कोरोना रेमिडीज लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री सोमवार 08 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू
कोरोना रेमिडीज लि. ची प्राथमिक समभाग विक्री
मवार 08 डिसेंबर 2025 पासून होणार सुरू
·
कोरोना रेमिडीज लिमिटेडच्या प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“Equity Shares”) 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित
·
बोली/ऑफर सोमवार 08 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025 आहे.
·
बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
·
कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत
कोरोना रेमिडीज लिमिटेड (CRL) ने इक्विटी शेअर्ससाठी सोमवार 08 डिसेंबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली/ऑफर बुधवार, 10 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रति इक्विटी शेअरसाठी 1008 रु. ते 1062 रु. किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. जे एम फायनान्शियल लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार 05 डिसेंबर 2025 आहे. बोली किमान 14 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 14 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. या ऑफरमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्याची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी आहे.
एकूण ऑफर साइजमध्ये प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सची एकूण रक्कम 6,553.71 दशलक्ष रु. इतकी असून यात खालीलप्रमाणे समावेश आहे: डॉ. कीर्तिकुमार लक्ष्मीदास मेहता (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सची 1,298.41 दशलक्ष रु. इतकी रक्कम; मिनाक्षी कीर्तिकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक ) यांच्याकडून प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] इक्विटी शेअर्सची 766.07 दशलक्ष रु. इतकी रक्कम; दिपाबेन निरवकुमार मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यंतचे प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले जास्तीत जास्त [●] पर्यंत इक्विटी शेअर्स; ब्रिंदा अंकुर मेहता (प्रमोटिंग ग्रुप विक्री समभागधारक) यांच्याकडून 103.87 दशलक्ष रु. पर्यत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या जास्तीत जास्त [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेपिया इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 4,046.00 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; अँकर पार्टनर्स (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 151.25 दशलक्ष रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स; सेज इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (गुंतवणुकदार विक्री समभागधारक) यांच्याकडून 84.24 दशलक्ष रु पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले [●] पर्यंतचे इक्विटी शेअर्स यांचा यात समावेश आहे. कर्मचारी राखीव भागांत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 54 रु. ची सवलत दिली जात आहे.

Comments
Post a Comment