इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेडचा IPO 30 सप्टेंबर 2025 रोजी खुला होणार आहे
इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेडचा
IPO 30 सप्टेंबर 2025 रोजी खुला होणार आहे
● एकूण इश्यू साईज – ₹10 दर्शनी
मूल्यासह एकूण 15,75,200 इक्विटी शेअर्स
● IPO साईज – ₹24.42 कोटी (उच्च
किंमत बँडवर)
● किंमत बँड – ₹147 ते ₹155 प्रति शेअर
● लॉट साईज – 800 इक्विटी शेअर्स
मुंबई, 23 सप्टेंबर 2025 – इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेड (कंपनी, इन्फिनिटी) ही
एक SaaS प्रदाता कंपनी आहे, जी कस्टमाइज्ड
आणि इंटीग्रेटेड ERP (एंटरप्राइझ
रिसोर्स प्लॅनिंग) सोल्युशन्स देण्यात माहिर आहे. शिक्षण, उत्पादन, रिटेल आणि
कन्स्ट्रक्शन यांसारख्या क्षेत्रांतील ग्राहकांना ही कंपनी सेवा देते. कंपनीचा
IPO मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
रोजी खुला होणार असून ₹24.42 कोटी
उभारण्याचा उद्देश आहे. हे शेअर्स BSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.
• QIB अँकर पोर्शन – 4,08,000 शेअर्सपर्यंत
• क्वालिफाइड
इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB) – 2,72,800 शेअर्सपर्यंत
• गैर-संस्थात्मक
गुंतवणूकदार (NII) – किमान 2,06,400 शेअर्स
• खाजगी / वैयक्तिक गुंतवणूकदार – किमान 4,79,200 शेअर्स
• कर्मचारी राखीव
वाटा – 1,29,600 शेअर्सपर्यंत
• मार्केट मेकर – 79,200 शेअर्स
भवेशकुमार धीरजलाल गधेथरिया, प्रमोटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर, इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेड म्हणाले: "IT क्षेत्रातील 17 वर्षांहून अधिक अनुभवासह, इन्फिनिटी इन्फोवे लिमिटेडने शिक्षण, उद्योग व शासकीय संस्थांसाठी प्रभावी SaaS सोल्युशन्स देण्यात सातत्य दाखवले आहे. हा IPO आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो आमच्या सेवा आणखी बळकट करेल आणि विस्तारास गती देईल. आज आम्ही 38 विद्यापीठे आणि 11 उद्योग क्षेत्रांमध्ये आमची मजबूत उपस्थिती दर्शवत आहोत, आमच्या कॅम्पस मॅनेजमेंट सिस्टीम आणि इन्फिनिटी ईआरपी च्या माध्यमातून कार्यक्षमतेला चालना देत आहोत."
Comments
Post a Comment