दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने 'जिप्सी' सिनेमा पाहण्याची सिनेरसिकांना पर्वणी!
महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंतर्गत
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने 'जिप्सी' सिनेमा पाहण्याची सिनेरसिकांना पर्वणी!
अनवट वाट चोखाळणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या 'जिप्सी' या नव्याकोऱ्या सिनेमाच्या खेळाचे पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथे आयोजन करण्यात आले आहे. वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी म्हणजे 'जिप्सी' हा सिनेमा! दिग्दर्शक शशिकांत खंदारे यांच्या या पदार्पणातील सिनेमावर कान, इफ्फी यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून जगभरच्या प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपल्या मातीतील ही सिनेकथा एका लहानग्याच्या आत्मशोधाचा पट मांडत प्रेक्षकांना अंतर्मुख करून जाते.
अशा या भारतीय वास्तववादी सिनेप्रवाहाला समृद्ध करणाऱ्या 'जिप्सी'चा आस्वाद घेण्याची संधी दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. येत्या रविवारी, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी येथे रसास्वाद मंडळाच्या वतीने 'जिप्सी' या मराठी सिनेमाचे खास प्रदर्शन करण्यात येणार आहे. या खेळास आपल्या मित्रपरिवारासह नक्की या आणि जाणून घ्या तरुण, कल्पक चित्रकर्मींसोबत या चित्रपटाचा विलक्षण प्रवास!
🎞️ कार्यक्रम तपशील : * दिनांक : १६ नोव्हेंबर २०२५ (रविवार) * वेळ : दुपारी ३ वाजता * स्थळ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई * प्रवेश : विनामूल्य (मर्यादित आसने) आसन व्यवस्था- प्रथम येणाऱ्या प्रथम. अधिक माहितीसाठी- ९७०२२७०८२१
Comments
Post a Comment