ईका मोबिलिटीने मुंबईमध्‍ये नवीन ऑल-रेंज वेईकल डिलरशिपसह विस्तार केला

 ईका मोबिलिटीने मुंबईमध्‍ये नवीन ऑल-रेंज वेईकल डिलरशिपसह विस्तार केला

मुंबई, २ ऑक्‍टोबर २०२५: ईका मोबिलिटी या आघाडीच्‍या इलेक्ट्रीक वेईकल व तंत्रज्ञान कंपनीने राजस राइडसोबत सहयोगाने मुंबईमध्‍ये आपल्‍या नवीन डिलरशिपच्‍या उद्घाटनाची घोषणा केली. 

राष्‍ट्रीय महामार्ग ४८, वसई (पूर्व), पालघर जिल्‍हा, महाराष्‍ट्र - ४०१२०८ येथे परमार इंडस्‍ट्रीयल इस्‍टेटजवळ स्थित ईका शोरूम ऑल-रेंज डिलरशिप म्‍हणून काम करते, जे इलेक्ट्रिक प्रवासी व व्‍यावसायिक वाहनांचा संपूर्ण पोर्टफोलिओ देते. मुंबई महानगर क्षेत्रामध्‍ये धोरणात्‍मकरित्‍या स्थित हे डिलरशिप सुरत, अहमदाबाद आणि प्रमुख व्‍यापक व औद्योगिक केंद्रांपासून जवळच्‍या अंतरावर आहे, ज्‍यामुळे ग्राहकांसाठी व व्‍यवसायांसाठी योग्‍य गंतव्‍य आहे. 

सर्वसमावेशक ३एस सुविधा (सेल्‍स, सर्विस व स्‍पेअर पार्ट्स) म्‍हणून स्‍थापित करण्‍यात आलेले हे डिलरशिप सर्वांगीण ग्राहक अनुभव देते, जेथे ग्राहक तज्ञांच्‍या मार्गदर्शनासह ईकाच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍सचा अनुभव घेऊ शकतात व खरेदी करू शकतात, तसेच समर्पित सर्विस व जेन्‍यूएन स्‍पेअर पार्ट्स सपोर्ट मिळवू शकतात. 

६,००० चौरस फूट जागेवर पसलेल्‍या या डिलरशिपमध्‍ये भारतातील इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्‍सची सर्वात मोठी श्रेणी पाहायला मिळते, ज्‍यामध्‍ये इलेक्ट्रिक बसेस्, ट्रक्‍स आणि स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स (एससीव्‍ही) यांचा समावेश आहे. श्रेणीमध्‍ये ईका ७टी व ५५टी इलेक्ट्रिक ट्रक्‍स, ईका ७एम, ९एम व १२एम इलेक्ट्रिक बसेस्, लो-फ्लोअर बस व कोच, तीनचाकी इलेक्ट्रिक कार्गो, दैनंदिन प्रवास व शहरातील राइडसाठी तीन-आसनी पॅसेंजर ईव्‍ही ईका ३एस आणि भारतातील स्टिअरिंग व्‍हील असलेली पहिली इलेक्ट्रिक तीन-चाकी पॅसेंजर वेईकल ईका ६एस यांचा समावेश आहे. 

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत ईका मोबिलिटीचे व्‍यवसाय प्रमुख व चीफ ग्रोथ ऑफिसर रोहित श्रीवास्‍तव म्‍हणाले, ' 'मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, जेथे परिवहन व्‍यवसाय व दैनंदिन जीवनाला चालना देते. राजस मोटर्ससोबत सहयोग करत आम्‍ही या महत्त्वपूर्ण परिसंस्‍थेला शुद्ध, कार्यक्षम व भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलतेमध्‍ये रूपांतरित होण्‍यास सक्षम करत आहोत. ईकामध्‍ये आमचा शाश्वतता व लाभक्षमता एकत्र असण्‍यावर विश्वास आहे आणि आमच्‍या ईव्‍हींमधून सिद्ध होते की त्या व्‍यवसाय खर्च कमी करण्‍यासोबत हरित भविष्‍य घडवू शकतात.'' 

''या नवीन सहयोगासह आम्‍ही मुंबईमध्‍ये डिलरशिप सुरू करण्‍यासोबत गतीशीलतेच्‍या भविष्‍यासाठी गेटवे देखील निर्माण करत आहोत. ईका मोबिलिटीसोबत आमचा सहयोग व्‍यवसाय व समुदायांना शाश्वत, विश्वसनीय व लाभदायी परिवहन सोल्‍यूशन्‍ससह सक्षम करेल, तसेच सिद्ध करेल की, शुद्ध गतीशीलता भावी भारतासाठी स्‍मार्ट निवड आहे,'' असे राजस राइड एलएलपीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक चेतन जोशी म्‍हणाले.  मुंबई व्‍यतिरिक्‍त, कंपनीने विजयवाडा, आंध्रप्रदेश येथे देखील नवीन डिलरशिपचे उद्घाटन केले आहे, ज्‍यासह देशभरात उपस्थिती दृढ केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs