दोन चित्रपट, एकच स्पंदन : फ्रँक आणि लिटल ट्रबल गर्ल्स च्या निर्मात्यांनी इफ्फी 2025 पत्रकार परिषदेत घेतला अस्तित्व आणि आशेचा वेध
दोन चित्रपट, एकच स्पंदन : फ्रँक आणि लिटल ट्रबल गर्ल्स च्या निर्मात्यांनी इफ्फी 2025 पत्रकार परिषदेत घेतला अस्तित्व आणि आशेचा वेध
(अशोक रा. शिंदे यांजकडून)
यंदाच्या इफ्फीत एकीकडे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून येणारी वाऱ्याची झुळूक इफ्फीतल्या विविध दालनांमधून दरवळत आहे, दुसरीकडे चकाकणाऱ्या कॅमेऱ्यांनी तारकांची मांदियाळी व्यापलेली आहे, अशा वातावरणात आज ‘फ्रँक’ आणि ‘लिटल ट्रबल गर्ल्स’ या चित्रपटांनी इफ्फीवर गारुड घातले. या चित्रपटांसाठी झालेल्या पत्रकार परिषदेच्यावेळी पत्रकार कक्ष भावनात्मकता, आत्मपरीक्षण, मार्मिकता आणि निव्वळ सिने अनुभवाच्या जादूने व्यापलेल्या अवकाशात बदलून गेला होता.
फ्रँकचे निर्माते ईवो फेल्ट आणि लिटल ट्रबल गर्ल्सचे निर्माते मायहेक चेर्नेक यांनी प्रेक्षकांना, त्यांनी अतिशय कलात्मकतेने साकारलेल्या जगात नेले. यापैकी एक जग खरे, वास्तववादी आणि निर्भीड होते, तर दुसरे काव्यात्मक आणि तितकेच भितीदायक होते, आणि त्याला समांतरपणेच हे दोन्ही चित्रपट वेदना, आत्मशोध, धैर्य आणि मानवी नाते संबंधांच्या सार्वत्रिक कल्पनांशी जोडलेले होते.
फ्रँक - सारांश : दुःख, आशा आणि मानवी नातेसंबंध अशा पैलूंनी साकारलेली कथा
‘फ्रँक’ हा चित्रपट 13 वर्षांच्या पॉलची गोष्ट आहे. घरगुती हिंसाचारामुळे भेदरलेला हा मुलगा एका अनोळखी शहरात ढकलला जातो, तिथल्या जीवनशैलीशी जुळवून घेताना तो अडखळतो, त्याचे प्रत्येक निर्णय त्याला आणखी संकटात टाकत असाता. त्याच दरम्यान एक अनोळखी, दिव्यांग व्यक्ती त्याच्या आयुष्यात येते, ती त्याच्यासाठी अशी काही मार्गदर्शक व्यक्ती ठरते, की ज्याची गरज आपल्याला कधी भासेल अशी कल्पनाही पॉलने केलेली नसते.
निर्माते ईवो फेल्ट यांनी चित्रपटाशी जोडलेल्या एका भावनात्मक पैलूबाबत उपस्थितांशी मोकळा आणि प्रामाणिक संवाद साधला. आपण जवळपास वीस वर्षे,केवळ स्वतःच्या मनातच, एका सावलीप्रमाणे, एखाद्या आठवणीप्रमाणे या चित्रपटाची कल्पना जपली होती. मात्र एके दिवशी जणू काही ती तशीच शांत पडून राहण्यासाठी तयार नव्हती असे झाले, आणि त्यातूनच फ्रँकचा जन्म झाला, असे त्यांनी सांगितले.
अदृश्य जखमा घेऊन वावरणाऱ्या मुलांचे काय होते, याचा वेध हा चित्रपट घेतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच, एस्टोनियासारख्या लहान देशातील चित्रपट निर्मितीशी संबंधित आव्हानांवरही त्यांनी भाष्य केले, आपल्या उपहासपूर्ण विनोदी शैलीने त्यांनी उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू आणले. तिथे केवळ निधीसाठी संघर्षच करावा लागत नाही, तर त्यासाठी जणू काही ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाप्रमाणे त्याचा पाठलाग करावा लागत असल्याचे वास्ताव त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. करदात्यांच्या पाठबळाशिवाय फ्रँकसारखा चित्रपट शक्यच झाला नसता, ही बाबही त्यांनी प्रामाणिकपणे नमूद केली.
अशा कथानकांमुळे कलाकार आणि चित्रपटाच्या चमूत घडून येणाऱ्या बदलांविषयी देखील त्यांनी सांगितले. चित्रपट आपल्याला बदलतो, तोच आपले जणे बनतो, आपण कशावर ठेवतो, त्या भावनेलाही तो आकार देतो, असे त्यांनी नमूद केले.
फ्रॉम कॉयर नोट्स टू करेज: लिटिल ट्रबल गर्ल्स मध्ये अपेक्षा आणि ओळख यांच्यातील द्वंद्वाचा शोध
एका कॉन्व्हेंटमध्ये सप्ताहाच्या अखेरीस होणाऱ्या गायकवृंदाच्या (कॉयर) सादरीकरणादरम्यान घडणारी, "लिटिल ट्रबल गर्ल्स" ही स्वातंत्र्य, इच्छा, बंडखोरी आणि पूर्णपणे आपला स्वतःचा जगाबद्दलचा दृष्टिकोन याबद्दलची मनात प्रथमच जागृत झालेली जाणीव अनुभवणाऱ्या एका लाजऱ्याबुजऱ्या किशोरवयीन मुलीची कथा आहे. तिच्या मनात जाग्या झालेल्या या जाणीवांमुळे मैत्री, परंपरा आणि तिच्या सभोवतीच्या ताठर अपेक्षांना सुरुंग लागल्याने त्या धोक्यात येतात
निर्माते मिहेक सेर्नेक यांनी लिटिल ट्रबल गर्ल्सच्या स्व च्या-शोधाच्या मुख्य प्रवासाबद्दल बोलताना आपल्या भावना प्रांजळपणे व्यक्त केल्या. "एखाद्या गोष्टीची जाणीव होताना ती कधीही हळुवारपणे होत नाही, ती तुम्हाला ऐकणे असह्य होईल अशा कर्कश्श गाण्यासारखी होते," असे त्यांनी चित्रपटाच्या भावनिक स्पंदनाचे वर्णन करताना म्हटले.
चित्रपट तयार करतानाच्या प्रक्रियेचा खोलवर वेध घेताना सर्नेक यांनी त्याच्या अद्वितीय सर्जनशील परिदृश्याचे ज्वलंत चित्र उभे केले. त्यांच्या टीमने चर्चेसमध्ये जाऊन तिथल्या पवित्र, भारून टाकणाऱ्या वातावरणात चार आठवडे चित्रीकरण केले, सेटवर थेट ध्वनीमुद्रित केलेल्या कॉयरच्या सादरीकरणासोबतच कॉयरच्या शिस्तबद्ध जीवनाचेही चित्रण केले. 17 वर्षांच्या मुख्य नायिकेने, निरागसता आणि लक्षणीय भावनिक खोली यांचा उत्तम समतोल साधल्याने त्याला आणखी एक सूक्ष्मतेचा तरल पदर जोडला गेला. निर्मितीने एका गूढ गुहेत प्रवेश केला, त्याचे वर्णन सर्नेक यांनी "स्वतंत्र असे विश्व" असे केले आहे.
त्यांच्यामते, हे अवकाश त्यांच्या भौतिक स्वरूपाच्या पलीकडे पोहोचले: "चर्च, जंगल, गुहा ही नुसती ठिकाणे नाहीत. तर ती जणू पात्रे आहेत. या अवकाशांनी चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेले आहे."
सर्मेक यांनी स्लोव्हेनियाच्या सांस्कृतिक जडणघडणीत असलेले चित्रपटाचे संदर्भ अधिक स्पष्ट केले, देशाच्या खोलवर रुजलेल्या कोरल परंपरा आणि कॅथोलिक वारसा लक्षात घेऊन. "आम्ही सर्वजण गाणी म्हणत मोठे झालो. आणि आम्ही सर्वजण शिस्तीत वाढलो आहोत," असे त्यांनी नमूद केले.
चित्रपटाच्या सार्वत्रिक प्रभावाबद्दलचे विचार व्यक्त करताना निर्मात्याने, "प्रत्येक तरुणाला या जगाला त्याच्याकडून असलेली अपेक्षा आणि त्याला स्वतःला खरोखर काय बनण्याची इच्छा आहे या दोन गोष्टींचा सारखाच संघर्ष करावा लागतो.", हा शांत पण मनातला खोलवर संघर्षच "लिटिल ट्रबल गर्ल्स"अचूकपणे जगाची नस टिपतो, असे ते म्हणाले
Comments
Post a Comment