पॅण्‍टालून्‍सकडून पहिल्‍यांदाच त्‍यांची ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून सामंथा रूथ प्रभू यांचे स्‍वागत

 पॅण्‍टालून्‍सकडून पहिल्‍यांदाच त्‍यांची ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून सामंथा रूथ प्रभू यांचे स्‍वागत

~ विशेष उत्‍सवी मोहिम 'स्‍पार्क युअर इमॅजिनेशन'चे अनावरण ~


मुंबई, ऑक्‍टोबर ६, २०२५: पॅण्‍टालून्‍स या भारतातील सर्वात लोकप्रिय व विश्वसनीय फॅशन ब्रँडने आज प्रख्‍यात अभिनेत्री व स्‍टाइल आयकॉन सामंथा रूथ प्रभू यांची पहिलीच ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून स्‍वागत करत स्‍टाइलमधील नवीन युगाची घोषणा केली. हा सहयोग पॅण्‍टालून्‍सच्‍या प्रवासामधील महत्त्वपूर्ण क्षण आहे, जो ब्रँडला आधुनिक, आकर्षक व ट्रेण्‍ड पुढे घेऊन जाणाऱ्या फॅशनमध्‍ये अग्रस्‍थानी घेऊन जातो. 

या सहयोगाला साजरे करण्‍यासाठी पॅण्‍टालून्‍सने उत्‍सवी मोहिम 'स्‍पार्क युअर इमॅजिनेशन' लाँच केली आहे, ज्‍यासह आधुनिक काळातील भारतीयांना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या फॅशन गाथा तयार करण्‍यास प्रेरित करण्‍याचे ब्रँडचे नवीन तत्त्व प्रत्‍यक्षात आणत आहे. या मोहिमेमधून प्रत्‍येक ग्राहकाला प्रेरित करण्‍याची, बिनधास्तपणे प्रयोग करण्‍याच्‍या आणि आत्‍मविश्वसाने स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या सर्जनशीलतेला चालना देण्‍याचे पॅण्‍टालून्‍सचे मिशन दिसून येते. या स्‍टाइल प्रवासाचे नेतृत्‍व करण्‍यासाठी ब्रँडने खरी फॅशन ट्रेलब्‍लेझर सामंथा रूथ प्रभू यांना ऑनबोर्ड केले आहे. 

याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत पॅण्‍टालून्‍स व OWND! च्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी संगीता तनवानी म्‍हणाल्‍या, '''स्‍पार्क युअर इमॅजिनेशन' उत्‍सवी मोहिमेपेक्षा अधिक असून पॅण्‍टालून्‍ससाठी नवीन अध्‍यायाची सुरूवात आहे. आज फॅशन म्‍हणजे सर्जनशीलता, उत्‍साह व वैयक्तिक अभिव्‍यक्‍ती आणि आमचा प्रत्‍येक ग्राहकाला स्‍वत:कडे निर्माता म्‍हणून पाहण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. सामंथा रूथ प्रभू यांच्‍यामध्‍ये तोच उत्‍साह दिसून येतो. त्‍या आत्‍मविश्वासू, उत्‍साही आणि प्रयोग करण्‍यासाठी बिनधास्त आहेत. त्‍यांच्‍यासह पॅण्‍टालून्‍स आधुनिक काळातील भारतीयांना प्रशंसित करण्‍यास सज्‍ज आहे, जे फॅशनचा अवलंब करण्‍यासोबत त्‍यांचे भावी आकर्षक लुक देखील तयार करतात.''

पॅण्‍टालून्‍सचा चेहरा बनण्‍याबाबत सामंथा रूथ प्रभू म्‍हणाल्‍या, ''माझ्यासाठी फॅशन म्‍हणजे स्‍वत:ला अभिव्‍यक्‍त करणे आणि पॅण्‍टालून्‍स त्‍या विश्वासाशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. 'स्‍पार्क युअर इमॅजिनेशन'मधून माझा फॅशनवरील विश्वास दिसून येतो, तो म्‍हणजे फॅशन आकर्षक, वैयक्तिक व प्रेरणादायी असली पाहिजे. ब्रँड आत्‍मविश्वास, उत्‍साह आणि सर्जनशीलतेला प्रशंसित करतो आणि मी देखील या मूल्‍यांशी दृढपणे संलग्‍न आहे. मला आधुनिक काळातील भारतीयांना त्‍यांच्‍या स्‍वत:चे अद्वितीय स्‍टाइल प्रवास निर्माण करण्‍यास प्रेरित करण्‍यासाठी पॅण्‍टालून्‍ससोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे.''   

उत्तम अभिनयाव्‍यतिरिक्‍त सामंथा आधुनिक भारतीय खरेदीदारांसाठी स्‍टाइल आयकॉन आहेत, जे साहसी, आत्‍मविश्वासू व अनपेक्षितपणे वैयक्तिक आहेत. त्‍यांच्‍यामधून पॅण्‍टालून्‍सचे प्रभावी ग्‍लॅमर, आरामदायीपणा आणि वैविध्‍यपूर्ण स्‍टाइलचे तत्त्व दिसून येते.  

'स्‍पार्क युअर इमॅजिनेशन'साठी उत्‍सवी जाहिरातीमध्‍ये सामंथा पाहायला मिळतील. ही जाहिरात समकालीन स्‍टाइलचे उत्‍साही, सिनेमॅटिक साजरीकरण आहे. कंदीलांचा झगमगाट, फुलांचा बहर आणि उत्सवी रात्रींची चमक यासह ही मोहिम प्रत्‍येक क्षणाला शक्‍य करण्‍याला दाखवते आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीला त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या शैलीमध्‍ये उत्‍सवी पोशाखाची कल्‍पना, निर्मिती आणि रूपांतरित करण्‍याचे आवाहन करते.  

आपल्‍या प्रवासाबाबत मत व्‍यक्‍त करत टॅलेण्‍टेडमधील क्रिएटिव्‍ह्ज टेरेसा सेबास्टियन व डिम्‍पल परमार म्‍हणाल्‍या, ''स्‍टाइल अत्‍यंत वैयक्तिक आहे. ही प्रत्‍येकासाठी वेगवेगळे आहे. फॅशन व स्‍टाइलच्‍या माध्‍यमातून अभिव्‍यक्‍त होण्‍यावर विश्वास असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी पोशाख किंवा आभूषणे त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या स्‍टाइलला व्‍यक्‍त करण्‍यास प्रेरित करतात. असे वाटते की, पोशाख व रंग त्‍यांनी स्‍वत:हून डिझाइन केले आहेत. आमच्‍यासाठी पिढीच्‍या या विचारसरणीला प्रत्‍यक्षात आणणे महत्त्वाचे होते, ज्‍यामधून 'स्‍पार्क युअर इमॅजिनेशन' मोहिम प्रत्‍यक्षात आली. ही मोहिम स्‍टाइलमध्‍ये बदल करत राहण्‍याची, त्‍यामध्‍ये स्‍वत:च्‍या शैलीची भर करण्‍याची आणि भावी आकर्षक लुक तयार करण्‍याची आठवण करून देते.''  

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs