होम क्रेडिट इंडियातर्फे उत्सवी आनंद, कौटुंबिक बंध, लाईफस्टाईल तसेच जबाबदारीपूर्वक सुधारणांकरिता #UpgradeWaaliDiwali कॅम्पेन लॉन्च
होम क्रेडिट इंडियातर्फे उत्सवी आनंद, कौटुंबिक बंध, लाईफस्टाईल तसेच जबाबदारीपूर्वक सुधारणांकरिता #UpgradeWaaliDiwali कॅम्पेन लॉन्च
होम क्रेडिट इंडिया या आघाडीच्या ग्राहक वित्त कंपनीने आज आपले नवीन फेस्टिव्ह कॅम्पेन -#UpgradeWaaliDiwaliची घोषणा केली. #ZindagiHit! या ब्रँडच्या विचारांचा विस्तार, जीवनशैली आणि जबाबदाऱ्या अद्ययावत करून सोपे आणि तणावमुक्त बनवणाऱ्या होम क्रेडिट इंडियाच्या आर्थिक उपाययोजनांचा साधेपणा आणि सोय अधोरेखित करून देशभरातील ग्राहकांसाठी उत्सवी उत्साह निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. हे नवीन कॅम्पेन होम क्रेडिट इंडिया’ची सोशल चॅनल जसे की फेसबुक,इंस्टाग्रामस,यूट्यूब आणि लिंक्डइनसह डिजिटल मंचांवर लाईव्ह आहे.
#UpgradeWaaliDiwali कॅम्पेनने यावर जोर दिला आहे की एखाद्याची जीवनशैली सुधारणे ही एक स्मार्ट निवड आहे. परंतु परंपरा आणि कौटुंबिक बंध कायम राखण्यामुळे खरोखर अर्थपूर्ण दिवाळी साजरी होते. हे कॅम्पेन केवळ भौतिक सुधारणाच नव्हे तर कौटुंबिक संबंधांना बळकटी देणाऱ्या कर्तबगारी सुधारणा देखील साजऱ्या करते.
कॅम्पेनची स्टोरीलाईन
वडील, मुलगा आणि नातू अशा तीन पिढ्यांसह एका चैतन्यमय संयुक्त कुटुंबात हा व्हिडिओ सुरू होतो.
संपूर्ण कुटुंब दिवाळीच्या तयारीत व्यस्त असताना, वडील त्यांच्या जुन्या फोनशी झगडत खरेदीच्या निर्णयांचा ताळमेळ साधताना दिसतात. मुलगा शांतपणे पुढे येतो, सोप्या सुधारणा सुचवतो. ज्यामुळे वडील चिडतात. त्यांच्या मुलाने आता घरातील सर्व निर्णयांची जबाबदारी घेण्यास सुरुवात केली असल्याचे वैतागून म्हणतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी, वडील जागे होतात तेव्हा त्यांना त्यांच्या बेडच्या बाजूच्या टेबलावर एक नवीन फोन सापडतो. सोबतच त्यांच्या मुलाची एक भावपूर्ण चिठ्ठी असते. जबाबदाऱ्या वाटून घेण्याची इच्छा व्यक्त करताना पत्रात वडिलांना कुटुंबात त्यांची जागा कुणीही घेणं अशक्य असल्याची कबुली असते. हे हृदयस्पर्शी भाव पिढ्यांमधील दरी भरून काढतात. जे सर्वांना बांधून ठेवण्याची जबाबदारी पार पाडतात तेच खरे नायक असतात हा संदेश अधोरेखित होतो. अभिमानाने आणि आनंदाने हसत असलेल्या वडिलांच्या प्रेमळ मांडणीसह हे कथानक संपते. ग्राहक टिकाऊ वस्तू, मोबाइल फायनान्स
आणि टू-व्हीलर फायनान्ससाठी विश्वासार्ह भागीदार असलेल्या होम क्रेडिट इंडियाला आपली पसंती का आहे हे या कॅम्पेनमधून उलगडले आहे.
नवीन दिवाळी कॅम्पेनविषयी बोलताना, होम क्रेडिट इंडिया’चे चीफ मार्केटिंग ऑफिसर आशिष तिवारी म्हणाले, “भारतातील सण हे सर्व भावना, एकता आणि स्वप्नं पूर्ण करण्याबद्दल आहेत. #UpgradeWaaliDiwali सह, होम क्रेडिट इंडिया कुटुंबांना तडजोड न करता साजरा करण्यास कसे सक्षम करीत आहे हे दर्शविताना आम्हाला ही भावना पकडायची होती. आमचे साधे आणि ग्राहक-स्नेही वित्तपुरवठा पर्याय (फायनान्स ऑप्शन) हे सुनिश्चित करतात की एखाद्याची जीवनशैली अद्ययावत करणे, मग ती उपकरणे, गॅझेट किंवा घरगुती गरजा असो, ते सहजतेने होते. केवळ आर्थिक सहाय्य करण्यापेक्षा, आपण स्पर्श करत असलेल्या प्रत्येक घरात आनंद, अभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करण्याबद्दल आहे.”
#UpgradeWaaliDiwali सह, होम क्रेडिट इंडिया प्रत्येकासाठी आर्थिक उपाय सुलभ आणि सोयीस्कर बनवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देते. कुटुंबांना त्यांच्या जबाबदाऱ्या आणि जीवनशैली अद्ययावत करण्यासाठी सक्षम करून, हा ब्रँड सणासुदीचे उत्सव केवळ नवीन उत्पादनांबद्दल नसून सामायिक आनंद, अभिमान आणि मजबूत बंधांबद्दल आहेत जे प्रत्येक क्षण खरोखरच #ZindagiHit करतील याची सुनिश्चितता करतात.
Comments
Post a Comment