भारती एअरटेल कंपनीच्या नेतृत्वबदलाची घोषणा
भारती एअरटेल कंपनीच्या नेतृत्वबदलाची घोषणा
शाश्वत शर्मा १ जानेवारीपासून एअरटेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारणार
गोपाळ विठ्ठल यांची कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीलाही संचालक मंडळाची मंजुरी
भारती एअरटेलने सांगितले की, सध्याचे सीईओ असलेले शश्वत शर्मा १ जानेवारी २०२६ पासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
भारतातील दुसऱ्या सर्वात मोठ्या दूरसंचार कंपनीच्या संचालक मंडळाने, भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांची १ जानेवारी २०२६ पासून पाच वर्षांसाठी कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे.
विठ्ठल डिजिटल व तंत्रज्ञानासंबंधीच्या कामकाजांसह विविध निर्णय प्रक्रियेत सहभागी असतील. यात नेटवर्क धोरण, विविध कामकाजांविषयीची खरेदी प्रक्रिया तसेच मानव संसाधन या विविध विभागांच्या कामकाजांचे समन्वय साधणे तसेच या सर्व प्रक्रियेत समूहाची एकात्मता वाढवणे आदी कामकाजांचा समावेश असेल. समूहाची धोरणात्मक दिशा ठरवणे आणि संस्थेला भविष्यातील बदलांसाठी सक्षम तसेच सज्ज करणे यावर त्यांचा विशेष भर देतील. भविष्यकालीन नवकल्पना, तांत्रिक प्रगती आणि दीर्घकालीन वाढ हे सुनिश्चित करण्यासाठी गोपाळ विठ्ठल यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
संचालक मंडळाने मुख्य वित्तीय अधिकारी सौमेन रे यांची समूह मुख्य वित्तीय अधिकारी आणि अखिल गर्ग यांची मुख्य वित्तीय अधिकारी (एअरटेल इंडिया) म्हणून १ जानेवारी २०२६ पासून नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

Comments
Post a Comment