एअरटेल बिझनेसने स्विफ्ट नेव्हिगेशनसोबत भागीदारी करून भारतातील पहिले नेक्स्ट-जेन स्पॅशियल प्रिसीजन सोल्यूशन लॉन्च केले आहे, जे सेंटीमीटर-लेव्हलपर्यंत अचूक लोकेशन प्रदान करेल
एअरटेल बिझनेसने स्विफ्ट नेव्हिगेशनसोबत भागीदारी करून भारतातील पहिले नेक्स्ट-जेन स्पॅशियल प्रिसीजन सोल्यूशन लॉन्च केले आहे, जे सेंटीमीटर-लेव्हलपर्यंत अचूक लोकेशन प्रदान करेल.
- सेंटीमीटर-लेव्हलपर्यंतची अचूकता, दाट लोकवस्ती असलेल्या भागात कामगारांची सुरक्षितता वीज आणि पाणी यासारख्या उपयुक्ततांचा पुरवठा व आवश्यक सेवांमध्ये सुधारणा करेल.
- हे अचूक समाधान ड्रायव्हर सहाय्य प्रणाली, स्वयं-ड्रायव्हिंग वाहने, उपग्रह टोल संकलन, डिजिटल नकाशे आणि वाहन व्यवस्थापन यासारख्या अनेक स्थान-आधारित अनुप्रयोगांमध्ये परिवर्तन घडवून आणेल.
एअरटेल बिझनेसने अचूक-लोकेशन तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी स्विफ्ट नेव्हिगेशनसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. या अंतर्गत भारताची पहिली एआय/एमएल-चालित, क्लाउड-आधारित लोकेशन सेवा – एअरटेल-स्कायलार्क™ प्रिसाईज पोझिशनिंग सर्विस सुरू केली जात आहे. ही सेवा पारंपरिक जीएनएसएस (ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम)च्या तुलनेत अचूकता 100 पटपर्यंत वाढवेल.
एअरटेल बिझनेस आणि स्विफ्ट नेव्हिगेशनची ही विशेष भागीदारी, एअरटेल-स्कायलार्क™ ला एअरटेलच्या संपूर्ण भारतभर पसरलेल्या मजबूत 4G/5G नेटवर्कसोबत जोडून सादर करेल. यामुळे एक विश्वसनीय आणि सहज उपलब्ध सेंटीमीटर-स्तरावरील अचूक लोकेशन सेवा मिळेल, ज्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर आवश्यक आणि लोकेशन-आधारित कामांसाठी केला जाऊ शकेल.
अनेक उद्योग या अचूक सेवेतून लाभ घेऊ शकतील, जसे की टोल वसुली, आपत्कालीन सेवा, डिजिटल नकाशे, बांधकाम कामे, वीज-पाणी यांसारख्या सुविधा, वाहन व्यवस्थापन आणि स्वयंचलित गाड्या. ही सेवा भारतातील शहरं आणि ग्रामीण भागात नवे बदल, अधिक कार्यक्षम कामकाज आणि जलद गतीने सेवा पुरविण्यास मदत करेल.
शरत सिन्हा, डायरेक्टर आणि सीईओ – एअरटेल बिझनेस, म्हणाले: “आपल्या सारख्या देशात, जिथे गल्ल्यांचा आणि वाड्यांचा गुंता आहे, तिथे प्रत्येक सेंटीमीटर अचूक लोकेशन किंवा पत्ता ओळखण्यात खूप मोठा फरक पडतो, विशेषतः आपत्कालीन सेवांसाठी (फर्स्ट रिस्पॉन्डर्स) महत्त्वाचा ठरतो. स्विफ्ट नेव्हिगेशनसोबत भागीदारी करून आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही भारताची पहिली क्लाउड-आधारित, एआय/एमएल-चालित जीएनएसएस करेक्शन्स सर्विस सुरू करत आहोत, जी सेंटीमीटर-स्तरावरील अचूकता प्रदान करेल. ही क्रांतिकारी तंत्रज्ञान केवळ आपत्कालीन सेवांचा कायापालट करणार नाही, तर औद्योगिक वापरांसाठी नवे मानक निश्चित करेल आणि स्वयंचलित गाड्या तसेच सॅटेलाइट-आधारित टोल वसुली यांसारख्या नवीन उपायांना देखील गती देईल.”
होल्गर इप्पाख, ईव्हीपी – प्रॉडक्ट आणि मार्केटिंग, स्विफ्ट नेव्हिगेशन, म्हणाले: “आम्ही एअरटेलसोबत मिळून स्कायलार्क भारतात आणण्यासाठी अत्यंत उत्साहित आहोत. एअरटेलच्या मजबूत IoT सेवा आणि सोल्यूशन्सच्या आधारे आम्ही देशभरातील व्यवसायांना आणि डेव्हलपर्सना सहजपणे अचूक लोकेशन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी मदत करत आहोत, ज्यामुळे कामकाज अधिक स्वयंचलित आणि आधुनिक होऊ शकेल.”
Comments
Post a Comment