ऑटोमोटिव्ह लाइटिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी, निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्सकडून 600 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी

 ऑटोमोटिव्ह लाइटिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनीनिओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्सकडून 600 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी


 

क्रिसिलच्या अहवालानुसारआर्थिक वर्ष 2025 मध्ये मार्केट्मधील 34.43% हिश्श्यासह देशांतर्गत व्यावसायिक वाहन प्रकाशयोजना क्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांमध्ये निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्स लिमिटेडचा समावेश होतो. तसेच ओईएमसाठी ऑटोमोटिव्ह प्रकाश उत्पादने आणि कंपोनंट्सची एक प्रस्थापित उत्पादकजागतिक पुरवठादार असलेल्या निओलाइटने सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्डकडे (सेबी) आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे.

 

कंपनीच्या सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरमध्ये ₹6,000 दशलक्ष पर्यंतचे एकूण शेअर्स आहेत आणि त्यात कंपनीकडून ₹4,000 दशलक्ष पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि विक्री भागधारक - राजेश जैन (₹1,140 दशलक्ष)निओक्राफ्ट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड (₹400 दशलक्ष) आणि झेडकेडब्ल्यू ग्रुप जीएमबीएच (₹460 दशलक्ष) यांच्याकडून ₹2,000 दशलक्ष किमतीच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव आहे.

 

बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्यानेलागू कायद्यानुसार परवानगी मिळाल्यासकंपनी ₹750 दशलक्षपर्यंतच्या निर्दिष्ट सिक्युरिटीजचे आयपीओ-पूर्व प्लेसमेंट करण्याचा विचार करू शकते.

 

नवीन शेअर विक्रीतून मिळणारा निधी हा वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्याचा विचार आहे. यात तामिळनाडूच्या कांचीपुरम येथे ₹1,525.10 दशलक्ष खर्च करून एक नवीन कारखाना उभारण्याची योजना आहे. विद्यमान उत्पादन सुविधांमध्ये संयंत्र आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक विस्तारासाठी ₹790.79 दशलक्ष खर्च केले जातील. ₹650 दशलक्ष रकमेचा वापर हा काही थकबाकीकर्जाची पूर्ण किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी केला जाईल. त्यातूनही काही निधी जर शिल्लक राहिलातर तो सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी वापरला जाईल.

 

1992 मध्ये स्थापन झालेल्या निओलाइट झेडकेडब्ल्यू लाइटिंग्जने तिचे संस्थापक आणि प्रवर्तक श्री. राजेश जैन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश सोनी यांच्या नेतृत्वाखाली स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. प्रवासी वाहनेव्यावसायिक वाहनेऑफ-रोड वाहनेदुचाकी आणि तीन-चाकी वाहनांसहतसेच आफ्टरमार्केट विभागातील ओईएमसाठी ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादनांची उत्पादक आणि जागतिक पुरवठादार म्हणून आज या कंपनीचे नाव आहे. झेडकेडब्ल्यू ग्रुप जीएमबीएच (ही 2018मध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्सची उपकंपनी बनली) सोबत कंपनीची धोरणात्मक भागीदारी आहे. व्यवसायाची वाढतांत्रिक क्षमता आणि भौगोलिक विस्तार मजबूत करण्यासाठी एक धोरणात्मक निर्णय म्हणून सुरू झालेल्या या भागीदारीने 2012 पासून आपसातील व्यावसायिक संबंध अधिक दृढ केले आहेत. जागतिक ऑटोमोटिव्ह लाइटिंग उद्योगातील ही एक आघाडीची कंपनी आहेजी प्रीमियम लाइटिंग सोल्यूशन्समधील तिच्या कौशल्यासाठी आणि बीएमडब्ल्यू तसेच ऑडीसारख्या नामांकित जागतिक ओईएमना हाय-टेक एलईडी आणि लेझर हेडलाइट्स पुरवण्यासाठी ओळखली जाते. एलजीच्या इलेक्ट्रॉनिक्समधील कौशल्याच्या बळावर झेडकेडब्ल्यूने ऑटोनॉमस ड्रायव्हिंगच्या ट्रेंडनुसार डिजिटल आणि मॅट्रिक्स लाइटिंग सोल्यूशन्समध्येही प्रगती केली आहे.

 

31 ऑक्टोबर, 2025 पर्यंतकंपनीने 40हून अधिक ओईएमना सेवा दिली आहे आणि एलईडी तसेच ईव्ही-केंद्रित प्रकाश उपायांसह 830पेक्षा जास्त एसकेयूंचा पोर्टफोलिओ सादर केला होता.

 

पीव्हीसीव्हीईव्ही, 3-व्हीलरओआर आणि आफ्टरमार्केट विभागांमध्ये ही कंपनी उत्पादने पुरवते. तिच्या ग्राहकांमध्ये टाटा मोटर्स लिमिटेडस्टेलेंटिस ऑटोमोबाईल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडजेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडडेमलर इंडिया कमर्शियल व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडव्हीई कमर्शियल व्हेइकल्स लिमिटेडइसुझू मोटर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडपियाजिओ व्हेइकल्स प्रायव्हेट लिमिटेडथाई स्वीडिश असेंब्ली कंपनी लिमिटेडजेव्ही उझचासिस एलएलसीजेसीबी इंडिया लिमिटेडसेमे ड्युट्झ-फहर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडएस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडआणि जेएससी उझऑटो मोटर्स यांचा समावेश आहे.

 

निओलाइट ZKW चे हरियाणातील बहादूरगड (युनिट 1 आणि 2) आणि महाराष्ट्रातील पुणे (युनिट 3) येथे तीन अंशतः व्हर्टिकली एकात्मिकसेमी ऑटोमेटेड उत्पादन युनिट्स आहेत. भारतातील ऑटोमोटिव्ह लाइटिंग उत्पादने आणि पार्ट्सच्या काही प्रमुख निर्यातदारांमध्ये या कंपनीचा समावेश होतो. जी सीआयएस प्रदेशउत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील 50 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते.

 

31 ऑक्टोबर 2025 पर्यंत कंपनीकडे ऑटोमोटिव्ह लाइटिंग विभागातील प्रकल्प-आधारित कामे आणि टूलिंग यांचा समावेश असलेली ₹1,718.76 दशलक्षची ऑर्डर बूक होती. 31 मार्च, 2027 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षापर्यंत ती पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

 

देशांतर्गत आणि निर्यात बाजारपेठांमधील विविध महसूल स्रोतांच्या आधारावर कंपनीने मजबूत आणि अधिक चांगली आर्थिक कामगिरी दर्शवली आहे. 30 जून, 2025 रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठीकामकाजातून मिळणारा महसूल ₹1,248.55 दशलक्ष होताज्यामध्ये निर्यातीचा वाटा 55.08% आणि देशांतर्गत विक्रीचा वाटा एकूण महसुलाच्या 44.92% होता. आर्थिक वर्ष 2025 मध्येकामकाजातून मिळणाऱ्या महसुलात वाढ होऊन तो ₹5,120.75 दशलक्षांवर गेला. ज्यामध्ये निर्यातीचे योगदान ₹2,373.51 दशलक्ष (46.35%) एवढे आणि देशांतर्गत महसूल ₹2,747.24 दशलक्ष (53.65%) होता. हे कंपनीच्या वाढत्या जागतिक विस्ताराचे निदर्शक आहे.

 

या कालावधीत नफ्यात लक्षणीय सुधारणा झाली. आर्थिक वर्ष 2023 मधील 37.84% वरून एकूण नफा मार्जिन आर्थिक वर्ष 2025 मध्ये 49.18% पर्यंत गेले. ऑपरेटिंग ईबीआयटीडीएमध्येही वाढ झाली. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ईबीआयटीडीए ₹415.54 दशलक्ष एवढा होता. तो आर्थिक वर्ष 2025मध्ये ₹964.60 दशलक्ष एवढा वाढला. तर ऑपरेटिंग ईबीआयटीडीए मार्जिन 10.25% वरून 18.84% पर्यंत विस्तारले. कारपश्चात नफा (PAT) आर्थिक वर्ष 2023 मध्ये ₹155.85 दशलक्ष एवढा होता. तो आर्थिक वर्ष 2025 मध्ये ₹528.24 दशलक्ष एवढा झाला. ज्यामुळे PAT मार्जिन 10.32% झाले. कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये मजबूत रिटर्न रेशो देखील नोंदवलाज्यात ROE आणि ROCE अनुक्रमे 33.90% आणि 31.12% होतेजे सुधारित भांडवली कार्यक्षमता आणि ऑपरेटिंग लिव्हरेज अधोरेखित करते.

 

आनंद राठी ॲडव्हायझर्स लिमिटेड आणि सिस्टिमॅटिक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs