टाइड ने एनसीएमसी-सक्षम एक्‍स्‍पेन्‍स कार्डसह एसएमईंकरिता दैनंदिन प्रवास सुलभ केला

 टाइड ने एनसीएमसी-सक्षम एक्‍स्‍पेन्‍स कार्डसह 

एसएमईंकरिता दैनंदिन प्रवास सुलभ केला

हे लॉंच या प्‍लॅटफॉर्मवरील उद्योजकांसाठी प्रवास व पेमेंट्स सेवा आणण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे 

मुंबई, 29ऑक्‍टोबर २०२५: टाइड (Tide) या भारतातील एसएमईंकरिता आघाडीच्‍या आर्थिक व्‍यवस्‍थापन प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या रूपे-समर्थित एक्‍स्‍पेन्‍स कार्डमध्‍ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) पाठिंब्‍याची भर केली आहे, ज्‍यामुळे लहान व्‍यवसाय आणि फ्रीलान्‍सर्सना एकाच कार्डसह टॅप करत प्रवास व व्‍यवहार करता येईल. टाइड सदस्‍य आता भारतातील प्रमुख शहरांमध्‍ये मेट्रो, बस, टोल आणि पार्किंगसाठी पेमेंट करू शकतात, तसेच टाइड अॅपमध्‍ये विनासायासपणे इन्‍वॉईसेस, रिइम्‍बर्समेंट्स (परतफेड) आणि खर्चांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात. 

भारत सरकारचे पाठबळ असलेल्‍या एनसीएमसीचे एकीकरण वापरकर्त्‍यांना एकाच कार्डमध्‍ये सार्वजनिक परिवहन आणि व्‍यवसाय-संबंधित प्रवासासाठी पेमेंट करण्‍याची सुविधा देते. यामुळे विविध ट्रॅव्‍हल कार्ड्स सोबत ठेवण्‍याची किंवा पेमेंट अॅप्‍सदरम्‍यान स्विच करण्‍याची गरज भासत नाही. रिअल-टाइममध्‍ये टाइड अॅपच्‍या माध्‍यमातून टॉप-अप्‍स उपलब्‍ध असण्‍यासह सदस्‍य त्‍वरित त्‍यांचे कार्ड्स रिचार्ज करू शकतात, शिल्‍लक तपासू शकतात आणि ट्रान्झिट गेट्सवर जलदपणे, रांगेशिवाय सुलभ सुविधांचा आनंद घेऊ शकतात.  

हे एकीकरण सतत धावपळ करत असलेले उद्योजक, फ्रीलान्‍सर्स आणि लहान व्‍यवसाय टीम्‍सना मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. टाइडच्‍या व्‍यवसाय खर्च व्‍यवस्‍थापन वैशिष्‍ट्यांमध्‍ये एनसीएमसीची इंटरऑपरेबल ट्रॅव्‍हल पेमेंट सिस्‍टम एकीकृत केल्‍याने वापरकर्ते एकाच सुरक्षित ठिकाणी त्‍यांच्‍या प्रवास व व्‍यवसाय खर्चांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात. याला पूरक टाइडची आर्थिक टूल्‍सची विद्यमान श्रेणी देखील आहे, ज्‍यामुळे एसएमई एकाच एकीकृत प्‍लॅटफॉर्ममध्‍ये पेमेंट्स, इन्‍वॉईसेस आणि खर्चांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात.

या लॉंचबाबत मत व्‍यक्‍त करत भारतातील टाइडचे डेप्‍युटी कंट्री मॅनेजर कुमार शेखर म्‍हणाले, ''आमचे नेहमी व्‍यवसाय खर्चाला सोपे करण्‍याचे ध्‍येय राहिले आहे. एनसीएमसी पाठिंब्‍याच्‍या एकीकरणासह आम्‍ही विनासायास प्रवास व व्‍यवसाय खर्च व्‍यवस्‍थापन सक्षम करण्‍याच्‍या दिशेने मोठे पाऊल उचलत आहोत. आमचे सदस्‍य आता एकाच सोल्‍यूशनचा वापर करत प्रवास, टोल्‍स आणि सार्वजनिक परिवहनामध्‍ये खर्चांचे व्‍यवस्‍थापन करू शकतात, तसेच त्‍यांच्‍या व्‍यवसाय खर्चांवर रिअल टाइममध्‍ये लक्ष ठेवण्‍याची, वर्गीकृत करण्‍याची आणि समन्वियत करण्‍याची खात्री घेऊ शकतात. हे फक्‍त अपग्रेड नाही तर व्‍यवसाय मालकांच्‍या प्रवास करण्‍याच्‍या, भारतातील वैविध्‍यपूर्ण गतीशीलता क्षेत्रात खर्च व रोख प्रवाहांचे व्‍यवस्‍थापन करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये क्रांतिकारी बदल आहे.'' 

एनसीएमसी पाठिंब्‍याची सुरूवात टाइडचा उत्‍पादन पोर्टफोलिओ विस्‍तारित करण्‍यासाठी आणि भारतातील लहान व्‍यवसायांसाठी डिझाइन करण्‍यात आलेले एकीकृत व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यासाठी सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांशी संलग्‍न आहे. पेमेंट्स, इन्‍वॉईसिंग, उद्यम व जीएसटी नोंदणी, सरकारी योजनेचा शोध, बिल पेमेंट्स आणि मुदत ठेवी प्रदान करत टाइड उद्योजकांसाठी एक-थांबा व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन प्‍लॅटफॉर्म म्‍हणून आपली भूमिका दृढ करत आहे.   

२०२२ च्‍या उत्तरार्धात लॉंच झाल्‍यापासून भारत टाइडची झपाट्याने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे, जेथे आता फक्‍त अडीच वर्षांमध्‍ये ८००,००० हून अधिक एसएमईंना सेवा देत आहे. टाइडच्‍या १.६ दशलक्ष्‍ज्ञ जागतिक सदस्‍यांमध्‍ये बहुतांश भारतीय एसएमई आहेत. टाइडचे एसएमईंची वेळ व पैशांची बचत करण्‍याचे मिशन आहे, ज्‍यामुळे ते त्‍यांना आवडणाऱ्या गोष्‍टी पुन्‍हा करू शकतात. टाइडचा एकीकृत प्‍लॅटफॉर्म सोपा, सर्वोत्तम आणि डिजिटल-केंद्रित उत्‍पादन आहे, जे रिअल-टाइममध्‍ये स्‍थापित करणे सोपे आहे. टाइड ट्रान्‍सकॉर्पसोबत (आरबीआय नियंत्रित पीपीआय जारीकर्ता) सहयोगाने रूपे-समर्थित एक्‍स्‍पेन्‍स कार्ड्स देते.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs