युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने बँकेचे सप्टेंबर ३०, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे लेखे मंजूर
युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने बँकेचे
सप्टेंबर ३०, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे लेखे मंजूर
युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने बँकेचे सप्टेंबर ३०, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे लेखे मंजूर करण्यात आले. त्यानुसार ः
दुसऱ्या तिमाही FY२६ चे मुख्य वैशिष्ट्ये
१. आर्थिक कामगिरी बँकेचा निव्वळ नफा दुसऱ्या तिमाहीत ₹४,२४९ कोटी आहे. व्याज उत्पन्न ₹२६,६५० कोटी आहे.
२. व्यवसाय वाढ बँकेचा एकूण व्यवसाय वार्षिक ३.२४% ने वाढला. एकूण कर्जे ४.९९% ने तर ठेवी १.९०% ने वाढल्या. ३० सप्टेंबर २०२५ अखेर एकूण व्यवसाय ₹२२,०९,८२८ कोटी आहे.
३. ठेवी वाढ जागतिक ठेवी वार्षिक १.९०% ने वाढल्या. बँकेची एकूण ठेव ₹१२,३४,६२१ कोटी आहे.
४. रिटेल, कृषी व एमएसएमई (रॅम) विभागातील वाढ रॅम विभाग वार्षिक ८.१४% ने वाढला. यात रिटेल २३.९८%, एमएसएमई १४.८८% वाढ झाली. देशांतर्गत कर्जांपैकी रॅमचे प्रमाण ५८.८३% आहे.
५. एनपीएमध्ये घट एकूण एनपीए (%) वार्षिक १०७ बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ३.२९% व निव्वळ एनपीए (%) ४३ बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ०.५५% झाला.
६. भांडवली गुणोत्तर मजबूत सीआरएआर १७.०७%. सीईटी-१ गुणोत्तर १३.८८% वरून १४.३७% झाले.
७. परतावा मालमत्तेवरील परतावा १.१६%, इक्विटीवरील परतावा १५.०८%.
जाळे
· शाखा: ८,६५५ (परदेशी शाखांसह) · एटीएम: ९,०६४ · बीसी पॉइंट्स: २५,७७७ · एमएसएमई कर्ज केंद्र: १३८ · रिटेल कर्ज केंद्र: १४३ · कृषी कर्ज केंद्र: ७० · युनियन एमएसएमई फर्स्ट शाखा: ११३ · सोने कर्ज केंद्र: १,६७५ · मोठ्या कॉर्पोरेट शाखा: १२, मध्यम कॉर्पोरेट शाखा: ३८ · एसएएमबी: ३, एआरबी: २८
आर्थिक समावेशन योजना · प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (पीएमजेजेबीवाय): तिमाहीत ५.१२ लाख नवीन नावनोंदणी. · प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (पीएमएसबीवाय): १७.८६ लाख नवीन नावनोंदणी. · प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय): ३.३३ कोटी खाती, शिल्लक ₹१३,८६४ कोटी (मागील वर्षी ३.०८ कोटी खाती, ₹१०,९२९ कोटी). · अटल पेन्शन योजना (एपीवाय): २.७० लाख नवीन नावनोंदणी. · युनियन नारी शक्ती योजना (महिला उद्योजकांसाठी): ४,०८६ अर्जांना ₹७२४ कोटी मंजूर. · हरित उपक्रमांसाठी कर्ज १) नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र: ₹३२,५२० कोटी मंजूर. २) युनियन ग्रीन माइल्स: ₹१,३१८ कोटी मंजूर.
Comments
Post a Comment