आत्मनिर्भरतेच्या दिशेने' या संकल्पनेअंतर्गत बँक ऑफ बडोदाकडून 'बडोदा किसान पंधरवड्या'च्या ८ व्या आवृत्तीचे आयोजन

 आत्मनिर्भरतेच्या दिशेने' या संकल्पनेअंतर्गत बँक ऑफ बडोदाकडून 'बडोदा किसान पंधरवड्या'च्या ८ व्या आवृत्तीचे आयोजन


मुंबई, 22 डिसेंबर 2025: बँक ऑफ बडोदाच्या मुंबई विभागासोबत नवी मुंबई प्रादेशिक कार्यालयाने 'आत्मनिर्भरतेच्या दिशेने' या संकल्पनेखाली आपला प्रमुख शेतकरी संपर्क उपक्रम – 'बडोदा किसान पंधरवडा’च्या 8 व्या आवृत्तीचे आयोजन केले आहे. बँक ऑफ बडोदा ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक आहे. आर्थिक जागरूकता, सर्वसमावेशकता आणि नाविन्यपूर्णतेद्वारे शेतकरी आणि ग्रामीण समुदायांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदाची 'आत्मनिर्भरतेच्या दिशेने' ही संकल्पना आर्थिक समावेशकता वाढवणे आणि भारतातील शेतकरी समुदायाला अधिक मजबूत पाठबळ देण्यावर केंद्रित आहे. या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 700हून अधिक शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. किशन नारायणराव जावळे, आयएएस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री. लाल सिंग; ग्रामीण आणि कृषी बँकिंग, आरआरबी आणि आरसेटीचे मुख्य महाव्यवस्थापक श्री. राजेश मल्होत्रा; आणि मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक तसेच विभागीय प्रमुख श्री. सुनील कुमार शर्मा यांच्या सन्माननीय उपस्थितीत करण्यात आले. मुंबई विभागीय कार्यालय आणि नवी मुंबई प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांचा यात सक्रिय सहभाग होता.

जिल्हा उद्योग केंद्राचे (डीआयसी) महाव्यवस्थापक श्री. जी.एस. हरल्या, रायगड येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (एम.एस.आर.एल.एम.) प्रकल्प संचालक श्रीमती प्रियदर्शिनी मोरे आणि अपेडाचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. पांडुरंग ए. बामणे, श्री. मनीष कुमार सिन्हा, प्रादेशिक व्यवस्थापक, नवी मुंबई विभाग यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. ग्रामीण विकासासाठी बँकिंग आणि सरकारी संस्थांमधील मजबूत समन्वयावर याद्वारे प्रकाश टाकण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी समापनानंतर बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री. लाल सिंग म्हणाले, “बडोदा किसान पंधरवड्याची आठवी आवृत्ती ही भारताच्या शेतकऱ्यांना सुलभ, विश्वासार्ह आणि अधिकाधिक डिजिटल उपाययोजना पुरवण्याच्या आमच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. आमच्या डिजिटल बीकेसीसी, डिजिटल गोल्ड लोन आणि आमच्या प्रत्यक्ष क्षेत्रीय संपर्क कार्यक्रमांद्वारे, आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी कर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि सक्षम बनवून आमचा सहभाग तसेच पाठिंबा अधिक मजबूत करण्याचे आमचे ध्येय आहे. कृषी समुदायाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची  प्रगती तसेच आत्मनिर्भरतेमध्ये योगदान देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

संस्थात्मक कर्ज, सरकार-समर्थित योजना, डिजिटल बँकिंग उपाय आणि जोखीम कमी करण्याच्या साधनांबद्दल जागरूकता निर्माण करतानाच शेतकरी, बचत गट आणि कृषी-उद्योजकांशी थेट संवाद साधणे हा बँक ऑफ बडोदाचा प्रमुख संपर्क उपक्रम असलेल्या 'किसान पखवाडा'चा उद्देश आहे. आर्थिक समावेशन, औपचारिक कर्जाचा विस्तार, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत कृषी विकासाला चालना देण्यात हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

या उपक्रमाच्या माध्यमातून बँकेच्या प्रमुख डिजिटल सेवांवर प्रकाश टाकण्यात आला. यात डिजिटल बडोदा किसान क्रेडिट कार्ड (जमिनीच्या डिजिटल नोंदींसाठी आरबीआयएचसोबत समाकलित) आणि बँकेच्या डिजिटल कर्ज प्लॅटफॉर्मवरील डिजिटल गोल्ड लोन यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अधिक जलद, सोपी आणि सोयीस्कर बनवण्यासाठी हे उपाय तयार करण्यात आले आहेत. यामुळे बडोदा किसान पंधरवड्याचा एकूणच परिणाम अधिक प्रभावी होतो.

डिजिटल बँकिंग आणि सायबर फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एका पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे डिजिटल वित्तीय सेवांचा ग्रामीण भागात सुरक्षित अवलंब करण्याबाबत बँकेच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळाली. अशा उपक्रमांमुळे शेतकरी समुदायासोबतचा संवाद अधिक दृढ होईल आणि सर्वसमावेशक वाढ तसेच कृषी समृद्धीमध्ये योगदान वाढेल, असा बँक ऑफ बडोदाला विश्वास आहे.

बँक ऑफ बडोदाने कृषी क्षेत्राला दिलेले कर्ज 30 सप्टेंबर 2025पर्यंत ₹1,69,703 कोटींवर पोहोचले आहे. यात वार्षिक 17.4% वाढ नोंदवली जाते आहे. ग्रामीण भागातील मजबूत स्थान आणि कृषी तसेच डिजिटल बँकिंग उपायांच्या सर्वसमावेशक उपयांसह, ही बँक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आणि भारताच्या कृषी परिसंस्थेला बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आहे.

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs