सनडान्स फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार प्राप्त ‘साबर बोंडं’ (कॅक्टस पिअर्स) चित्रपटाचा ट्रेलर
सनडान्स फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार प्राप्त ‘साबर बोंडं’ (कॅक्टस पिअर्स) चित्रपटाचा ट्रेलर,
१९ सप्टेंबरला देशभरात प्रदर्शित होणार,
अभिनेता राणा दग्गुबटी यांच्या स्पिरिट मीडियाकडून सिनेमाचे वितरण होणार
दिग्दर्शक रोहन कानवडे यांच्या ‘साबर बोंडं’ या चित्रपटाने सनडान्स फिल्म
फेस्टिव्हलमध्ये ग्रँण्ड ज्युरी प्राईज हा सर्वोच्च सन्मान पटकावून इतिहास रचला
आहे. हा पुरस्कार मिळणारा ‘साबर बोंडं’ हा पहिला भारतीय कथाभाष्यपट (फिक्शन) चित्रपट ठरला
आहे. या चित्रपटाला नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य
मोटवाणे यांसारख्या नामांकित कार्यकारी निर्मात्यांची भक्कम साथ मिळाली आहे.
जगविख्यात सनडान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५मध्ये
झळकलेल्या ‘साबर बोंडं’ (केक्चस पिअर्स) या चित्रपटाचे आज मुंबईत पार पडलेल्या विशेष पत्रकार
परिषदेत ट्रेलर अनावरण करण्यात आले.
दिग्दर्शक रोहन परशुराम कानवडे लिखित हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी
संपूर्ण देशभरात प्रदर्शित केला जाईल. प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबटी
यांच्या ‘स्पिरिट मीडिया’ यांच्यातर्फे या चित्रपटाचे वितरण केले जाईल. या अगोदर स्पिरिट मीडियाने कान्स
फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलेल्या ग्रँण्ड प्रिक्स विजेता ‘ऑल वी इमॅजिन अज लाईट’ हा
चित्रपट भारतात प्रदर्शित केला आहे.
सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातून तब्बल १७ हजार चित्रपटांचे
पुरस्कारांकरिता अर्ज आले होते. ‘साबर
बोंडं’ हा सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये
प्रवेश करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा
चित्रपट प्रदर्शितही झाला. या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला हा पहिला
मराठी चित्रपट ठरल्याने नवा इतिहास रचला गेला. ‘साबर बोंड’ हा चित्रपट आनंद नावाच्या शहरी
तरुणाच्या आयुष्यभोवती फिरतो. आनंद आपल्या वैयक्तिक आयुष्यात दुःखी आहे. कौटुंबिक
दडपणात जगणा-या आनंदला एकदा आपल्या मूळ गावी जावे लागते. अंत्यसंस्कारानंतरच्या
दहा दिवसांच्या विधीसाठी आनंद आपल्या गावी परततो. पश्चिम महाराष्ट्राच्या
निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या गावात आनंदला त्याचा बालपणीच मित्र बाल्या भेटतो.
बाल्याच्या संपर्कात आल्यावर आनंदला त्याच्या दुःखावर फुंकर घातली जाते. त्याला आपुलकी मिळते. बाल्या आनंदचे सांत्वन
करतो. ‘साबर बोंडं’ या चित्रपटात अभिनेता भूषण मनोज, सूरज सुमन आणि जयश्री जगताप
यांचा सशक्त अभिनय पाहायला मिळतो. प्रेम आणि मैत्रीच्या नाजूक बंधांचा या
चित्रपटात हळूवारपणे वेध घेतला गेला आहे.
‘साबर बोंड’ या चित्रटासाठी प्रसिद्ध चित्रपट
निर्माते नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवानी
यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. या दिग्गज मंडळीच्या
पाठिंब्याने हा चित्रपट आता भारतभर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपट
क्षेत्रातील मातब्बर मंडळींनी ‘साबर
बोंड’ चित्रपटासाठी कार्यकारी निर्मात्याची
भूमिका साकारल्याने या चित्रपटाचे सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित होते. ‘साबर बोंडं’ हा भारतीय
सिनेसृष्टीतील एक अविस्मरणीय चित्रपट ठरला असून, या चित्रपटाने मराठी कथाकथन
शैलीला जागतिक स्तरावर सन्मानित केले आहे.
(खालील माहितीची शहानिशा करा) ‘साबर बोंडं’ चित्रपटाच्या
ट्रेलर प्रदर्शनावेळी प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि स्पिरिट मीडियाचे प्रमुख
राणा दगुबट्टी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘‘ ‘साबर बोंडं’ चित्रपट
पहिल्यांदा पाहिल्यावरच हा चित्रपट माझ्या मनात खोलवर रुजला. मला फारच कमी चित्रपट
भावतात. चित्रपट संवेदनशीलतेने हाताळलेला असला तरीही सशक्त ठरतो. चित्रपटातील सर्व
पात्रांमध्ये मूळ कथानक गुंफले गेले आहे. पात्रांतील कथानकातूनच हा चित्रपट जगातील
कटू सत्य उलगडतो. रोहनने दिग्दर्शक आणि लेखक म्हणून पहिल्याच चित्रपटात दमदार
कामगिरी केली आहे. सनडान्स चित्रपट महोत्सवातील ग्रँण्ड ज्युरी पुरस्कार
मिळवल्याने या चित्रपटाने भारतीय सिनेमाची जगभरात दखल घ्यायला लावली. या
चित्रपटाशी भागीदारी केल्याने देशाच्या कानाकोप-यातील प्रेक्षकापर्यंत प्रभावी आणि
मनाला भिडणा-या कथा पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न प्रत्यक्षात साकारले जातील. हृदयाला
भिडणारा हा सुंदर चित्रपट प्रेक्षकांना लवकरच सिनेमागृहांत पाहता येईल याकरिता
आम्ही आनंदी आहोत.’’
चित्रपटाला सिनेसृष्टीतील मातब्बर कलाकारांकडून
भरभक्कम पाठिंबा मिळाल्याने दिग्दर्शक आणि लेखक रोहन परशुराम कानवडे यांनी
सर्वांचे आभार मानले. ‘‘हा चित्रपट माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग
आहे. ज्या लोकांनी, अनुभवांनी मला घडवले त्यातून हा चित्रपट साकारला गेला आहे.
चित्रपटासाठी मूळ संकल्पना साकारण्यापासून ते सनडान्समध्ये सन्मान मिळवून आता हा
चित्रपट मायदेशी परतला आहे. ‘साबर बोंड’ देशभरात प्रदर्शित होणे हे
माझ्यासाठी भावनिक तर आहेच परंतु अभिमानास्पद बाब आहे. स्पिरिट मीडियासोबत देशभरात
हा चित्रपट प्रदर्शित कऱणे हे फार खास आहे. नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई
ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवानी यांसारख्या दिग्गजांनी कार्यकारी निर्माते
म्हणून पाठिंबा दिल्याने हा प्रवास ख-या अर्थाने अर्थपूर्ण बनला. ‘साबर बोंडं’सारख्या
चित्रपटाला या नामवंतांनी सहकार्य करणे हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. या
पाठिंब्यामुळे मला मोठी ताकद मिळाली आहे.’’, या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त
केल्या.
‘साबर बोंडं’ चित्रपटाती
जागतिक स्तरावरील दैदीप्यमान कामगिरी पाहताना प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे
यांनीही आपले मत मांडले. चित्रपटातील सहभागाबद्दल बोलताना ते
म्हणाले, ‘‘मी फार जवळून मराठी चित्रपटाची भरभराहट
होताना पाहिली आहे. मराठी चित्रपट विकसित होत असताना ‘साबर बोंडं’ सारख्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक
कमावल्याचे पाहून अभिमान वाटतो. रोहन वैयक्तिक पातळीवर व्यापक स्वरुपात कथा
सांगतो. हीच बाब सिनेमाची दांडगी बाजू दर्शवते. हे चित्रपट पाहायला हवेत.
त्यांच्यावर चर्चा व्हायला हवी. या चित्रपटांची प्रशंसा होण्यासाठी रोहनच्या
पदार्पण काळातील अभूतपूर्व चित्रपटाला पाठिंबा देणे मला गरजेचे वाटले. मला हा
चित्रपटाला भारतात प्रदर्शित होण्याच्या प्रवासात भाग घेता आला ही माझ्यासाठी
सन्मानास्पद बाब आहे.’’
चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता निखिल अडवाणी यांनीही आपले योगदान
दिले आहे. ते म्हणाले. ‘‘ ‘साबर बोंडं’ म्हणजे
शुद्ध आणि अस्सल सिनेमा! हा चित्रपट सत्य परिस्थिती दर्शवतो. सार्वजनिक
पातळीवरील चित्रपट असल्याने अविस्मरणीय ठरतो. रोहनने संवेदनशीलतेने चित्रपटाची कथा
मांडली. मला ही संवेदनशीलता आणि रोहनचा प्रामाणिकपणा भावला. पदार्पण चित्रपटातच
इतकी परिपक्वता आणि खोलवर दृष्टीकोन बाळगणे खरोखरच उल्लेखनीय आहे. सिनेमा का
महत्त्वाचा आहे, याची जाणीव हा चित्रपट करुन देतो. म्हणूनच ‘साबर बोंडं’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रवासात सहभागी होणे
माझ्यासाठी फारच खास आहे. ही कलाकृती
सिनेमा १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यावर सिनेमागृहांत अनुभवावी, ही माझी
मनापासून इच्छा आहे.’’
कार्यकारी निर्मात्या सई ताम्हणकर म्हणाल्या,“ कार्यकारी निर्माती म्हणून या चित्रपटाशी जोडली गेल्याचा मला अतिशय आनंद
आहे. ‘साबर बोंडं’ ही सुंदर आणि संवेदनशील कथा आहे. त्याच हळुवारतेने ही कथा प्रेक्षकांपर्यंत
पोहोचवली गेली आहे. रोहनने निर्माण केलेल्या या जगातील पात्रं आपल्या अस्तित्वाची
चुणूक दाखवतात. चित्रपट संपल्यानंतरही ही पात्र प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात.
मला खात्री आहे की, भारतीय प्रेक्षक या चित्रपटाच्या हृदयस्पर्शी कथेशी आणि
त्याच्या सौंदर्याशी नक्कीच जोडले जातील. हा चित्रपट केवळ मराठी
चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी नवा रोमाचंक अध्याय
ठरतो. या चित्रपटासोबत जोडले गेल्याचा मला अभिमान आहे.’’
‘‘ ‘साबर बोंडं’ हा
आपल्या मातीशी जुळलेला चित्रपट असला तरीही जगभरात आढळून येणा-या समस्येबद्दल भाष्य
करतो.’’, असे कार्यकारी निर्माते विक्रमादित्य मोटवानी यांनी सांगितले. ‘‘रोहनने खरोखरंच काहीतरी विलक्षण निर्माण केले आहे. या विलक्षण निर्मितीला
अप्रतिम कलाकारांच्या टीमने जीवन दिले आहे. अशा चित्रपटामागे उभे राहण्याचा मला
अभिमान वाटतो. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेल्या एका स्व-अभ्यासू
दिग्दर्शकाने आपल्या पहिल्याच चित्रपटातून सनडान्स येथील ग्रँण्ड ज्युरी प्राईझ
जिंकणे ही खरोखरच ऐतिहासिक कामगिरी आहे. लवकरच भारतीय प्रेक्षकांना मोठ्या
पडद्यावर हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. याचा मला प्रचंड आनंद आहे.’’, असेही
ते म्हणाले.
‘साबर
बोंडं’ या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर
प्रशंसा मिळाली आहे. व्हॅनिस बिएनाले कॉलेज सिनेमा २०२२-२०२३ आणि एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्पअंतर्गत या
सिनेमाची निर्मिती झाली आहे. फिल्म लंडन प्रॉडक्शन फायनान्स मार्केट, एनएफडीसी मराठी स्क्रिप्ट कॅम्प, फिल्म बाजार कॉ-प्रॉडक्शन मार्केट, व्हेनिस
गॅप फायनान्सिंग मार्केट आणि गोज
टू कॅन्स
यांसारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय मंचावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला
आहे. ‘साबर बोंडं’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय सहकार्यातून तयार झालेल्या उत्कृष्ट प्रतिभेचे
दर्शन घडवतो. नीरज
चुरी (युके), मोहम्मद खाकी (कॅनडा), कौशिक रे (युके), नारेन चंद्रावरकर (भारत),
सिद्धार्थ मीर (भारत), हरीश रेड्डीपल्ली (भारत) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नेहा कौल या सहनिर्मात्या आहेत. प्रसिद्ध अभिनेता जिम सर्भ आणि सहयोगी निर्माते राजेश परवतकर सहयोगी निर्माते आहेत. ‘साबर बोंड’ हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी उल्लेखनीय टप्पा
मानाला जात आहे. विविध आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्याने या चित्रपटाने
अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
‘साबर
बोंडं’ हा उत्तर अमेरिकेतही प्रदर्शित केला जाईल. उत्तर
अमेरिकेतील स्ट्रँण्ड रिलीजिंग या प्रसिद्ध आर्टहाऊस बॅनरकडून या चित्रपटाचे वितरण
केले जाईल. स्ट्रँण्ड रिलीजिंग हे जगभरातील धाडसी आणि दूरदृष्टी असलेल्या चित्रपट
निर्मात्यांना प्रोत्साहन करण्यासाठी नावारुपास आलेली संस्था आहे. एमपीएम
प्रीमियमकडून या चित्रपटाची जागतिक विक्री केली जात आहे.
Comments
Post a Comment