कम्युनिटी बॉयलरचे अग्रणी स्टीमहाऊस
इंडियाने 425 कोटी रु. उभारण्यासाठी सेबीकडे UDRHP केला सादर
भारतामधील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे अग्रणी स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडने त्यांचा अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग
प्रॉस्पेक्टस 1 (UDRHP I) सिक्युरिटीज अँड
एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)कडे दाखल केला आहे. कंपनीने कॉन्फीडेन्शीयल ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (CDRHP) सेबी कडे 01 जुलै 2025 रोजी सादर केले होते
आणि त्यावर 14 ऑक्टोबर 2025 रोजी निरीक्षणे
प्राप्त झाली.
प्रस्तावित प्राथमिक समभाग विक्री मध्ये एकूण 425 कोटी रु. पर्यंतच्या प्रत्येकी 2 रु. दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असून यामध्ये विशाल सन्वरप्रसाद बुधिया (प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून 345 कोटी रु. पर्यंतच्या
इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 80 कोटी रु. पर्यंतच्या
इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल आहे.
BRLMs च्या सल्लामसलतीने, स्टीमहाऊस इंडिया लिमिटेड अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग
प्रॉस्पेक्टस 1दाखल केल्यानंतर आणि रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी 15 कोटी रु. पर्यंतच्या प्री-
आयपीओचा विचार करू शकेल. तसे केल्यास उभारला जाणारा निधी फ्रेश इश्यूमधून वजा केला
जाईल.
कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ निधीचा उपयोग कंपनीने घेतलेल्या काही
प्रलंबित कर्जाची परतफेड किंवा पूर्वपरतफेड; कंपनीच्या अंकलेल्श्वर सुविधा केंद्र (Phase 3) च्या क्षमतेच्या विस्तारासाठी पायाभूत सुविधा विकासाच्या (इन्फ्रास्ट्रक्चर
डेव्हलपमेंट) भांडवली खर्च गरजांसाठी आणि पानोळी सुविधा केंद्र (Phase 2) च्या क्षमतेच्या विस्तारासाठी; Dahej SEZ मध्ये वाफ निर्मितीसाठी नवीन उत्पादन सुविधा केंद्र
उभारण्यासाठी भांडवली खर्च; तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी करणार आहे.
कंपनीचे प्रवर्तक आणि सीएमडी विशाल बुधिया यांच्या नेतृत्वाखाली, स्टीमहाऊस इंडियाने 2014 मध्ये भारतात कम्युनिटी बॉयलर प्रणालीची संकल्पना सादर केली
(स्रोत: F&S अहवाल). कंपनीच्या औद्योगिक
वायू व्यवसायात वाफ निर्मिती व वितरण, वाफ खरेदी व वितरण, तसेच नायट्रोजनचे एक्स्ट्रॅक्शन, कंप्रेशन आणि पाइपलाइनद्वारे पुरवठा यांचा समावेश आहे.
सध्या कंपनी गुजरातमध्ये सहा मालकीचे आणि एक भाडेतत्त्वावरील असे सात
कम्युनिटी स्टीम बॉयलर्स चालवते. वापी फेज 1, वापी WTE युनिट, अंकलेश्वर फेज 1, अंकलेश्वर फेज 2, सारीगम, नांदेसरी आणि पानोळी या ठिकाणी हे कम्युनिटी स्टीम बॉयलर्स आहेत. कंपनीकडे
औषधनिर्माण, रसायने, कृषी-रसायने, वस्त्रोद्योग, टायर्स, डाईज आणि पिगमेंट्स, पॉलिमर्स, पेंट्स आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांतील औद्योगिक ग्राहकांचा स्थिर आधार आहे.
तसेच कंपनी प्रमुख बंदरांजवळ आणि ग्राहक क्लस्टर्सजवळ स्थित आहे.
कंपनीचे कम्युनिटी बॉयलर्स SPM, SOx आणि NOx उत्सर्जन आणि राखेचे
प्रमाण कमी करतात.
15 नोव्हेंबर 2025 पर्यंत या बॉयलर्सची
एकत्रित स्थापित वाफ निर्मिती क्षमता ताशी 345 टन असून ते वार्षिक 2,185,920 टन इतक्या स्थापित क्षमतेत रूपांतरित होते. याशिवाय, कंपनी Dahej GIDC आणि Sachin GIDC मध्ये खरेदी
केलेल्या वाफेचे वितरण 56,236 मीटर्स लांबीच्या स्वतःच्या, संचालित आणि देखभाल
केलेल्या पाइपलाइन प्रणालीद्वारे करते.
कंपनी आता इतर औद्योगिक वायूंच्या पुरवठ्यात विस्तार करत आहे. कंपनीने 1
फेब्रुवारी 2025 पासून नायट्रोजन उत्पादन आणि पुरवठा सुरू केला आणि तिचा पहिला
नायट्रोजन प्रकल्प अंकलेश्वर येथील केंद्रातील समर्पित पाइपलाइन नेटवर्कद्वारे सादर
करण्यात आला. कंपनीने तिच्या नायट्रोजन ऑपरेशन्समधून आर्थिक वर्ष 2025 मध्ये 0.90 दशलक्ष रु. आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या
अंतरिम कालावधीत 3.01 दशलक्ष रु. उत्पन्न
निर्माण केले. जोडीला, औद्योगिक वायू व्यवसायासाठी कंपनी प्राथमिक इंधन म्हणून कोळशाची खरेदी करते
आणि इनव्होईस ओन्ली आधारावर कोळसा व्यापारही
करते.
पारंपरिकपणे क्रायोजेनिक टाक्या किंवा ऑनसाइट नायट्रोजन जनरेशनचा वापर
करण्याऐवजी नायट्रोजनचा पुरवठा वितरित पाइपलाइन नेटवर्कद्वारे करणारी ही भारतातील एकमेव
कंपनी आहे.
कंपनी वाफ निर्मितीसाठी कोळसा तसेच प्लॅस्टिक कचरा आणि टेक्सटाइल चिंदीसारखे
गैर-जीवाश्म इंधन यांसह विविध प्रकारची इंधने वापरते. आता ते वाफ निर्मितीकरिता
इंधन स्रोत म्हणून कृषी-कचरा आणि रिफ्युज डीराईव्हड फ्युएल सारख्या पर्यायी इंधनांचे वाढीव पर्याय शोधत आहेत.
यांच्या प्रमुख ग्राहकांमध्ये एथर इंडस्ट्रीज लिमिटेड, अनुपम रसायन इंडिया लिमिटेड, ग्लोब एन्व्हायरो केअर लिमिटेड, गुजरात पॉलीसॉल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, देवांशी डायस्टफ, के. पटेल केमो फार्मा
प्रायव्हेट लिमिटेड, के. पटेल डाये केम
इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, महावीर सिंथेसिस प्रायव्हेट लिमिटेड, मंगलम इंटरमीडियरीज, ऑर्गो केम गुजरात
प्रायव्हेट लिमिटेड आणि सुभास्री पिगमेंट्स यांचा समावेश आहे. एकूण कंपनीने 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत 174 ग्राहकांना सेवा दिली आहे.
कंपनीचे कामकाजामधून मिळणारे उत्पन्न आर्थिक वर्ष 24 मधील 2,917.10 दशलक्ष रु. वरून आर्थिक वर्ष 25 मध्ये 3,951.06 दशलक्ष रु. पर्यंत वाढले. त्यात 35.44% वाढ दिसून आली. याच कालावधीत करपश्चात नफा (PAT) 271.86 दशलक्ष रु. वरून 311.61 दशलक्ष रु. पर्यंत वाढला.
30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत, कंपनीने कामकाजामधून 2,384.17 दशलक्ष रु. उत्पन्न आणि 130.85 दशलक्ष रु. करपश्चात नफा PAT नोंदवला. कामकाजामधून मिळणाऱ्या उत्पन्नात पुन्हा आलेल्या
ग्राहकांकडून असलेला वाटा 96.64% होता.
F&S नुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातील एकूण प्रक्रिया केलेल्या वाफेची मागणी
सुमारे 186,000 TPH होती. आर्थिक वर्ष 2025 ते 2030 दरम्यान 9.5% च्या निश्चित
केलेल्या CAGR सह हा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारण्याच्या दिशेने आहे.
औद्योगिक वायू औषधनिर्माण, रसायने आणि वस्त्रोद्योग यासारख्या मोठ्या स्तरावरील उद्योगांसाठी
अत्यावश्यक असतात. ते अधिकाधिक उत्पादन कार्यक्षमता आणि कामकाज स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची
भूमिका बजावतात.
आर्थिक वर्ष 2025 पर्यंत, सिलिंडर-आधारित पुरवठा हा भारताच्या औद्योगिक वायू (वाफ वगळून) मागणीच्या
मूल्याच्या 42.0% इतका होता. भारतीय
औद्योगिक क्षेत्र सतत विस्तारत असताना, पाइपलाइनद्वारे औद्योगिक वायू पुरवठा हा एक पसंतीचा पर्याय म्हणून उदयास येत
आहे.
इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (BRLM) आहेत.
Comments
Post a Comment