एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सतर्फे स्वत:च्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण
एजेस
फेडरल लाइफ इन्शुरन्सतर्फे स्वत:च्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण
- नवीन लोगोमध्ये संरक्षण आणि
मार्गदर्शन दर्शविणाऱ्या दोन एकीकृत कमानी आहेत
- ‘प्रत्येक वचन शक्य - प्रॉमिस
मेड पॉसिबल’ हे ब्रँडचे वचन शक्यता प्रत्यक्षात उतरविण्याबद्दल कंपनीची
बांधिलकी दर्शवते
मुंबई, 9 डिसेंबर 2025 – एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सने आज
आपल्या परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून आपली नवीन ब्रँड ओळख
सुरू करण्याची घोषणा केली. एजेस
समूहाच्या 200 वर्षांच्या जागतिक वारशामध्ये
आणि फेडरल बँकेच्या शतकभराच्या जुन्या विश्वासात रुजलेली ही नवीन ओळख विमा सुलभ
करण्याची, सखोल भावनिक संबंध निर्माण
करण्याची आणि देशभरात आर्थिक संरक्षण अधिक सुलभ करण्याची कंपनीची महत्वाकांक्षा
प्रतिबिंबित करते.
एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक
(मॅनेजिंग डायरेक्टर) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ज्यूड गोम्स यांनी ब्रँड
अॅम्बेसेडर आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत नवीन ब्रँडचे
अनावरण केले.
कंपनीचा नवीन लोगो नवीन सुरुवात
आणि नूतन आशेचे प्रतिनिधित्व करतो, प्रत्येक अर्थपूर्ण प्रवास
स्पष्टता तसेच आशावादाने सुरू होतो या विश्वासाला प्रतिध्वनित करतो. जीवनाच्या
प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांना पाठिंबा देण्याच्या कंपनीच्या उद्देशाला अधोरेखित
करणारे, संरक्षणाचे प्रतीक असलेले
दोन एकीकृत कमानी (आर्क) लोगोमध्ये आहेत.
एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सचे
व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)
ज्यूड गोम्स
म्हणाले, “ही नवीन
ओळख आपण कोण आहोत आणि भारतीय लोकांसाठी आपण शक्यतांचे नेमके प्रवर्तक होण्याचा
प्रयत्न करतो हे प्रतिबिंबित करते. 'अल्बा' काळजी
आणि आशावादाचे प्रतीक आहे, तर आमचा ब्रँड 'प्रत्येक वचन
शक्य' हे प्रत्येक आश्वासनाचे
शक्यतेत रुपांतर करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. हा
मापदंड भारताच्या विकसित होत असलेल्या आर्थिक संरक्षणाच्या गरजा पूर्ण करण्याच्या
आणि लाखो लोकांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या आमच्या आकांक्षेला गती देतो.”
ही नवीन ओळख अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा
आर्थिक संरक्षणाबाबत वाढती जागरूकता, जलद डिजिटल स्वीकार आणि
एमएसएमई आणि तरुण बचतकर्त्यांसह उदयोन्मुख ग्राहक विभागांकडून वाढती मागणी यामुळे
भारतीय जीवन विमा उद्योगात लक्षणीय परिवर्तन होत आहे. या
पायाभरणीसह, एजेस फेडरल मोठ्या
प्रमाणावर अभेद्य राहिलेल्या बाजारपेठेत विश्वास, प्रवेश
आणि नवनिर्मितीसाठी उत्प्रेरक होण्यासाठी तयार आहे.
.jpg)
Comments
Post a Comment