चॅटरबॉक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २५ सप्टेंबर
२०२५ रोजी खुला होणार
●
एकूण
इश्यूचा
आकार
– ₹10
दर्शनी
मूल्याच्या
एकूण
37,27,200 इक्विटी शेअर्सपर्यंत
●
आयपीओचा
एकूण
आकार
– ₹42.86 कोटी (वरच्या
किंमत
पट्ट्यावर)
●
किंमत
पट्टा
– ₹110 ते ₹115 प्रति शेअर
●
लॉट
साइज
– 1,200 इक्विटी शेअर्स
चॅटरबॉक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी डिजिटल आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग सेवा तसेच सोशल मीडियाचे व्यवस्थापन या सेवा चटरबॉक्स आणि चटरसोशल या दोन विभागांद्वारे पुरवते. ही कंपनी आपला प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO) गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी खुली करणार असून, ₹42.86 कोटी उभारण्याचा उद्देश आहे. कंपनीचे समभाग BSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. या
इश्यूचा
आकार
₹10
दर्शनी
मूल्याचे 37,27,200 इक्विटी शेअर्स असून, त्यासाठीचा किंमत पट्टा ₹110 ते ₹115 प्रति शेअर इतका निश्चित करण्यात आला आहे.
इक्विटी शेअर
वाटप
●
क्यूआयबी
अँकर
हिस्सा
– 10,59,600 इक्विटी
शेअर्स
पर्यंत
●
प्रवर्ग
अर्हताप्राप्त
संस्थागत
गुंतवणूकदार
(QIB) – 7,06,800 इक्विटी
शेअर्स
पर्यंत
●
असंस्थागत
गुंतवणूकदार
– किमान
5,32,800 इक्विटी
शेअर्स
●
खासगी
(इंडिव्हिज्युअल)
गुंतवणूकदार
– किमान
12,40,800 इक्विटी
शेअर्स
●
मार्केट
मेकर
– 1,87,200 इक्विटी
शेअर्स
या आयपीओमधून
मिळणारा निव्वळ निधी सध्याच्या व्यवसायासाठी भांडवली गरजा पूर्ण करणे, नवीन कार्यालय व स्टुडिओ स्थापनेसाठी भांडवली खर्च, कंपनीच्या ब्रँड बिल्डिंगसाठी निधी, वर्किंग कॅपिटलची गरज, आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी
वापरण्यात येणार आहे. अँकर पोर्शन २४ सप्टेंबर २०२५ रोजी खुला होईल, तर मुख्य इश्यू २९ सप्टेंबर २०२५ रोजी बंद होईल.
या
इश्यूसाठी
बुक
रनिंग
लीड
मॅनेजर
म्हणून
एक्स्पर्ट
ग्लोबल
कन्सल्टंट्स
प्रायव्हेट
लिमिटेड
कार्यरत
आहे
आणि
नोंदणी
प्राधिकारी
(रजिस्ट्रार)
म्हणून
बिगशेअर
सर्व्हिसेस
प्रायव्हेट
लिमिटेड
नियुक्त
करण्यात
आले
आहे.
चॅटरबॉक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राज मिश्रा यांनी व्यक्त केले की, "Chtrbox
च्या प्रवासातील हा आयपीओ एक अत्यंत अभिमानाचा टप्पा आहे. एका मोठ्या कल्पनेसोबत छोट्या टीमने सुरुवात करून, आज आपण भारतातील आघाडीच्या इन्फ्लुएंसर मार्केटिंग आणि सोशल मीडिया कंपन्यांपैकी एक झालो आहोत. चटरबॉक्स ने नेहमीच सर्जनशीलता आणि समुदाय यांच्या संगमावर उभे राहून काम केले आहे. या लिस्टिंगमधून मला सर्वात जास्त उत्साह देणारी गोष्ट म्हणजे केवळ भांडवली उभारणी नाही, तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या असंख्य संधी — नावीन्यतेसाठी, आमचा आवाका वाढवण्यासाठी, आणि भारतातील ब्रँड्स व क्रिएटर्ससाठी जागतिक स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी. हा क्षण आमच्या ग्राहक, क्रिएटर्स आणि भागीदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे आणि आमच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात दर्शवतो. या भांडवलाच्या माध्यमातून, आम्ही आमची तंत्रज्ञान क्षमता बळकट करू, सर्जनशीलतेची व्याप्ती वाढवू, आणि भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या वाढीला गती देऊ. आमचा स्पष्ट दृष्टिकोन आहे — ब्रँड्सना संस्कृती, क्रिएटर्स आणि समुदायांशी जोडण्याचा नव्या पद्धतीने अनुभव देणे आणि चॅटरबॉक्स ला भारतातून एक जागतिक आघाडीची कंपनी बनवणे."
चॅटरबॉक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन श्री. कर्ट माव्हिस यांनी व्यक्त केले की, "हा आयपीओ चॅटरबॉक्स टेक्नॉलॉजीजसाठी आणि व्यापक QYOU मीडिया कुटुंबासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. चॅटरबॉक्सने नेहमीच भारतातील ब्रँड्ससाठी सर्जनशीलता, मोजता येणारा परिणाम आणि सांस्कृतिक संदर्भ या सर्व बाबतींत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या आयपीओद्वारे कंपनीला अधिक वेगाने वाढता येईल, नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये गुंतवणूक करता येईल, आणि भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या डिजिटल क्षेत्रात नवीन संधी साधता येतील.
QYOU मध्ये आम्ही चॅटरबॉक्सकडे आमच्या जागतिक रणनीतीतील एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून पाहतो आणि आम्हाला खात्री आहे की राज आणि त्यांची टीम उद्योगासाठी नवीन मापदंड निर्माण करत राहतील."
एक्स्पर्ट ग्लोबल कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री गौरव जैन यांनी म्हणाले, "चॅटरबॉक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आयपीओच्या प्रवासाला आम्ही पाठिंबा देत असल्याचा आम्हाला आनंद आहे. कंपनीने आपल्या दोन विभागांद्वारे – चटरबॉक्स आणि चटरसोशल – डिजिटल आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंग क्षेत्रात मजबूत प्रतिष्ठा निर्माण केली आहे. सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि मोजता येणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करून, चॅटरबॉक्सने ब्रँड्सना योग्य इन्फ्लुएंसरशी जोडून आणि आकर्षक कंटेंट व कथाकथनाद्वारे मजबूत डिजिटल ओळख निर्माण करून सातत्याने मूल्य प्रदान केले आहे."
जागतिक स्तरावर, डिजिटल मार्केटिंग आणि इन्फ्लुएंसर इकोसिस्टम वेगाने बदलत आहे, ज्यामुळे ब्रँड्स अधिकाधिक प्रमाणात क्रिएटर्स आणि नाविन्यपूर्ण कंटेंटचा वापर करून आपल्या प्रेक्षकांशी संपर्क साधत आहेत. हा प्रवाह कंपन्या कशा प्रकारे विश्वास निर्माण करतात, समुदायांना जोडतात आणि वाढीस चालना देतात हे पुनर्परिभाषित करत आहे. चॅटरबॉक्स टेक्नॉलॉजीज, आपल्या सिद्ध तज्ज्ञतेने, तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोनाने आणि वाढत्या जागतिक उपस्थितीमुळे, या उद्योगाच्या गतीनुसार वाढण्यासाठी सज्ज आहे. आयपीओमुळे कंपनीला आपली पायाभरणी मजबूत करण्यासाठी, ब्रँड बिल्डिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि क्षमता वाढवण्यासाठी संधी मिळेल, ज्यामुळे ती बदलत्या डिजिटल वातावरणातील एक महत्त्वाची खेळाडू म्हणून स्थान मिळवेल."
Comments
Post a Comment