअल फंड कंपनी ठरली आहे जी चार सक्रीय कॅटेगरी फंड्स सोबत सुरुवात करत असून सीईओ, सीआयओ- इक्विटी आणि चीफ कम्ल्पायन्स ऑफिसर अशा महिलांच्या नेतृत्वासोबत एक आगळीवेगळी ओळख निर्माण करत आहे.
विविध गुंतवणूकदारांच्या वाढ, स्थिरता, नीतिमत्ता आणि तरलता अशा गरजांना उत्तर देण्यासाठी तयार केलेले द वेल्थ कंपनी फ्लेक्सी कॅप फंड, द वेल्थ कंपनी आर्बिट्राज फंड, द वेल्थ कंपनी एथिकल थीमॅटिक फंड आणि द वेल्थ कंपनी लिक्विड फंड असे चार फंड्स आहेत. एकत्रितपणे संस्थात्मक दर्जाची काटेकोरता, वैज्ञानिक जोखीम चौकटी आणि वितरक प्रथम परिसंस्था यांचा संगम साधत हे एक सर्वसमावेशक पदार्पण आहे.
यापैकी द वेल्थ कंपनी एथिकल फंड ही एथिकल संकल्पनेवर आधारित एक ओपन एन्डेड इक्विटी योजना म्हणून विशेष आहे. हा फंड शुद्धता, करुणा आणि अहिंसा (हिंसामुक्तता) या कालातीत सात्विक तत्त्वज्ञानावर उभारलेला आहे. या तत्त्वांनुसार हा फंड दारू, तंबाखू, जुगार, मादक द्रव्ये, चामडे, मांस व पोल्ट्री, कीटकनाशके तसेच प्राण्यांवरील क्रूरतेशी संबंधित उद्योगांमध्ये गुंतवणूक करणार नाही. हे केवळ फिल्टर नसून जिथे धर्म (मूल्ये) आणि धन (संपत्ती) यांचा संतुलन साधला जातो अशा सात्विक गुंतवणुकीचे मूलतत्त्व आहेत.
एनएफओसाठी सबस्क्रीब्शन 24 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 8 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार 1000 रु. च्या कमीतकमी अर्ज किंमतीपासून गुंतवणूक सुरू करू शकतात आणि सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लन (एसआयपी) 250 रु. पासून सुरू करता येईल.
द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मधु लुनावत म्हणाल्या, “आम्ही स्पष्टता आणि ठाम विश्वासावर आधारलेला असा नवा आयाम म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी आणत आहोत. प्रवर्तकीय जोखीम चौकटी आणि संस्थात्मक दर्जाची काटेकोरता यांचा संगम साधून आम्ही गुंतवणूकदारांना त्यांच्या जीवन आणि संपत्तीच्या ध्येयांशी सुसंगत धोरण निवडण्यासाठी सक्षम करतो. मग ते दीर्घकालीन वाढ, भांडवलाची स्थिरता, नीतिमूल्यांवर आधारित गुंतवणूक किंवा तरलतेवरील लक्ष असो. प्रत्येक गुंतवणूक उद्देश्यपूर्ण, पारदर्शक आणि वाढीसाठी सक्षम बनवणे ही आमची संपत्ती निर्मितीची पुनर्व्याख्या आहे. ही योजनांची मालिका आमच्या म्युच्युअल फंड डीस्ट्रीब्यूटर (MFD) भागीदारांसाठी एक शक्तिशाली टूलकिट आहे. जोखीम टाळणाऱ्या निवृत्त गुंतवणूकदारापासून ते नीतिमूल्य शोधणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येक फंड एका विशिष्ट गरजेसाठी तयार केला आहे. संस्थात्मक गुणवत्ता संशोधन आणि सोपी, वितरक प्रथम प्रक्रिया यांचा संगम साधून आम्ही आमच्या MFD भागीदारांना मजबूत अंमलबजावणी आणि पारदर्शक सेवा पुरवतो.”
पारंपारिक म्युच्युअल फंड धोरणे केवळ ताळेबंद विश्लेषण यावर थांबतात पण द वेल्थ कंपनी प्रायव्हेट इक्विटी स्टाईल डीलीगन्स वापरते. त्यात सुरुवातीलाच जोखीम कळण्यासाठी फॉरेन्सिक आणि कायदेशीर पडताळणी केली जाते.
तसेच शक्तिशाली डॅशबोर्डद्वारे सतत निरीक्षण करून योग्य वेळी हस्तक्षेप करणे आणि नुकसान टाळणे शक्य होते. या पद्धतीमुळे गुंतवणूकदारांना प्रतिबंधात्मक दृष्टीकोन, तीव्र जोखीम व्यवस्थापन आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीबाबत अधिक विश्वास मिळतो.
द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडच्या CIO–Equity श्रीमती अपर्णा शंकर म्हणाल्या, “आमची गुंतवणूक पद्धत म्हणजे शिस्त आणि चपळता यांचा संगम आहे. फ्लेक्सी कॅप फंड मधील भांडवल वाटपाची तरलता असो किंवा एथीकल फंडमधील उच्च-ठाम, Exclusion-Based स्क्रीनिंग असो. प्रत्येक धोरण सखोल मुलभूत संशोधन आणि सातत्यपूर्ण तपासणी यावर उभारलेले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या भांडवलाचे रक्षण आणि वाढ दोन्ही सुनिश्चित होते.”
द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडचे डेब्ट विभागाचे सीआयओ श्री. उमेश शर्मा म्हणाले, “द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंडमध्ये आमच्या दृष्टीने निश्चित उत्पन्न योजनेचे आदर्श आधारस्तंभ स्पष्टता, सातत्य आणि भविष्याचा योग्य अंदाज घेणे आहे. गुंतवणूकदारांसाठी याचा अर्थ प्रत्येक फंडची तत्त्वे आणि पद्धत स्पष्ट समजणे व काळानुसार सातत्याने लागू करणे आहे. त्यामुळे आश्चर्यकारक बदल कमी होतील आणि आत्मविश्वास वाढेल. आमचे निश्चित उत्पन्न धोरण तीन मार्गदर्शक संकल्पनांवर आधारित आहे: स्थिरता, संचय आणि सक्रीय व्यवस्थापन. गुंतवणूकदार त्यांचा जादा निधी आणि वाटप त्यांच्या आर्थिक ध्येयांशी सुसंगत करू शकतात हे सुनिश्चित करत प्रत्येक पोर्टफोलिओ या तत्त्वांपैकी एकाशी संलग्न आहे. प्रत्येक फंड True-to-Label ठेवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, तसेच नियामक मार्गदर्शन तत्वांचे पूर्ण पालन केले जाते. आमच्या गुंतवणूकदारांचा विश्वास ही मालमत्ता व्यवस्थापनातील सर्वात मौल्यवान मालमत्ता निर्माण करणे आणि जपणे हे आमचे अंतिम ध्येय कामगिरीच्या पलीकडे जाणारे आहे.”
द वेल्थ कंपनी म्युच्युअल फंड आपला एनएफओ ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मवर सादर करणारी देशातील पहिली मालमत्ता व्यवस्थापन कंपनी ठरली असून म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिक सोपी आणि सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या ध्येयाला पुढे नेत कंपनीने सायब्रिला टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे.
Comments
Post a Comment