भारत सरकारने इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 अंतर्गत तीन ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजसाठी अर्ज मागविले आहेत.

 भारत सरकारने इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 अंतर्गत तीन ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजसाठी अर्ज मागविले आहेत.

सर्वसमावेशक, जबाबदार आणि विस्तारक्षम एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) नवोन्मेषांना गती देण्यासाठी, मा. अश्विनी वैष्णव, माननीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री तसेच रेल्वे मंत्री, यांनी गेल्या महिन्यात तीन प्रमुख ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजच्या शुभारंभाची घोषणा केली होती. ही आव्हाने ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये प्रदर्शित केली जाणार आहेत, ज्याचे आयोजन 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्लीत करण्यात येईल. ही आव्हाने आता अधिकृत समिट संकेतस्थळावर उपलब्ध आहेत: https://impact.indiaai.gov.in/

ही तीन आव्हाने — एआय फॉर ऑल: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज, एआय बाय हर: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज, आणि युवाई: ग्लोबल यूथ चॅलेंज — यांचा उद्देश सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मोठा प्रभाव निर्माण करू शकणाऱ्या परिवर्तनशील एआय-आधारित उपायांची ओळख पटवणे, त्यांचे संवर्धन करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे हा आहे. या उपक्रमांद्वारे नवकल्पकांना मार्गदर्शन, गुंतवणूकदारांशी संपर्क आणि त्यांच्या कल्पना विस्तारण्यासाठी जागतिक मंच उपलब्ध करून दिला जाईल. अर्ज सादर करण्यासाठी नोंदणी आज, 10 ऑक्टोबर 2025, पासून खुली आहे.

चॅलेंज झलक

1) एआय फॉर ऑल: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज

जागतिक स्तरावर अशा एआय नवोन्मेषांसाठी एक आवाहन, जे मोठ्या प्रमाणावर उच्च संभाव्य मूल्य दर्शवतात आणि राष्ट्रीय तसेच जागतिक गरजांना प्रतिसाद देतात. या चॅलेंजद्वारे शेती, हवामान आणि शाश्वतता, शिक्षण, आर्थिक समावेशन, आरोग्यसेवा, उत्पादन, नागरी पायाभूत सुविधा आणि गतिशीलता यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये वापरता येणाऱ्या एआय उपायांना आमंत्रित केले जाते. तसेच ‘वाइल्डकार्ड/ओपन इनोव्हेशन’ ट्रॅकसुद्धा उपलब्ध आहे.

पुरस्कार आणि सहाय्य:

शीर्ष 10 विजेत्यांसाठी कमाल INR 2.5 कोटींचे पारितोषिक.

20 अंतिम फेरीतील स्पर्धक (प्रत्येकी जास्तीत जास्त दोन सदस्य) यांना ‘इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास सहाय्य दिले जाईल.

मार्गदर्शन, गुंतवणूकदारांशी संपर्क, कम्प्युट/क्लाउड क्रेडिट्स आणि समिटनंतरच्या अॅक्सेलरेटर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

पात्रता: विद्यार्थी, संशोधक, व्यावसायिक, कंपन्या आणि स्टार्टअप्स — ज्यांच्याकडे पायलट स्तरावर असलेले किंवा विस्तारासाठी तयार एआय उपाय आहेत — त्यांच्यासाठी हे आव्हान जागतिक स्तरावर खुले आहे.

येथे अर्ज करा- https://impact.indiaai.gov.in/events/ai-for-all 

2) एआय बाय हर: ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंज

महिला-नेतृत्वाखालील एआय नवोन्मेषांची साखळी मजबूत करण्यासाठी समर्पित हे आव्हान ‘वीमेन आंत्रप्रेन्युअरशिप प्लॅटफॉर्म (WEP)’, नीती आयोग यांनी इतर ज्ञान भागीदारांच्या सहकार्याने आयोजित केले आहे. अर्जदारांना शेती, सायबरसुरक्षा आणि डिजिटल कल्याण, शिक्षण, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि हवामान तसेच ‘वाइल्डकार्ड/ओपन इनोव्हेशन’ या क्षेत्रांमध्ये ठोस सामाजिक प्रभाव निर्माण करणारे एआय उपाय सुचवण्यासाठी आमंत्रित केले जाते.

पुरस्कार आणि सहाय्य:

शीर्ष 10 विजेत्यांसाठी कमाल INR 2.5 कोटींचे पारितोषिक.

जास्तीत जास्त 30 अंतिम फेरीतील स्पर्धक (प्रत्येकी दोन सदस्यांपर्यंत) यांना समिटला उपस्थित राहण्यासाठी प्रवास सहाय्य दिले जाईल.

‘रिस्पॉन्सिबल एआय’, ‘इन्व्हेस्टर रेडिनेस’ आणि ‘स्टोरीटेलिंग’ या विषयांवरील आभासी बूटकॅम्प्सचे आयोजन.

उच्च क्षमतेच्या 30 संघांसाठी  निवडक गुंतवणूकदार संवाद सत्रे आयोजित केली जातील.

पात्रता: कार्यरत प्रोटोटाइप किंवा विकसित एआय सोल्यूशन असलेल्या महिला-नेतृत्वाखालील संघ , विद्यार्थिनींचे  संघ  किंवा महिला-प्रमुख संस्था यांच्यासाठी हे आव्हान जागतिक स्तरावर खुले आहे.

येथे अर्ज करा - https://impact.indiaai.gov.in/events/ai-by-her

3) युवाई: ग्लोबल यूथ चॅलेंज

तरुण नवोन्मेषकांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेला हा उपक्रम 13–21 वयोगटातील व्यक्ती किंवा दोन सदस्यांच्या संघांसाठी  आहे, ज्यांचा उद्देश सार्वजनिक हितासाठी एआय उपाय विकसित करणे हा आहे. या चॅलेंजसाठी सुचवलेले विषय म्हणजेच लोक आणि समुदायांना सशक्त करणे, प्रमुख क्षेत्रांचे रूपांतर करणे, तसेच भविष्योन्मुख पायाभूत सुविधा आणि स्मार्ट परिसंस्था उभारणे. याशिवाय ‘वाइल्डकार्ड/ओपन इनोव्हेशन’ श्रेणीही समाविष्ट आहे.

पुरस्कार आणि सहाय्य:

एकूण INR 85 लाख किमतीची पारितोषिके, ज्यामध्ये समाविष्ट आहे:

o शीर्ष 3 विजेत्यांना प्रत्येकी INR 15 लाख

o पुढील 3 विजेत्यांना प्रत्येकी INR 10 लाख

o 2 विशेष गौरव पारितोषिके प्रत्येकी INR 5 लाख

शीर्ष 20 सहभागींसाठी समिटमध्ये सहभागासाठी प्रवास सहाय्य.

10 दिवसांचे आभासी बूटकॅम्प्स, गुंतवणूकदारांसमोर सादरीकरणाच्या संधी, तसेच कायमस्वरूपी ऑनलाइन प्रदर्शन आणि संकलन (compendium) प्रकाशनाची सुविधा.

पात्रता: कार्यरत प्रोटोटाइप, पीओसी (POC) किंवा वापरासाठी तयार एआय उपाय असलेल्या 13–21 वयोगटातील तरुण नवोन्मेषकांसाठी हे आव्हान जागतिक स्तरावर खुले आहे. येथे अर्ज करा - https://impact.indiaai.gov.in/events/yuvai

कालमर्यादा आणि प्रमुख दिनांक

अर्ज सादरीकरणासाठी प्रारंभ: ऑक्टोबर 10, 2025

अर्ज सादरीकरणाची शेवटची तारीख: ऑक्टोबर 31, 2025

आभासी बूटकॅम्प्स: नोव्हेंबर 2025

अंतिम फेरीतील स्पर्धकांची घोषणा: डिसेंबर 31, 2025

ग्रँड शोकेस: इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 (फेब्रुवारी 16–20, 2026, नवी दिल्ली)

अर्ज कसा करावा

तीनही ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजेससाठी अर्ज अधिकृत पोर्टलद्वारे सादर करता येतील: www.impact.indiaai.gov.in 

प्रत्येक चॅलेंजच्या पृष्ठावर पात्रतेची निकष, कालमर्यादा, अर्ज सादरीकरणाच्या सूचना, संमतीपत्रे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. अर्जदारांना सर्व सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा आणि निवड व सहभागासंबंधी अद्यतने तसेच घोषणांसाठी संकेतस्थळ नियमित तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth