‘स्मार्ट सुनबाई’ २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
‘स्मार्ट सुनबाई’ २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित, कार्तिक दोलताडे पाटील सह निर्मित 'स्मार्ट सुनबाई' हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संपूर्ण कौटुंबिक मेजवानी ठरणार आहे! सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. चित्रपटातील रोमँटिक गीतांचा गोडवा या कथेला नव्या रंगात रंगवतो आणि प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं भावविश्व निर्माण करतो. हसवणूक, रहस्य आणि कौटुंबिक नात्यांच्या गुंतागुंतीच्या वातावरणातही या सुरेल गाण्यांनी प्रेम आणि भावना यांची एक सुंदर छटा निर्माण केली आहे. प्रत्येक गाणं हे कथानकाच्या प्रवाहाशी घट्ट जोडलेलं असून, ते पात्रांच्या भावनांना अधिक खोली देतं.
‘स्मार्ट सुनबाई’ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी कलाकारांची झगमगती फळी एकत्र आली आहे. संतोष जुवेकर, रोहन पाटील, भाऊ कदम, किशोरी शहाणे, सायली देवधर, मोहन जोशी, दीपक शिर्के, प्राजक्ता हनमघर, प्राजक्ता गायकवाड, उषा नाईक, अंशुमन विचारे, स्नेहल शिदम, विनम्र बाबल, भक्ती चव्हाण, दीप्ती सोनवणे, अनुष्का बेनके, पूजा राजपूत, सुचिका जोशी, विद्या मेहेत्रे, मोनिका बंगाळ, आर्या सकुंडे, वैशाली चौधरी, सपना पवार, कांचन चौधरी या कलाकारांच्या दमदार उपस्थितीमुळे चित्रपटाला भव्यतेची झळाळी प्राप्त झाली आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता आणि स्क्रीनवरील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच मोहून टाकेल.
चित्रपटाची कथा आणि लेखन योगेश शिरसाट यांनी प्रभावीपणे साकारले असून, विजय नारायण गवंडे आणि साई–पियुष यांनी या चित्रपटाला सुरेल संगीताची साथ दिली आहे. गीतकार वैभव देशमुख आणि अदिती द्रविड यांच्या सुंदर लेखणीतून उमटलेली गाणी, तर अजय गोगावले, वैशाली माढे, आनंदी जोशी, सावनी रवींद्र आणि उर्मिला धनगर यांच्या मधुर आवाजाने सजलेली ही संगीतमय मेजवानी ‘स्मार्ट सुनबाई’ला एक वेगळीच ओळख देणार आहे.
‘स्मार्ट सुनबाई’ नक्कीच प्रेक्षकांसाठी एक ताजं, रंगतदार आणि पूर्णतः एंटरटेनिंग अनुभव ठरणार आहे. हा सिनेमा २१ नोव्हेंबर २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Comments
Post a Comment