झोमॅटो आणि ब्लिंकिटने डिलिव्हरी भागीदारांना सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली

 झोमॅटो आणि ब्लिंकिटने डिलिव्हरी भागीदारांना सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली

एप्रिल पासून ६,००० हून अधिक भागीदारांची नोंदणी



मुंबई, ६ नोव्हेंबर २०२५: देशातील प्रमुख कंपन्या झोमॅटो (भारताची फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म) आणि ब्लिंकिट (क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म) यांनी हक्कदर्शक या संस्थेच्या सहकार्याने बेंगळुरूमध्ये सरकारी योजना सहाय्य शिबिरांच्या मालिकेतील पहिले शिबिर आयोजित केले. या उपक्रमाचा उद्देश वितरण भागीदारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. 

एप्रिल २०२५ मध्ये सुरू झाल्यापासून या उपक्रमांतर्गत देशभरातील ६,००० हून अधिक डिलिव्हरी भागीदारांना विविध सरकारी कल्याणकारी योजनांमध्ये नोंदणी करण्यात आली असून, त्याद्वारे ₹१५० कोटींपेक्षा अधिक हक्कसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेंगळुरूमध्ये आयोजित शिबिराद्वारे आणखी २८० हून अधिक डिलिव्हरी भागीदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित योजनांसाठी नोंदणी केली, ज्यामुळे बेंगळुरूतील एकूण नोंदणीकृत डिलिव्हरी भागीदारांची संख्या आता १,००० पेक्षा अधिक झाली आहे. 

पुढील काही आठवड्यांमध्ये, झोमॅटो आणि ब्लिंकिट, हक्कदर्शक यांच्या सहकार्याने मुंबई, पुणे आणि दिल्ली येथे सरकारी योजना सुविधा शिबिरे आयोजित करणार आहेत.

हा उपक्रम ईटर्नलच्या डिलिव्हरी भागीदारांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. यात ८०० हून अधिक शहरांमध्ये २४/७ आपत्कालीन (SOS) रुग्णवाहिका सेवा, अपघात विमा, आयकर भरण्यास मदत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पात्र महिला डिलिव्हरी भागीदारांना मातृत्व लाभांची सुविधा देखील उपलब्ध आहे.

डिलिव्हरी भागीदारांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आरोग्य विमा), रेशन कार्ड, ई-श्रम (असंघटित कामगारांचा केंद्रीकृत डेटाबेस), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (जीवन विमा), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (व्यक्तिगत अपघात विमा) आणि कर्नाटक राज्य गिग वर्कर्स इन्शुरन्स योजना अशा विविध योजनांबद्दल विशेष रुची दाखवली आहे. अनेक भागीदार आता आरोग्य विमा, व्यक्तिगत अपघात विमा आणि जीवन विमा अशा विविध संरक्षण योजनांचा एकत्रित लाभ घेण्याचा पर्याय निवडत आहेत, ज्यातून बहुस्तरीय सुरक्षा कवचाची वाढती गरज आणि जाणीव स्पष्ट होते. 

कार्यक्रमात बोलताना, ईटर्नलच्या मुख्य सस्टेनेबिलिटी अधिकारी अंजली रवी कुमार म्हणाल्या, “डिलिव्हरी भागीदारांचे कल्याण हे ईटर्नलमध्ये आम्ही करत असलेल्या प्रत्येक कामाच्या केंद्रस्थानी आहे. अनेक शिबिरांपैकी हे पहिले सरकारी योजना सुविधा शिबिर डिलिव्हरी भागीदार आणि त्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवणाऱ्या सरकारी कल्याणकारी योजनांमधील दरी भरून काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. आम्ही आमचे सुविधा भागीदार - हकदर्शक यांच्यासोबत आमच्या संपर्क प्रयत्नांमध्ये सतत शिकत आणि विकसित होत आहोत. उदाहरणार्थ, आम्ही पाहिले आहे की महिला आणि दिव्यांग डिलिव्हरी भागीदार या लाभांसाठी नोंदणी करण्यास अधिक उत्सुक आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, या योजना सर्वांसाठी खऱ्या अर्थाने सुलभ होण्यासाठी बहु-वाहिनी प्रवेश सक्षम करण्याची गरज आहे. आम्ही केंद्र आणि राज्य मंत्रालयांबरोबर घनिष्ठ सहकार्याने या उपक्रमाचा विस्तार करण्यास आणि देशभरात दीर्घकालीन परिणाम घडविण्यास उत्सुक आहोत. 

उमावती, जी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ झोमॅटोची डिलिव्हरी भागीदार म्हणून कार्यरत आहे, म्हणाली,“मी आयुष्मान भारत, पेन्शन योजना आणि ई-श्रम कार्ड यांसारख्या लाभांसाठी नोंदणी करू शकले. या योजना माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत आणि त्यांनी मला सुरक्षिततेची आणि स्थैर्याची भावना दिली आहे. झोमॅटो आणि ब्लिंकिट यांनी आयोजित केलेल्या सरकारी योजना सहाय्य शिबिरामुळे संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आणि समजण्यास सुलभ झाली. मी इतर डिलिव्हरी भागीदारांनाही अशा शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन करते.”

हकदर्शकचे उपाध्यक्ष (उत्पादन) मनोज जोशी म्हणाले, “झोमॅटो आणि ब्लिंकिटसोबतचे आमचे सहकार्य कल्याणकारी योजना मोठ्या स्तरावर सुलभ करत आहे. हकदर्शकच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पात्रता तपासणी इंजिनद्वारे, आम्ही तंत्रज्ञान आणि मानवी मदतीचा समन्वय साधून डिलिव्हरी भागीदारांसाठी लाभांचा प्रवेश सोपा करत आहोत. आम्ही पाहिले आहे की, डिलिव्हरी भागीदारांना आरोग्य, अपघात आणि जीवन विमा यांचा समावेश असलेले व्यापक संरक्षण हवे आहे. हे शिबिर भारताच्या गिग कार्यबळाच्या वाढत्या घटकातील डिलिव्हरी भागीदारांच्या कल्याणाला आधार देणाऱ्या योजनांबद्दल जागरूकता देखील वाढवत आहेत. झोमॅटो आणि ब्लिंकिट यांच्यासोबत आम्ही गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता मिळवण्याचे मापनक्षम मार्ग तयार करत राहू.”

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs