एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री खुली होणार ११ नोव्हेंबर रोजी
एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री खुली होणार ११ नोव्हेंबर रोजी
* · एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेड या कंपनीच्या आयपीओसाठी प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा किंमतपट्टा २०६ ते २१७ रुपये इतका निश्चित.
* · अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख : सोमवार, १० नोव्हेंबर २०२५
* ·
बोली / प्रस्ताव उघडण्याची तारीख : मंगळवार, ११ नोव्हेंबर २०२५
* ·
बोली / प्रस्ताव बंद होण्याची तारीख : गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५
* ·
गुंतवणूकदारांना किमान ६९ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ६९ समभागांच्या पटीत बोली लावता येईल.
एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या मंगळवारी, दि. ११ नोव्हेंबर सुरू होणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी आयपीओमधील बोली प्रक्रिया एक कामकाजाच्या दिवस आधी, म्हणजे सोमवार, दि. १० नोव्हेंबर रोजी होईल. बोली प्रक्रिया बंद होण्याची तारीख गुरुवार, १३ नोव्हेंबर २०२५ आहे.
या आयपीओसाठी प्रत्येकी २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा २०६ ते २१७ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना किमान ६९ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ६९च्या पटीत बोली लावता येईल. आयपीओच्या या प्रस्तावामध्ये एकूण २१,४३८.६२ दशलक्ष (२,१४३.८६ कोटी) रुपयांच्या नवीन इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश आहे, तसेच मंजुनाथा डोंथी वेंकटारथ्नैया आणि शुभा मंजुनाथा डोंथी (प्रवर्तक विक्री भागधारक) या विद्यमान भागधारकांकडील ७,५६१.३८ दशलक्ष (७५६.१४ कोटी) रुपयांच्या समभागांची विक्री (ऑफर फॉर सेल) केली जाणार आहे.
एमव्ही फोटोव्होल्टाइक पॉवर ही कंपनी मुख्यतः सौर मॉड्यूलची उत्पादक आहे. क्रिसिलच्या अहवालाप्रमाणे, ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या उत्पादन क्षमतेनुसार, एकात्मिक सौर फोटोव्होल्टाइक (पीव्ही) मॉड्यूल आणि सौर सेल यांचे उत्पादन करणारी ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे, तसेच देशातील अग्रगण्य सौर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी ती एक आहे. ३० जून २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार कंपनीकडे ७.८० गिगावॅट्स इतकी सौर पीव्ही मॉड्यूल्सच्या उत्पादनाची क्षमता आणि २.९४ गिगावॅट्स इतकी सौर सेलच्या उत्पादनाची क्षमता आहे. या क्षेत्रात कंपनीला १८ वर्षांहून अधिक कामकाजाचा अनुभव आहे. तसेच, ही कंपनी भारतातील उच्च कार्यक्षम “टनेल ऑक्साइड पॅसिव्हेटेड कॉन्टॅक्ट” (टीओपीकॉन) तंत्रज्ञानाचा अवलंब करून सौर सेल निर्मिती सुरू करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांपैकी एक आहे. मार्च २०२५ पर्यंत या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मोजक्या भारतीय सौर सेल उत्पादकांमध्ये ही कंपनी गणली जाते.
ही प्राधमिक समभाग विक्री प्रक्रिया सेबीच्या आयसीडीआर नियमनातील कलम ६(२) नुसार बुक बिल्डिंग पद्धतीद्वारे केली जात आहे. या नियमानुसार आणि कलम ३२(१) च्या तरतुदीनुसार, एकूण प्रस्तावित समभागांपैकी किमान ७५ टक्के भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी क्यूआयबी प्रमाणानुसार वाटपासाठी राखीव असेल. कंपनीला आपल्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) यांच्या सल्ल्यानुसार, या क्यूआयबी भागातील कमाल ६० टक्के हिस्सा अँकर गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीप्रमाणे वाटप करण्याचा अधिकार आहे. या अँकर गुंतवणूकदार भागामधील किमान एकतृतीयांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल, त्याकरीता अशा फंडांकडून अँकर गुंतवणूकदार वाटप किंमतीइतकी किंवा त्याहून जास्त किंमतीची बोली यावी लागेल. जर अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव भागात पूर्ण मागणी नसेल किंवा काही समभागांचे वाटप झाले नसेल, तर उरलेले समभाग नेट क्यूआयबी भागामध्ये समाविष्ट केले जातील.

Comments
Post a Comment