एनयूसीएफडीसी आणि आयआयएमए व्हेंचर्सनी ‘भारत को-ऑपाथॉन 2025’ लाँच केले
एनयूसीएफडीसी आणि आयआयएमए व्हेंचर्सनी ‘भारत को-ऑपाथॉन 2025’ लाँच केले
अर्बन कोऑपरेटिव बँकांच्या डिजिटल रूपांतरणाला गती देण्यासाठी एक उपक्रम, जो उच्च क्षमतायुक्त इनोव्हेटर्सना संघटित, स्केलेबल आणि स्वदेशी उपाय अंमलात आणण्यासाठी जोडतो
मुंबई,19 डिसेंबर 2025: अर्बन को-ऑपरेटिव बँकांचा अम्ब्रेला ऑर्गनायझेशन असलेल्या नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NUCFDC) ने आयआयएमए व्हेंचर्स (IIMA Ventures) सोबत मिळून भारत को-ऑपाथॉन 2025 ची सुरुवात केली आहे. ही निवड-आधारित पुढाकार प्रतिभावान इनोव्हेटर्सना कंप्लायंट, स्केलेबल आणि कमी खर्चिक डिजिटल सोल्युशन्स अर्बन को-ऑपरेटिव बँकांमध्ये (UCBs) अमलात आणण्याची संधी देणार असून, या बँकांमधील डिजिटल परिवर्तनाचा वेग वाढवणार आहे. या उपक्रमात स्टार्ट-अप्स, फिनटेक कंपन्या, टेक्नोलॉजिस्ट्स, प्रॉडक्ट टीम्स आणि डेटा इनोव्हेटर्स UCB इकोसिस्टमच्या गरजेनुसार आपली सोल्युशन्स सादर करू शकणार आहेत.
भारत को-ऑपाथॉन 2025 चा उद्देश UCBsना त्यांच्या बँकिंग सिस्टिममध्ये सुधारणा करण्यास, रिस्क मॅनेजमेंट अधिक मजबूत करण्यास आणि कामकाज आधुनिक बनवण्यास मदत करणे आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व सोल्युशन्सचे पारदर्शक पद्धतीने आणि ठरवलेल्या निकषांनुसार मूल्यमापन केले जाईल. या निकषांमध्ये इनोव्हेशन, सुरक्षा, नियमांचे पालन, मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणीची क्षमता आणि उपयुक्तता यांचा समावेश असेल.
या उपक्रमाचा उद्देश अर्बन को-ऑपरेटिव बँकिंग क्षेत्रात आर्थिक समावेशन अधिक खोलवर रुजवणे, गव्हर्नन्स मानके मजबूत करणे आणि दीर्घकालीन विकासाला बळकटी देणे आहे. या कार्यक्रमात सायबर सुरक्षेच्या चौकटीवर विशेष भर देण्यात येणार असून, त्यात डेटा सार्वभौमत्व, ग्राहक संरक्षण आणि नियामक अनुपालन यांचा समावेश असेल. हा प्रोग्राम संपूर्ण क्षेत्रात मानकीकरणाला चालना देईल आणि सोल्युशन्सना पायलट टप्प्यापासून पूर्ण स्तरावरील अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी इनोव्हेटर्स आणि बँकांदरम्यान शाश्वत भागीदारी निर्माण करण्यास मदत करेल.
या उपक्रमाबाबत एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री प्रभात चतुर्वेदी म्हणाले, “अर्बन कोऑपरेटिव बँका या भारताच्या एकूण वित्तीय समावेशनाच्या अजेंड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या संस्था असून, दीर्घकाळापासून त्या समुदाय-आधारित वित्तव्यवस्थेचा कणा राहिल्या आहेत. मोठ्या अर्बन को-ऑपरेटिव बँकांनी डिजिटल स्वीकाराच्या दिशेने लक्षणीय प्रगती केली असली, तरी अनेक लहान आणि मध्यम आकाराच्या बँकांमध्ये अजूनही मर्यादित तांत्रिक पायाभूत सुविधांचा वापर होत आहे. भारत को-ऑपाथॉन 2025 च्या माध्यमातून अर्बन कोऑपरेटिव बँकांना त्यांच्या गरजांना अनुरूप तंत्रज्ञान सोल्यूशन्सशी जोडून ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, यामुळे डिजिटल आधुनिकीकरण अधिक वेगवान आणि प्रभावी होण्यास मदत मिळेल.”
या उपक्रमाबाबत बोलताना आयआयएमए व्हेंचर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजिंग पार्टनर प्रियांका चोप्रा म्हणाल्या, “अर्बन कोऑपरेटिव बँका परिवर्तनासाठी तयार असून, भारत को-ऑपाथॉन 2025च्या माध्यमातून त्यांना आधुनिक आणि स्केलेबल तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी एक संरचित मार्ग उपलब्ध झाला आहे. या माध्यमातून इनोव्हेटर्सना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सज्ज असलेली सोल्यूशन्स सादर करण्याचे व्यासपीठ मिळते, तसेच अर्बन को-ऑपरेटिव बँकांसोबत अर्थपूर्ण सहकार्य साधून विशेषतः देशातील दुर्लक्षित आणि कमी उत्पन्न गटांसाठी प्रत्यक्ष मोजता येईल असा परिणाम साधण्याची संधी मिळते,.”
या कार्यक्रमांतर्गत निवडल्या जाणाऱ्या सोल्यूशन्सना सहभागी अर्बन को-ऑपरेटिव बँकांमध्ये पायलट प्रकल्प राबवण्याची तसेच त्यांचा विस्तार करण्याची संधी देण्यात येणार आहे. यासोबतच आयआयएमए व्हेंचर्सच्या निकष आणि प्रोटोकॉलनुसार सीड फंडिंग सहाय्याचाही लाभ उपलब्ध करून देण्यात येईल. सहभागी लोकांना इंटरॅक्टिव्ह वर्कशॉप्स, हॅकथॉन बूटकॅम्प्स आणि तज्ञ कोचिंग सत्रांमधून सोल्यूशन्स सुधारण्यासाठी आणि क्षेत्रविशिष्ट अडचणी सोडवण्यासाठी देखील फायदा होईल. भारत को-ऑपाथॉन 2025 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या : https://iimaventures.com/programs/bharat-
Comments
Post a Comment