शार्डियम ने दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूमधील भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या वेब३ समुदायांमध्‍ये प्रवेश केला

 शार्डियम ने दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूमधील भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या वेब३ समुदायांमध्‍ये प्रवेश केला


सप्‍टेंबर 23, 2025 : भारत २०२८ पर्यंत जगातील सर्वात मोठे वेब३ विकसक केंद्र बनण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना शार्डियम या ऑटोस्‍केलिंग लेअर-१ ब्‍लॉकचेनला देशातील आघाडीच्‍या नवोपक्रम सेंटर्सकडून मोठ्या प्रमाणात आकर्षण मिळत आहे. शार्डियमच्‍या ‘प्रूफ ऑफ कीज एअरड्रॉप' उपक्रमाला जागतिक स्‍तरावर चांगली स्‍वीकृती मिळाली, जेथे भारत देश नोंदणी पोर्टलवरील अभ्‍यागतांमध्‍ये १७ टक्‍के योगदान देत सर्व देशांमध्‍ये अग्रस्‍थानी होता, ज्‍यानंतर जपान, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचा क्रमांक होता. हा उपक्रम वापरकर्त्‍यांना रिवॉर्ड्सच्‍या बदल्‍यात ३० दिवसांसाठी त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या स्वयं-पालकत्व वॉलेट्समध्‍ये एसएचएम (SHM) टोकन्‍स (किमान १०० एसएचएम) ठेवण्‍यास प्रेरित करतो, वेब३च्‍या विक्रेंद्रीकरण आणि आर्थिक सार्वभौमत्‍वाच्‍या मुलभूत मूल्‍यांवर भर देतो.  

या वर्षाच्‍या अखेरपर्यंत स्मार्ट करार सुरू करण्‍याचे लक्ष्‍य असलेल्‍या शार्डियमचे मेननेट सध्‍या टोकन हस्‍तांतरणाला साह्य करते, तसेच सहभागींना त्‍यांच्‍या वॉलेट्समध्‍ये एकत्रित १.५ दशलक्षहून अधिक एसएचएम स्‍वत:हून सुरक्षित केले आहेत, ज्‍यामधून समुदायाचा नेटवर्कमधील प्रबळ आत्‍मविश्वास दिसून येतो.   

मुंबई-महाराष्‍ट्र: आर्थिक आधारस्तंभ 

मुंबई-महाराष्‍ट्र प्रांत जागतिक अभ्‍यागतांच्‍या अव्‍वल योगदानकर्त्‍यांमध्‍ये आहे, ज्‍यामधून भारतातील वेब३ विकासासाठी आर्थिक व सांस्‍कृतिक आधारस्तंभ म्‍हणून त्‍यांची भूमिका दिसून येते. प्रांतामध्‍ये मुंबई शहर अग्रस्थानी होते, ज्‍यानंतर पुणे, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर यांचा क्रमांक होता, ज्‍यामधून निदर्शनास येते की महाराष्‍ट्रातील शहरी व उदयोन्‍मुख केंद्रांमध्‍ये अवलंबन वाढत आहे. 

दिल्‍ली-एनसीआर: कॅपिटल केंद्र 

या योगदानामध्‍ये दिल्‍ली-एनसीआर दुसऱ्या क्रमांकावर आहे, जेथे पोर्टलवर सर्वाधिक अभ्‍यागतांनी नोंदणी केली, ज्‍यामुळे भारतातील आघाडीच्‍या प्रांतांपैकी एक आहे. येथे वाढत्‍या वेब३ समुदायामध्‍ये दिल्‍ली, गाजियाबाद, गुरूग्राम, नोएडा आणि रोहतकमधील योगदानांचा समावेश आहे, तसेच तरूण विकासक आणि विद्यार्थी समुदायांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

बेंगळुरू-दक्षिण भारत: तंत्रज्ञानाचे महाकेंद्र  

शार्डियम ला बेंगळुरूमधून देखील अधिक आकर्षण मिळाले आहे, जेथे भारतातील ‘सिलिकॉन व्‍हॅली' अव्‍वल योगदानकर्त्‍यांमध्‍ये सामील आहे. शहरातील प्रगत होत असलेली सखोल टेक व विकासक परिसंस्‍था देशभरात ब्‍लॉकचेन अवलंबला गती देत आहे, दक्षिण भारतातील विद्यार्थी व स्‍टार्टअप्‍स मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. 

पहिल्‍यांदाच प्रमुख लेअर-१ ब्‍लॉकचेनने सेल्‍फ-कस्‍टडी आणि आर्थिक सार्वभौमत्‍वाशी संबंधित एअरड्रॉप लाँच केले आहे, जे विकेंद्रीकरणाच्‍या पायाभूत मूल्‍यांनी संलग्‍न आहे.

शार्डियमचे सह-संस्‍थापक निश्‍चल शेट्टी म्‍हणाले, “भारत वेब३ मध्‍ये जागतिक अग्रणी म्हणून झपाट्याने उदयास येत आहे आणि प्रूफ ऑफ कीज उपक्रमाला मिळालेल्‍या प्रतिसादामधून ते स्‍पष्‍टपणे दिसून येते. राजधानी क्षेत्र दिल्‍ली-एनसीआरपासून मुंबई सारखे आर्थिक केंद्र आणि बेंगळुरू सारख्‍या टेक हब्‍सपर्यंत सखोल सहभागामधून निदर्शनास येते की, भारतात वेब३ अवलंबन फक्‍त महानगरांपर्यंत मर्यादित नाही तर देशभरात पसरत आहे. शार्डियम मध्‍ये आमचे ब्‍लॉकचेन निर्माण करण्‍याचे ध्येय आहे, जे विकासात्‍मक, सहजसाध्य व समुदाय-संचालित असेल आणि भारत या दृष्टिकोनामध्‍ये अग्रस्‍थानी आहे.'' 

सेल्‍फ-कस्‍टडी आणि दीर्घकालीन सहभागाला चालना देत शार्डियम जबाबदार ऑन-चेन पद्धतींना निपुण होण्‍यास मदत करत आहे, ज्‍या वेब३ च्‍या विकेंद्रीकरण व मालकीहक्‍काच्‍या मुलभूत मूल्‍यांशी संलग्‍न आहेत. उपक्रमाला मिळालेल्‍या प्रतिसादामधून भारतातील प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये व्‍यापक अवलंबन दिसून येते. तसेच या स्‍तरीय सहभागामधून शहरी हितापासून तळागाळातून उत्‍साह देखील निदर्शनस येतो. शार्डियम वास्‍तविक उपयुक्‍तता आणि मूल्‍याला चालना देण्‍यासाठी देशभरातील विद्यार्थी, विकासक व स्‍टार्टअप्‍सशी संलग्‍न होत या गतीला अधिक दृढ करत आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth