पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेडची
920 कोटी रु. ची प्राथमिक समभाग विक्री
10
डिसेंबर 2025 पासून होणार सुरू
· प्रत्येकी 2 रु. दर्शनी
मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 154 रुपये ते 162 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित (“Equity
Share”)
·
बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या
बोलीचा दिनांक मंगळवार 09 डिसेंबर 2025 आहे.
·
बोली किमान 92 इक्विटी
शेअर्ससाठी आणि त्यानंतर 92 इक्विटी
शेअर्सच्या पटीत लावता येईल
पार्क मेदी वर्ल्ड लिमिटेड (“कंपनी”)ने इक्विटी शेअरसाठी बुधवार 10 डिसेंबर 2025 पासून प्राथमिक
समभाग विक्री बोली/ऑफर खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. इक्विटी शेअर्सच्या 9,200 दशलक्ष रु. (920 कोटी रु.)
पर्यतच्या एकूण ऑफर साईजमध्ये 7,700 दशलक्ष रु. (770 कोटी रु.) पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि डॉ. अजित गुप्ता (प्रवर्तक विक्री
समभागधारक) यांच्याद्वारे 1,500 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यतची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. (“The Total Offer Size”). प्रमुख गुंतवणूकदाराच्या
बोलीचा दिनांक मंगळवार 09 डिसेंबर 2025 आहे. बोली/ऑफर बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.
प्रति
इक्विटी शेअरसाठी 154 रुपये ते
162 रुपये पर्यंतचा
किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान 92
इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 92 इक्विटी
शेअर्सच्या पटीत लावता येईल. कंपनीने इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर
खालीलप्रमाणे करण्याचा प्रस्ताव दिला आहे: (i) कंपनी आणि
तिच्या उपकंपन्यांनी घेतलेल्या प्रलंबित कर्जाची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड करण्यासाठी; (ii)
उपकंपनी पार्क मेडिसिटी (NCR) द्वारे नवीन
रुग्णालयाच्या विकासासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चासाठी निधी; (iii) आमची कंपनी आणि
आमच्या उपकंपन्या ब्लू हेव्हन्स आणि रतनगिरी यांनी वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी लागणाऱ्या भांडवली
खर्चासाठी निधी; आणि (iv) उर्वरित रक्कम अजून कार्यरत न
झालेल्या इनऑर्गनिक अधिग्रहणांसाठी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी (“ऑब्जेक्ट ऑफ
इश्यू”).
ऑफर फॉर सेल मध्ये प्रवर्तक विक्री भागधारकाकडून 1500.00 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यतच्या 2 रु. दर्शनी मूल्य असलेल्या संख्येतील इक्विटी शेअर्सचा समावेश आहे, नुवामा
वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड, CLSA इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, DAM कॅपिटल ॲडव्हायर्स लिमिटेड आणि इंटेसिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरचे बुक
रनिंग लीड मॅनेजर्स (The “BRLMs”) आहेत.
या रेड हेरिंग
प्रॉस्पेक्टसद्वारे 4 डिसेंबर 2025 (the “RHP”) रोजी सादर केलेले इक्विटी शेअर्स नवी
दिल्लीतील रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरयाणा (the “RoC”) येथे सादर करण्यात आले असून BSE लिमिटेड ("BSE") आणि नॅशनल स्टॉक
एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडवर (“NSE”) सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
Comments
Post a Comment