दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेतर्गत ; ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य
दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेतर्गत ; ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य
गणेशोत्सव रिल्स स्पर्धेच्या विजेतांचा गौरव; १२०० हून अधिक स्पर्धेकांचा सहभाग
खंजिरीचे बोल चित्रपटातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची जीवनगाथा रुपेरी पडद्यावर; पोस्टरचे अनावरण
सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि
सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती
मुंबई, दि. ६ : दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेतर्गत ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसाह्य सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते शुक्रवारी वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित खंजिराचे बोल या चित्रपटाच्या पोस्टरचेही अनावरण करण्यात आले. तसेच गणेशोत्सव रिल्स स्पर्धेच्या विजेतांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्रनाट्यमंदिरात हा सोहळा संपन्न झाला.
या वेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य लेखा वित्तधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, चित्रपट सृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ , पुरस्कार विजेते उपस्थित होते.
गणेशोत्सवाविषयी रिल स्पर्धेचा निकाल
राज्यस्तर : प्रथम - स्वप्निल लांडे, द्वितीय - अभिनव कुरणे, तृतीय - योगेश शिंदे, उत्तेजनार्थ - आशिष त्रिभुवन, अभिषेक सपकाळ.
महाराष्ट्र व भारताबाहेरील गट : प्रोत्साहनपर पारितोषिक - सुमीत कुटवाल, दक्षता जवंजळ, रोहन शेटकर, राजकुमार सोनटक्के.
विभागीय स्तर : कोकण विभाग
प्रथम - मनिषा करंजे, द्वितीय - रेश्मा रनवरे, तृतीय - अल्विन पाटील, उत्तेजनार्थ - दर्शन सावंत, अंकिता नेवगी.
पुणे : प्रथम - चंद्रकांत मेथे, द्वितीय - वैजनाथ चौगुले, तृतीय - सचिन कांबळे, उत्तेजनार्थ - नयन भाष्टे, सचिन आंबोले.
नाशिक : प्रथम - प्रथमेश जाधव, द्वितीय - सौरभ भारस्कर, तृतीय - ऋषिकेश भगत, उत्तेजनार्थ : प्रसाद पवार.
अमरावती : प्रथम - करण शिंदे, द्वितीय - संतोष गायकवाड, तृतीय - अनिकेत भोजने, उत्तेजनार्थ - गणेश बानाईत.
छत्रपती संभाजीनगर : प्रथम - सिद्धेश्वर थोरात, द्वितीय - राकेश वाणी, तृतीय - सिद्धी देसाई, उत्तेजनार्थ - डॉ. अतुल दांडेकर, वैभव मळभागे.
नागपूर : प्रथम - तुषार घारपेंडे, द्वितीय - निरज झगडू, तृतीय - रजनीश खोब्रागडे, उत्तेजनार्थ - शिवम गजापुरे, निशांत सुरतकर.
या चित्रपटांना मिळाले अर्थसाह्य
या ५० चित्रपटांत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित ४, राज्य पुरस्काराने गौरवलेले ३, 'अ' दर्जा प्राप्त १० चित्रपट, 'ब' दर्जा प्राप्त २३ आणि 'क' दर्जा प्राप्त १० चित्रपटांचा समावेश आहे.
पाणी, सुमी, गोष्ट एका पैठणीची, नाळ - भाग २, गोदावरी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, भेरा, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर, सत्यशोधक, पावनखिंड, विषय हार्ड, लग्नकल्लोळ, भिकारी, लाईफ लाईन, नवरदेव बीएससी अॅग्री, रघुवीर, मदार, नेबर्स, बिटर स्वीट कडुगोड, आता वेळ झाली, मोऱ्या, डाक, रांगडा, शिवरायाचा छावा, उन्मत, छापा काटा, कासरा, छत्रपती संभाजी, श्री देवी प्रसन्न, ओवा, पाणीपुरी जित्राब, मिरांडा हाऊस, गिन्नाड, ऊन सावली, सोंग्या, अंकुश, सर्कीट, गडकरी, राख, महाराजा, धोंड्या, कधी आंबट कधी गोड, बनी, फकाट, सुर लागू दे, गोप्या, भागीरथी मिसिंग, डिअर लव्ह, जन्मऋण.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या जीवनावर आधारित खंजिराचे बोल चित्रपट पोस्टरचे अनावरण
शासन विविध क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चरित्रपट निर्मितीची योजना राबवत आहे. याच योजनेंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. खंजिरीचे बोल असे चित्रपटाचे नाव असून दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन असून, लेखक श्रीकांत बोजेवार आहेत. चित्रपटाची निर्मिती सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने केली आहे.

Comments
Post a Comment