एअरटेलला भारतीय रेल्वे सुरक्षा संचालन केंद्र (आयआरएसओसी) साठी मिळाला बहुवर्षीय करार
एअरटेलला भारतीय रेल्वे सुरक्षा संचालन केंद्र (आयआरएसओसी) साठी मिळाला बहुवर्षीय करार
• एअरटेल एक नवी बहुस्तरीय सायबर सुरक्षा प्रणाली उभारेल आणि ती वर्षभर, दिवसाचे 24 तास अखंडपणे कार्यरत ठेवेल. ही प्रणाली भारतीय रेल्वेच्या आयटी नेटवर्कला सायबर धोका पासून संरक्षित करण्यासाठी एक मजबूत सुरक्षा कवच म्हणून काम करेल, ज्यामुळे रेल्वेच्या सर्व डिजिटल सेवा सुरक्षित, सुरळीत आणि अखंड चालू राहतील.
• या नव्या डेटा सुरक्षा व्यवस्थेमुळे 1 अब्जांहून अधिक भारतीयांना लाभ होईल. यामुळे तिकीट बुकिंग, ऑनलाइन पेमेंट, ट्रेन ट्रॅकिंग आणि रेल्वेशी संबंधित इतर डिजिटल सेवा आणखी सुलभ आणि सुरक्षित होतील.
एअरटेल बिझनेसला भारतीय रेल्वे सुरक्षा संचालन केंद्र (आयआरएसओसी) कडून एक बहुवर्षीय करार मिळाला आहे, ज्याअंतर्गत एअरटेल भारतीय रेल्वेच्या डिजिटल नेटवर्कच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि व्यापक सायबर सुरक्षा सेवा प्रदान करेल.
भारतीय रेल ही देशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या सेवांपैकी एक आहे. दररोज ती 13,000 हून अधिक गाड्या चालवते, 2 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवासाची सुविधा देते आणि लाखो डिजिटल व्यवहार पूर्ण करते. याशिवाय, ती दरवर्षी 1.5 अब्ज टनांहून अधिक माल देशभर पोहोचवते. अशा परिस्थितीत प्रवाशांची वैयक्तिक माहिती, पेमेंटशी संबंधित डेटा आणि रेल्वेचे कामकाज जसे की तिकीट बुकिंग, ट्रेन ट्रॅकिंग, माल वाहतूक आणि सिग्नलिंग यांशी संबंधित माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः अशा काळात जेव्हा सायबर हल्ल्यांचा धोका सतत वाढत आहे.
एअरटेल बिझनेस भारतीय रेल्वेच्या विशाल डेटाबेसचे संरक्षण करण्यासाठी एक मजबूत आणि बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारेल. ही प्रणाली सर्व सुरक्षा नियंत्रणांना एकाच ठिकाणाहून व्यवस्थापित करेल, ज्यामुळे रेल्वेच्या डिजिटल सेवा ज्यामध्ये देशभरातील 26 ठिकाणी कार्यरत सुमारे 1,60,000 कर्मचारी सहभागी आहेत सतत सुरक्षित आणि अखंड चालू राहतील.
या प्रकल्पात अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर केला जाईल, जे जगभरात सर्वात विश्वासार्ह मानले जातात. त्यासोबतच “मेक इन इंडिया” अंतर्गत विकसित केलेली नवी भारतीय सायबर सुरक्षा तंत्रज्ञानेही समाविष्ट केली जातील. या सर्वांच्या साहाय्याने एअरटेल अशी एक स्मार्ट सुरक्षा प्रणाली उभारेल, ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या मदतीने सायबर धोक्यांची ओळख आणि प्रतिबंध केला जाईल. ही व्यवस्था देशाच्या महत्त्वपूर्ण पायाभूत संरचनेचे जसे की रेल्वेचे सर्व प्रकारच्या डिजिटल धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी तयार केली जात आहे.
शरद सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक, एअरटेल बिझनेस यांनी सांगितले,“आजच्या काळात सायबर हल्ल्यांचा धोका सतत वाढत आहे. अशा परिस्थितीत रेल्वेसारख्या मोठ्या व्यवस्थेसाठी आपल्या डेटा, संचालन आणि वाशांच्या सुरक्षेला बळकट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एअरटेल बिझनेसमध्ये आम्हाला ठाऊक आहे की अशा धोक्यांपासून बचाव करण्यासाठी प्रगत सुरक्षा प्रणाली किती आवश्यक असतात. आम्हाला अभिमान आहे की आयआरएसओसीने आम्हाला आपला विश्वासू भागीदार म्हणून निवडले आहे, ज्यामुळे आम्ही भारतीय रेल्वेसारख्या विशाल डिजिटल प्रणालीचे ज्यामध्ये देशभरातील नेटवर्क आणि डेटा समाविष्ट आहे सुरक्षिततेसाठी योगदान देऊ शकतो. आमची सुरक्षा व्यवस्था तिकीटिंग आणि डेटा व्यवस्थापन अधिक मजबूत करेल, रेल्वेच्या डिजिटल कामकाजाला सायबर धोक्यांपासून सुरक्षित ठेवेल आणि दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना सुरक्षित व अखंड डिजिटल सेवा प्रदान करेल.”
दिलीप कुमार, ईडीआयपी, रेल्वे बोर्ड यांनी सांगितले, “आज रेल्वेच्या कामकाज, देखभाल, उत्पादन आणि संसाधनांच्या खरेदीमध्ये डिजिटल माहिती आणि संवाद तंत्रज्ञानावर अवलंबित्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत सायबर सुरक्षा अत्यंत आवश्यक बनली आहे. आयआरएसओसीच्या स्थापनेमुळे एक केंद्रीकृत सुरक्षा संचालन केंद्र उभारले जाईल, जे भारतीय रेल्वेच्या डिजिटल मालमत्तेची सातत्याने निगराणी करेल, सायबर धोक्यांची ओळख पटवेल आणि त्यावर तत्काळ कारवाई करेल. हे केंद्र सायबर धोक्यांशी संबंधित माहिती गोळा करेल आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा संस्थांशी समन्वय साधून काम करेल. तसेच, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संसाधनांच्या संचालन आणि देखभालीचे सुयोग्य नियोजन केल्यामुळे रेल्वेच्या सेवांमध्ये अधिक सुधारणा होईल आणि प्रवाशांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सेवा मिळत राहतील.”
एअरटेल सिक्योरच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला एक केंद्रीकृत सुरक्षा प्रणाली मिळेल, जी अनेक प्रकारचे फायदे प्रदान करेल:
• एकात्मिक देखरेख आणि अनुपालन (युनिफाइड कॉम्प्लायन्स अँड व्हिजिबिलिटी): एअरटेलने असा डॅशबोर्ड विकसित केला आहे, जो रेल्वेच्या 26 हून अधिक ठिकाणांवरील सर्व सुरक्षा प्रणालींची एकाच ठिकाणाहून देखरेख करण्यास आणि त्यांच्या स्थितीचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यास सक्षम आहे.
• उन्नत एंडपॉइंट सुरक्षा (अॅडव्हान्स्ड एंडपॉइंट प्रोटेक्शन): ही एक एआय-संचालित सायबर सुरक्षा प्रणाली आहे, जी रेल्वेतील सर्व संगणक, सर्व्हर आणि उपकरणांवर सातत्याने नजर ठेवते आणि त्यांना सुरक्षित ठेवते.
• मजबूत पॅच आणि असुरक्षा व्यवस्थापन (रॉबस्ट पॅच अँड व्हल्नरेबिलिटी मॅनेजमेंट): रेल्वेच्या 26 प्रमुख आणि उपकेंद्रांवरील 1,90,000 हून अधिक महत्त्वाच्या उपकरणे आणि डिजिटल साधनांची देखरेख एका एकात्मिक विंडोमधून केली जाईल, ज्यामुळे कोणतीही तांत्रिक कमतरता किंवा संभाव्य धोका त्वरित ओळखता येईल.
• पुढील पिढीची निरीक्षण प्रणाली (नेक्स्ट-जेन मॉनिटरिंग): यात एआय-संचालित तंत्रज्ञानांचा समावेश आहे, जसे की एसआयईएम, एसओएआर आणि यूईबीए, जे मशीन लर्निंग आणि वर्तन विश्लेषणाच्या मदतीने सायबर धोक्यांची ओळख, पूर्वानुमान आणि प्रतिबंध रिअल-टाइममध्ये करतात. ही प्रणाली 20 सेकंदांपेक्षा कमी वेळात धोका ओळखण्यास सक्षम आहे. तसेच, थ्रेट इंटेलिजन्स आणि डार्क वेब मॉनिटरिंगच्या माध्यमातून संभाव्य धोक्यांची आधीच ओळख करून त्यांचा रेल्वेच्या कामकाजावर परिणाम होण्यापूर्वीच प्रतिबंध केला जाईल.
• मजबूत नेटवर्क आणि प्रवेश नियंत्रण: फायरवॉल, राउटर, एमपीएलएस नेटवर्क आणि सुरक्षित लॉगिन प्रणाली यांसारख्या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने रेल्वेच्या सर्व महत्त्वाच्या डिजिटल अनुप्रयोग आणि नेटवर्कचे संरक्षण केले जाईल.
Comments
Post a Comment