इंडियन पॅनोरमा--2025 ची अधिकृत निवड आणि 56 व्या इफ्फी, 2025 साठी सर्वोत्कृष्ट वेब-सिरीज (ओटीटी) पुरस्कार-2025 साठी नामांकन

 

इंडियन पॅनोरमा--2025 ची अधिकृत निवड आणि 56 व्या इफ्फी, 2025 साठी सर्वोत्कृष्ट वेब-सिरीज (ओटीटी) पुरस्कार-2025 साठी नामांकन


भारतीय चित्रपटांसाठीच्या 'पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कारासाठी 25 चित्रपट (मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील 5 चित्रपटांसह) आणि 5 चित्रपटांना नामांकन

56 व्या इफ्फीमध्ये 20 नॉन-फीचर चित्रपट प्रदर्शित केले जातील आणि सर्वोत्तम वेब-सिरीज (ओटीटी) पुरस्कार-2025 साठी 5 सर्वोत्कृष्ट वेब सिरीजना नामांकन

‘आमरण (तमिळ)’ या चित्रपटाने इंडियन पॅनोरमा 2025  चे  उद्घाटन होईल, आणि ‘काकोरी (हिंदी)’ हा इंडियन पॅनोरमा 2025 चा उद्घाटनपर  नॉन-फीचर चित्रपट  असेल

(अशोक रा. शिंदे यांजकडून) 

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी ) चा प्रमुख घटक असलेल्या इंडियन पॅनोरमाने 2025 वर्षासाठी भारतीय चित्रपटांसाठीच्या 'पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कारासाठी 25 फीचर फिल्म्स (मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील 5 चित्रपटांसह) आणि 5 चित्रपटांना तसेच 20 नॉन-फीचर चित्रपटांना नामांकन जाहीर केले आहे. नामांकन झालेले हे  चित्रपट  20 ते  28 नोव्हेंबर 2025 दरम्यान गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या  56 व्या इफ्फीमध्ये प्रदर्शित केले जातील.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने आयोजित केलेल्या इंडियन पॅनोरमाचे उद्दिष्ट इंडियन पॅनोरमाच्या नियमांनुसार सिनेमॅटिक, थीमॅटिक आणि सौंदर्यात्मकदृष्ट्या  उत्कृष्ट असलेल्या फिचर आणि नॉन-फीचर चित्रपटांची निवड करणे आहे.

इंडियन पॅनोरमाची निवड भारतातील चित्रपट जगतातील नामांकित व्यक्तींकडून केली जाते, ज्यामध्ये फिचर फिल्मसाठी एकूण बारा ज्युरी सदस्य आणि नॉन-फिचर फिल्मसाठी सहा ज्युरी सदस्य असतात. त्यांच्या वैयक्तिक कौशल्याचा वापर करून, प्रख्यात ज्युरी पॅनेल संबंधित श्रेणीतील इंडियन पॅनोरमा चित्रपटांची निवड करताना  एकमत होण्यासाठी समान योगदान देतात.

बारा सदस्यांचा समावेश असलेल्या फिचर फिल्म ज्युरीचे नेतृत्व प्रख्यात अभिनेते, चित्रपट निर्माते आणि निर्माते, अध्यक्ष राजा बुंदेला यांनी केले. फिचर फिल्म ज्युरीमध्ये खालील सदस्यांचा समावेश आहे, जे वैयक्तिकरित्या विविध प्रशंसित चित्रपटांचे प्रतिनिधित्व करतात आणि सुप्रसिद्ध चित्रपट व्यावसायिक आहेत आणि एकत्रितपणे विविध भारतीय समुदायाचे प्रतिनिधित्व करतात:

1.    कृष्णा हेब्बाळे, अभिनेते

2.    असीम के. सिन्हा, संकलक  आणि चित्रपट निर्माते

3.    कमलेश के. मिश्रा, चित्रपट निर्माते आणि लेखक

4.    अरुण बक्षी, अभिनेते आणि गायक

5.    जादुमनी दत्ता, चित्रपट निर्माते, निर्माता आणि अभिनेते

6.    अशोक सरन, निर्माता आणि चित्रपट निर्माते

7.    सुभाष सहगल, संकलक, निर्माता, चित्रपट निर्माते आणि लेखक

8.    मलय रे, छायालेखक आणि चित्रपट निर्माते

9.    प्रा. अमरेश चक्रवर्ती, चित्रपट समीक्षक  आणि चित्रपट निर्माते

10.   बी. एस. बसवराजू, छायालेखक आणि चित्रपट निर्माते

11.   सुकुमार जटानिया, छायालेखक

12.   नेपोलियन आर.झेड. थांगा, चित्रपट निर्माते

इंडियन पॅनोरमा - 2025 मध्ये प्रवेशिका म्हणून प्राप्त झालेल्या  516 समकालीन भारतीय  चित्रपटांमधून 56 व्या इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शित करण्यासाठी 25 चित्रपटांचे पॅकेज (मुख्य प्रवाहातील चित्रपटांमधील ५ चित्रपटांसह) आणि भारतीय चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकासाठी 5 चित्रपटांचे नामांकन भारतीय चित्रपट उद्योगाची चैतन्यशीलता आणि विविधता प्रतिबिंबित करते.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs