स्टड्स ऍक्सेसरीज लिमिटेडच्या इक्विटी शेअर्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) 30
ऑक्टोबर 2025 रोजी
·
₹5 दर्शनी मूल्यावर ("इक्विटी
शेअर") प्रति इक्विटी शेअर ₹ 557 ते ₹ 585 असा प्राइस बँड निश्चित केला
आहे.
·
बोली/ऑफर गुरुवार,
30 ऑक्टोबर 2025 रोजी उघडेल आणि सोमवार, 3 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टर बिडिंग बुधवार, 29 ऑक्टोबर 2025 रोजी होईल.
·
किमान 25 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 25 च्या पटीत बोली लावता येईल.
मुंबई, 27 ऑक्टोबर 2025: स्टड्स ऍक्सेसरीज लिमिटेड ("स्टड्स" किंवा "द
कंपनी"), गुरुवार, 30
ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरच्या ("ऑफर") संदर्भात बोली/ऑफर कालावधीचा प्रस्ताव ठेवते आहे. टोटल
ऑफर साइझमध्ये कंपनीच्या काही विद्यमान शेअरहोल्डर्सद्वारे ("विक्री करणारे
शेअरहोल्डर्स") 7,786,120 पर्यंत इक्विटी शेअर्स ("विक्रीसाठी ऑफर") विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ("टोटल
ऑफर साइझ").
विक्रीसाठीच्या
ऑफरमध्ये मधु भूषण खुराणा यांचे 3,800,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, सिद्धार्थ भूषण खुराणा यांचे 800,000 पर्यंत इक्विटी शेअर्स,
चांद खुराणा यांचे 2,100,000 पर्यंत इक्विटी शेअर्स ("एकत्रितरित्या प्रमोटर सेलिंग
शेअरहोल्डर्स") आणि संजय लीखा यांचे 342,000 पर्यंत इक्विटी शेअर्स,
संजय लीखा यांचे चारू लीखा यांच्यासोबत संयुक्तपणे 258,000 पर्यंत इक्विटी शेअर्स,
चारू लीखा यांचे 249,600 पर्यंत इक्विटी शेअर्स,
निशा लीखा यांचे 100,800 पर्यंत इक्विटी शेअर्स,
नैन तारा मेहता यांचे 57,600 पर्यंत इक्विटी शेअर्स,
सुनील कुमार रस्तोगी यांचे 36,000 पर्यंत इक्विटी शेअर्स,
एसई शूज प्रायव्हेट लिमिटेड यांचे 25,920 पर्यंत इक्विटी शेअर्स,
अजय कुमार सखुजा यांचे 16,200 पर्यंत इक्विटी शेअर्स ("इतर सेलिंग शेअरहोल्डर्स") यांचा
एकत्रितपणे ("विक्री करणारे भागधारक") समावेश आहे.
अँकर
इन्व्हेस्टर बिड/ऑफर कालावधी बुधवार, 29
ऑक्टोबर 2025 रोजी सुरू होईल आणि त्याच दिवशी बंद होईल.
बिड/ऑफर कालावधी गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि सोमवार, 3 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल. ऑफरचा प्राइस
बँड प्रति इक्विटी शेअर ₹ 557 ते ₹ 585 असा निश्चित करण्यात आला आहे. किमान 25 इक्विटी
शेअर्ससाठी आणि त्यानंतर 25 च्या पटीत बोली लावता येईल.
इक्विटी शेअर्स
कंपनीच्या 25
ऑक्टोबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग
प्रॉस्पेक्टस ("RHP") द्वारे ऑफर
केले जात आहेत. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि
हरियाणा ("RoC") तर्फे तो नवी दिल्ली येथे दाखल करण्यात आला आहे.
25 ऑक्टोबर 2025
रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई
लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध
करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी, बीएसई लिमिटेड
हे नियुक्त स्टॉक एक्सचेंज आहे. आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (आधीचे IIFL सिक्युरिटीज लिमिटेड) आणि
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
Comments
Post a Comment