फिजिक्सवाला लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 11 नोव्हेंबर 2025 पासून होणार सुरू

फिजिक्सवाला लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 

11 नोव्हेंबर 2025 पासून होणार सुरू

 

·         प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 103  रुपये  ते 109  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.

·         फ्लोअर प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 103  पट आणि कॅप प्राईस इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 109  पट

·         बोली/ऑफर मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 रोजी खुली होईल आणि गुरूवार, 13 नोव्हेंबर 2025  रोजी बंद होईल.

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच सोमवार 10 नोव्हेंबर 2025 आहे.

·         बोली किमान 137 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 137 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·           कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 10     रु. ची सवलत

 


फिजिक्सवाला लिमिटेड (“COMPANY”) इक्विटी शेअर्ससाठी प्राथमिक समभाग विक्रीसाठीची बोली/ऑफर (“Issue”) मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करत आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बोली/ऑफर सुरु होण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच सोमवार 10 नोव्हेंबर 2025 आहे. बोली/ऑफर गुरूवार, 13 नोव्हेंबर 2025  रोजी बंद होईल.

एकूण ऑफर साईज मध्ये 3480 कोटी रु. पर्यंतच्या प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू  आहेत. आयपीओ मध्ये 3100  कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 380 कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहेप्रति इक्विटी शेअरसाठी 103  रुपये  ते 109  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा (“The Price Band”) निश्चित करण्यात आला आहे कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 10 रु. ची सवलत ऑफरमध्ये समाविष्ट आहे बोली किमान 137 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 137 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. (“Bid Lot”).

 कंपनीने या इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग अनेक धोरणात्मक उद्दिष्टांसाठी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सुमारे 460.551 कोटी रु. नवीन ऑफलाइन आणि हायब्रिड केंद्रांच्या फिट-आउट्सकरिता भांडवली खर्चासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, तर 548.308 कोटी रु. कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या विद्यमान केंद्रांच्या भाडे देयकांसाठी वापरले जातील. 47.168 कोटी रु. ची गुंतवणूक कंपनीच्या उपकंपनी झायलम लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड मध्ये करण्याचे नियोजित आहे. त्यामध्ये 31.648 कोटी रु. नवीन ऑफलाइन केंद्रे (“न्यू झायलम सेंटर्स”) उभारण्यासाठी आणि 15.520 कोटी रु. विद्यमान झायलम केंद्रे आणि वसतिगृहांच्या भाडे देयकांसाठी वापरले जाणार आहेत. याशिवाय, 28.002 कोटी रु. उत्कर्ष क्लासेस अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड मध्ये गुंतवले जाणार आहेत. त्यांचा उपयोग विद्यमान ऑफलाइन केंद्रांच्या भाडे देयकांची पूर्तता करण्यासाठी केला जाईल. तसेच, 200.106 कोटी रु. सर्व्हर आणि क्लाउड-संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आणि 710 कोटी रु. मार्केटिंग उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कंपनी 26.5 कोटी रु. खर्च करून आपली उपकंपनी उत्कर्ष क्लासेस अँड एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड मधील अतिरिक्त भागभांडवल संपादन करण्याचीही योजना आखत आहे. उर्वरित निधी अजून नक्की ठरलेल्या अधिग्रहणांद्वारे इनऑर्गनिक वाढीच्या निधीसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs