मुंबई उपनगर जिल्ह्यामधून गणेशोत्सव स्पर्धेत चित्रनगरीचा प्रथम क्रमांक सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मुंबई उपनगर जिल्ह्यामधून गणेशोत्सव स्पर्धेत चित्रनगरीचा प्रथम क्रमांक
सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मुंबई २५ :- राज्य शासनाने आयोजित केलेल्या यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यामधून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या गणेश उत्सव समितीला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात वित्तीय सल्लागार मुख्यलेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे आणि चित्रनगरी उत्सव समितीच्या पदाधिकारी यांनी पुरस्कार स्वीकारला.
पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील , सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी उत्सव समितीचे अभिनंदन केले.
गेल्या ३२ वर्षांपासून दादासाहेब फाळके चित्रनगरीत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या उत्सव समितीने यंदाही मोठ्या थाटामाटात चित्रनगरीच्या राजा'ची प्राणप्रतिष्ठापना केली होती.
त्याचबरोबर यंदाच्या गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य व पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील किल्ले व जिंजी किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जीवनपट उलगडण्यात आला होता. या देखाव्याला पहिल्या दिवसापासून भाविकांची पसंती मिळाली होती. यंदा शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेत बक्षीस मिळाल्याने उत्सव समितीनेदेखील प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment