'खुल्या पटांगणातीलचित्रपट प्रदर्शनांमुळे इफ्फीचे दरवाजे स्थानिकांसाठी खुले
'खुल्या पटांगणातीलचित्रपट प्रदर्शनांमुळे इफ्फीचे दरवाजे स्थानिकांसाठी खुले
(अशोक रा. शिंदे यांजकडून)
खुल्या पटांगणात चित्रपट दाखवणे हा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी चा एक अविभाज्य भाग आहे. इफ्फीचा प्रमुख महोत्सव अशाच प्रतिनिधींसाठी डिझाइन केला आहे की ज्यांनी शुल्क भरून नोंदणी केली आहेआणि ते खरे चित्रपटप्रेमी आहेत. साधारणपणे IFFI मधील चित्रपट 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी मर्यादित असतात आणि प्रौढ, चित्रपटसाक्षर प्रेक्षकांसाठी तयार केलेले असतात.

तथापि हेही तितकेच खरे की इफ्फी स्थानिक समुदायाला सहभागी करून घेण्यासाठी आणि सर्वत्र उत्सवी वातावरण निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. विशेषतः इफ्फी दरम्यान, गोव्यात खूप उत्सवी वातावरण निर्माण होते आणि गोव्यातील रहिवाशांना याप्रसंगी एकत्र बाहेर पडून, उत्सवाच्या वातावरणाचा आनंद घेत, उत्तम पदार्थांचा आस्वाद आणि समुद्रकिनाऱ्यावरील खारा वारा अनुभवत चित्रपट पहाणे खूप आवडते. खुल्या पटांगणातील चित्रपट प्रदर्शनाचे उद्दिष्ट अशा प्रेक्षकवर्गाची इच्छा अगदी योग्य प्रकारे पूर्ण करणे हा आहे.
इफ्फीचे कलासंचालक पंकज सक्सेना म्हणाले, "खुल्या प्रांगणातील प्रदर्शनासाठी निवडलेले हे चित्रपट कुटुंबासाठी निर्माण केलेले, कौटुंबिक चित्रपट आहेत. सुंदर आकाश, स्वच्छ परिसर, सुस्पष्ट ध्वनी, आरामदायी आसनव्यवस्था आणि उच्च दर्जाचे प्रक्षेपण अशाप्रकारे समुद्रासमोरील स्थळांवर खुल्या हवेत बहुतेक चित्रपट प्रदर्शन आयोजित केले जात आहेत. सात दिवस दररोज एक खेळ याप्रमाणे ते आयोजित केले आहेत आणि निवडलेले चित्रपट आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय असतातच; शिवाय कुटुंबांस एकत्रपणे पाहण्यासाठी नेहमीच योग्य असतात."

ते पुढे म्हणाले, "निवडीच्या बाबतीत, या वर्षी आमच्याकडे सुमारे एकापाठोपाठ एक आठ चित्रपट आहेत.सर्व वयोगटांसाठी योग्य असलेले आणि अनेकदा एक छोटासा संदेश किंवा सार्वत्रिक संकल्पना दृगोच्चर करणाऱ्या असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे मिश्रण सादर करणे,ही या निवडीमागील कल्पनाआहे. याव्यतिरिक्त, आम्ही प्रदर्शित केलेले यातील काही चित्रपट इफ्फीच्या मागील आवृत्त्यांमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शित झाले आहेत किंवा पुरस्काराने सन्मानित केले गेले आहेत."
खुल्या पटांगणात यंदाच्या वर्षी आयोजित केलेल्या चित्रपटांची यादी:
- होम अलोन/ दिग्दर्शक: ख्रिस कोलंबस
- इफ (इमॅजिनरी फ्रेंड्स)/ दिग्दर्शक: जॉन क्रासिन्स्की
- सोनिक द हेजहॉग/ दिग्दर्शक: जेफ फाउलर
- द ट्रूमॅन शो/ दिग्दर्शक: पीटर वेयर
- 12th फेल/ दिग्दर्शक: विधू विनोद चोप्रा
- माय बॉस/ दिग्दर्शक: नंदिता रॉय, शिबोप्रसाद मुखर्जी
- मंजुम्मेळ बॉईज/ दिग्दर्शक: चिदंबरम
- श्यामची आई/ दिग्दर्शक: सुजय डहाके
थोडक्यात, खुल्या पटांगणात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांमुळे इफ्फी हा केवळ एक गंभीर, प्रतिनिधी-केंद्रित महोत्सव न राहता, विशेषतः ज्या कुटुंबांना एकत्र खुल्या आकाशाखाली चांगला चित्रपट पाहायचा आहे,अशा सर्वांसाठी एक प्रिय उत्सव होतो.
Comments
Post a Comment