प्रोजेक्ट मुंबईने आयोजित केलेला झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी मेळा 2025
प्रोजेक्ट मुंबईने आयोजित केलेला झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी मेळा 2025
प्रोजेक्ट मुंबईने झिरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी मेळावा २०२५ चे आयोजन केले. या वैविध्यपूर्ण, युवा-केंद्रित हवामान कृती महोत्सवाचे शीर्षक 'होप इन अॅक्शन: युथ फॉर ए क्लायमेट-रेझिलिएण्ट मुंबई' होते. या महोत्सवामध्ये ३० हून अधिक शाळा, शिक्षक, नागरी नेते, पर्यावरणवादी आणि शेकडो उत्साही विद्यार्थी परिवर्तनकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वर्गातील हवामान उपक्रम आणि आगामी मुंबई क्लायमेट वीक २०२६ यांच्यातील पूल म्हणून डिझाइन करण्यात आलेल्या या मेळाव्याने निदर्शनास आणले की, प्रत्यक्ष शाश्वत परिवर्तनामुळे शहरातील नागरिकांच्या वर्तणूकीमध्ये बदल घडून येऊ शकतो. या इव्हेण्टची उत्साहात सुरूवात झाली, जेथे झिरो वेस्ट स्कूल्स फिल्मचे स्क्रिनिंग करण्यात आले, दीपप्रज्वलन करण्यात आले, तसेच भारतातील हवामान व शाश्वतता क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रमुख मान्यवरांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित माझी वसुंधरा अभियानाचे मिशन संचालक श्री. सुधाकर बोबडे यांनी चार दशकांपासून करत असलेली सार्वजनिक सेवा, तसेच हवामानाला प्रतिसाद देणारे प्रशासन प्रबळ करण्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाबाबत माहिती सांगितली.
प्रोजेक्ट मुंबई व मुंबई क्लायमेट वीकचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिशिर जोशी यांनी नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या हवामान परिवर्तनाचे महत्त्व सांगितले. चिल्ड्रन्स अकॅडमीमधील श्री. रोनित भट यांनी शाळांमध्ये अनुभवात्मक, शाश्वतता-केंद्रित शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली. मरिन बायोलॉजिस्ट व झीरो वेस्ट स्कूल्ससाठी वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री. कोणार्क बोरकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासूवृत्ती आणि हवामानाप्रती जबाबदारी जागृत करण्यावर भर दिला. तरूणांचा उत्साह वाढवत झीरो वेस्ट स्कूल्स प्रोग्रामचे दोन तरूण विद्यार्थी चॅम्पियन्सनी मंचावर विद्यार्थी-केंद्रित हवामान नेतृत्वाचे प्रतिनिधीत्व केले.
या मेळाव्याची खासियत म्हणजे सस्टेनेबल गिफ्ट रॅपिंग, ग्रीन रिडिंग आणि प्लास्टिक-फ्री डेकॉर (प्लास्टिक- मुक्त सजावट) यावर एकाच वेळी तीन प्रत्यक्ष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले, तसेच सोबत प्रदर्शन झोन देखील होते. विद्यार्थ्यांनी दहा परस्परसंवादात्मक शाश्वतता गेम स्टॉल्स, चक्रिय अर्थव्यवस्थेचे प्रदर्शन, एनजीओ बूथ्स आणि चार प्रोजेक्ट मुंबई स्टॉल्स पाहिले, जेथे त्यांना कंपोस्टिंग, रिसायकलिंग, अपसायकलिंग आणि लो-वेस्ट लिव्हिंगबाबत प्रात्यक्षिके पाहायला मिळाली. या अनुभवामधून त्यांना शिकवण मिळाली की, विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीमधून शिकतात तेव्हा शाश्वततेबाबत ध्येय उत्साहात व सहजपणे गाठता येते.
दुपारच्या सत्रामध्ये युनिसेफ इंडियाचे वॉश सीसीईएस स्पेशलिस्ट श्री. युसुफ कबीर यांनी मुख्य भाषणासह उपस्थितांना प्रेरित केले. वॉश, हवामान अनुकूलन व सार्वजनिक आरोग्यामधील त्यांच्या दशकांपासूनच्या कार्याने उपस्थित तरूणांना प्रभावित केले. यानंतर पहिल्या पॅनेल चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, ज्याचे सूत्रसंचालन तरूण पर्यावरणवादी राहुल बागवे यांनी केले. या चर्चासत्रामध्ये लेव्हल २ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, जेथे विद्यार्थ्यांनी त्यांचे हवामान उपक्रम आणि हरित शालेय समुदाय घडवण्यामधील आव्हाने व संधींबाबत चर्चा केली.
या इव्हेण्टचे खास आकर्षण म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित यूएन एन्व्हारोन्मेंट गुडविल अॅम्बेसेडर दिया मिर्झा यांनी तरूणांसोबत चर्चा केली. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत हवामान जबाबदारीबाबत चर्चा केली, ज्यानंतर टाऊनहॉल-स्टाइलमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी दिलेल्या संदेशामधून विश्वास दिसून आला की तरूण भावी प्रमुख असण्यासोबत आजचे प्रमुख देखील आहेत, जे धैर्य व स्पष्टतेसह शहराच्या हवामान भविष्याला आकार देतील. या मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये विद्यार्थी आणि शाळेच्या कामगिरीला देखील सन्मानित करण्यात आले, जेथे ९ लेव्हल २ शाळा, २० लेव्हल १ शाळा आणि झीरो वेस्ट स्कूल्स प्रोग्रामप्रती अपवादात्मक कटिबद्धता दाखवलेल्या २० फॅसिलिटेटर्सना पुरस्कारासह गौरवण्यात आले. या पुरस्कारांमधून शाळा कंपोस्टिंग, विलगीकरण, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि विद्यार्थी- केंद्रित हवामान उपक्रमांच्या माध्यमातून झीरो-वेस्ट झोन्समध्ये बदलत असल्याची खात्री मिळाली. सस्टेनेबिलिटी मेळा २०२५ विद्यार्थी, शिक्षक, नागरी अधिकारी व सामुदायिक सहयोगी सहयोगाने हवामान कृतीला गती देऊ शकण्याचे आदर्श उदाहरण आहे. मुंबई क्लायमेट वीकच्या मोठ्या चळवळीचा भाग म्हणून इव्हेण्टने तरूण हरित चॅम्पियन्सच्या मतांना प्राधान्य दिले आणि विकासात्मक संकल्पनांना दाखवले, जसे सामुदायिक कंपोस्टिंग, प्लास्टिक कमी करणाऱ्या मोहिमा आणि चक्रिय अर्थव्यवस्था उपाययोजना. शालेय स्तरावरील कृती आणि शहरी स्तरावरील हवामान स्थिरतेबाबत चर्चांना एकत्र करत हा उपक्रम मुंबईच्या हवामान नेतृत्वाच्या परिसंस्थेला प्रबळ करतो.
या वर्षातील सेलिब्रेशन समाप्त होत असताना मेळाव्यामधून स्पष्ट संदेश मिळाला आहे की, विद्यार्थ्यांनी नेतृत्व केल्यास शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते. झीरो वेस्ट स्कूल्स सस्टेनेबिलिटी मेळावा २०२५ ने निदर्शनास आणले आहे की, विलगीकरणाची सवय ते अपसायकलिंग प्रकल्पापर्यंत प्रत्येक लहान कृतीमधून वर्गापलीकडे मोठे फायदे मिळतात. कटिबद्ध सहयोगी, प्रेरणादायी प्रमुख आणि उत्कट तरूण परिवर्तनकर्त्यांसह मुंबईच्या शुद्ध, हरित, शून्य-कचरा भविष्याच्या दिशेने प्रवासाला गती मिळाली आहे. चळवळीमध्ये सामील व्हा. 'होप इन अॅक्शन' क्षणाचा भाग बना.
तुम्हाला स्वयंसेवक, सहयोगी बनायचे असेल किंवा झीरो वेस्ट स्कूल्स प्रोग्राम आणि आमच्या वाढत्या हवामान-कृती समुदायाला पाठिंबा द्यायचा असेल तर आम्हाला info@projectmumbai.org येथे ईमेल करा किंवा ९६५३३ ३०७१२ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधा.

Comments
Post a Comment