एलआयसी म्युच्युअल फंडाकडून कंझम्पशन फंडाचे अनावरण

 एलआयसी म्युच्युअल फंडाकडून कंझम्पशन फंडाचे अनावरण


नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) ३१ ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी बंद होईल
 
मुंबई, ३० ऑक्टोबर २०२५: भारतातील प्रतिष्ठित फंड घराण्यांपैकी एक असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडाने त्यांचा थीमॅटिक फंड 'एलआयसी एमएफ कंझम्पशन फंड' प्रस्तुत करण्याची घोषणा केली आहे. ग्राहक उपभोग या विषय-संकल्पनेवर आधारित ही एक गुंतवणुकीस कायम खुली समभागांशी संलग्न (ओपन-एंडेड इक्विटी) योजना आहे.

योजनेची नवीन फंड प्रस्तुती (एनएफओ) कालावधी ३१ ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी तो बंद होणार आहे. ही योजना २५ नोव्हेंबर २०२५ रोजी निरंतर विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली केली जाईल. श्री सुमित भटनागर आणि श्री करण दोशी हे या योजनेतील निधी व्यवस्थापित करतील. योजना निफ्टी इंडिया कंझम्पशन टोटल रिटर्न इंडेक्स (टीआरआय) या निर्देशांकाच्या कामगिरीवर बेतलेली असेल.

ही योजना मागणी आणि उपभोग-संबंधित क्षेत्रांमध्ये किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये सक्रियपणे व्यवस्थापित पोर्टफोलिओमधून दीर्घकालीन भांडवल वृद्धी गुंतवणूकदारांना प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते. योजनेचे उद्दिष्ट त्यांच्या एकूण मालमत्तेपैकी ८० ते १००% निधी हा देशांतर्गत वापर-चालित मागणीचा फायदा घेण्यासाठी तयार असलेल्या कंपन्यांच्या समभाग आणि समभागाशी संबंधित साधनांमध्ये विभागण्याचे आहे. निधी व्यवस्थापक योजनेच्या मालमत्तेपैकी २० टक्क्यांपर्यंत उपभोग प्राथमिक संकल्पनेच्या (थीम) बाहेर गुंतवणूक करण्याचा अधिकार राखून ठेवतो. शिवाय, ही योजना वेगवेगळ्या बाजार भांडवलात वैविध्यपूर्ण गुंतवणूक करेल. तथापि, योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट साध्य होईल याची कोणतीही हमी नाही.

प्रस्तुत एनएफओवर भाष्य करताना, एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आर. के. झा म्हणाले: “आम्ही एक उपभोग संकल्पनेवर आधारीत फंड सुरू करत आहोत, कारण येत्या काही वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणात ग्राहक उपभोग वाढण्याची अपेक्षा आहे. भारताच्या उपभोग प्रवणतेला चालना देणारी कारणे म्हणजे वाढता मध्यमवर्ग, निरोगी काम करणाऱ्या वयाची मोठी लोकसंख्या, दरडोई उत्पन्नांतील वाढ, गतिमान शहरीकरण आणि डिजिटलायझेशन अशी आहेत. देशातील विशालतम मध्यमवर्गीय विभाग भारताला उपभोग शक्तिकेंद्र बनवण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, आमचा नवीन फंड किरकोळ गुंतवणूकदारांना एक चांगली संधी देत ​​आहे जी या चक्राचा फायदा घेऊ शकेल.”

एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी-इक्विटी श्री. योगेश पाटील म्हणाले: “जागतिक व्यवस्थेतील धोरणात्मक स्थिती, मजबूत मूलतत्त्वे, निरंतर सुरू असलेल्या संरचनात्मक सुधारणा आणि उत्कृष्ट जीडीपी वाढ लक्षात घेता, भारताची उपभोगातील तेजी एक दशक किंवा त्याहून अधिक काळ सुरू राहण्याची शक्यता आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून भारतातील विवेकाधीन खर्चात वाढ आणि श्रेणींमध्ये प्रीमियमीकरणाचा स्पष्ट प्रवाह आढळून येत आहे. वाढत्या आकांक्षा असलेला मध्यमवर्गीय गट, वाढते क्रयक्षम उत्पन्न आणि विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या पसंतींमुळे हे बदल घडत आहेत. एकत्रितपणे, हे घटक विशेषतः प्रीमियम आणि जीवनशैली विभागातील उपभोग हा गुंतवणूक क्षेत्रात एक प्रमुख आणि टिकाऊ विषय बनवू शकतात.”

एनएफओ दरम्यान, अर्ज करण्यासाठी / स्विच इनसाठी किमान रक्कम रु. ५,०००/- असून त्यानंतर रु. १ च्या पटीत गुंतवणूक करता येईल. दैनिक एसआयपीसाठी किमान रक्कम १०० रुपये आणि मासिक एसआयपी २०० रुपये आहे. किमान तिमाही एसआयपी रक्कम १,००० रुपये आहे. एसआयपी सुरू होण्याची तारीख योजना पुन्हा खुली झाल्यानंतर लागू होईल.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs