त्रिशूरमधील कल्याणरामन निवासस्थानी तारे - तारकांच्या उपस्थितीत नवरात्र संध्याकाळ
त्रिशूरमधील कल्याणरामन निवासस्थानी
तारे - तारकांच्या उपस्थितीत नवरात्र संध्याकाळ
अक्षय कुमार, नागार्जुन, करिश्मा कपूर, तब्बू, मलायका अरोरा यांच्यासह बरेच जण #कल्याणनवरात्री उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी एकत्र
सिनेमा, परंपरा
आणि संस्कृतीचा एक सुंदर मिलाफ असलेल्या कल्याणरामन कुटुंबाच्या वार्षिक
नवरात्रोत्सवाने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रमुख व्यक्तींना
एकत्र आणले. यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.
कल्याणरामन निवासस्थानी आयोजित यंदाच्या नवरात्रौत्सवात समुद्र मंथनाच्या कथेचा देखावा साकारण्यात आला आहे.
या कथेत चांगल्या आणि वाईटाच्या शाश्वत संघर्षाचे प्रतीक असलेल्या समुद्रमंथनाचा
उल्लेख आहे. या सुंदर देखाव्याच्या केंद्रस्थानी कैलास पर्वत आणि पवित्र शिवलिंग
उभारण्यात आले आहे. विश्वाचे संतुलन राखणारे, परिवर्तनशील आणि दैवी चेतनेची वैश्विक शक्ती
म्हणून भगवान शंकरांना यात आदरांजली वाहिली आहे. या उत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व
वाढवत येथे सप्त मातृका देखील मांडण्यात आल्या होत्या. ज्यात आपण मातृदेवतेला
तिच्या सात दैवी रूपांमध्ये सन्मानित करतो. अंधकासुराचा पराभव करण्यासाठी या सप्तमाता
निर्माण झाल्या असे मानले जाते. त्या संरक्षण, समृद्धी आणि
आध्यात्मिक उन्नतीच्या शक्तींसाठी पूजनीय आहेत. थोडक्यात, या
अध्यात्मिक थीममध्ये परिवर्तन, सद्गुणांचा विजय तसेच पुरुष आणि स्त्रियांमधील
दैवी शक्तीचा पवित्र परस्परसंवादाचे चित्रण करण्यात आले.
या उत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे पारंपरिक
बोम्मई कोलू. यात बाहुल्या आणि मूर्तींचे एक उत्साही प्रदर्शन असते. त्यात दैवी
आणि दैनंदिन अशा दोनी जीवनांचे प्रतिबिंब असते. अनेक दक्षिण भारतीय घरांमध्ये ही
परंपरा आढळते. नवरात्राची परंपरा असलेल्या कल्याणरामन निवासस्थानी उभारलेल्या
कोलूमध्ये पौराणिक कथा, रोजच्या जगण्यातील दृश्ये तसेच देवी सरस्वती, पार्वती
आणि लक्ष्मी यांच्या उपस्थितीचे चित्रण करण्यात आले. पाहुण्यांचे आनंदाने स्वागत
करतानाच त्यांना भौतिक ते आध्यात्मिक प्रवासाचे प्रतीक असलेल्या या संपूर्ण
परंपरेचे महत्त्व सांगण्यात आले. उत्सवाच्या प्रत्येक गोष्टीत असलेले सांस्कृतिक
आणि भक्तीपूर्ण महत्त्व यातून मांडण्यात आले.
अक्षय कुमार, नागार्जुन आणि अमला, नाग चैतन्य आणि अखिल अक्किनेनी, करिश्मा कपूर, तब्बू, जेनेलिया देशमुख, मलायका अरोरा, श्रीलीला, कल्याणी प्रियदर्शन, प्रभू गणेशन आणि विक्रम प्रभू, सुचित्रा मोहनलाल, जयराम आणि पार्वथी, कालिदास जयराम आणि तारिणी, मालविका मोहनन, अखिल आणि अनूप सत्यनसह दिग्दर्शक सत्यन अथिक्कड, जयसूर्या, इंद्रजीत आणि पूर्णिमा, काव्या माधवन आणि दिलीप, क्रिती शेट्टी, रेजेना कॅसांड्रा, श्रिया पिळगावकर, श्रीलीला, सयामी खेर, प्रिया वारियर, पर्ल माने, नव्या नायर, सुप्रिया मेनन, लक्ष्मी गोपालस्वामी, ममता मोहनदास यांच्यासह चित्रपटसृष्टीतील प्रमुख व्यक्तिमत्त्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. याशिवाय रीताभरी चक्रवर्ती (पश्चिम बंगाल), पूजा सावंत (महाराष्ट्र) आणि किंजल राजप्रिया (गुजरात) या कल्याण ज्वेलर्सच्या प्रादेशिक ब्रँड अॅम्बेसेडर देखील यावेळी उपस्थित होत्या. या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे परंपरा आणि आधुनिकतेला जोडण्याची ब्रॅण्डची वचनबद्धता अधोरेखित झाली. या उत्सवाद्वारे कल्याणरामन कुटुंबाने कौटुंबिक पण नेत्रदीपक कार्यक्रम आयोजित करण्याचा वारसा चालू ठेवला आहे. या खासगी उत्सवात सिनेमा, संस्कृती आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ होता.



Comments
Post a Comment