प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची 'शूट अ शॉट' लघुपट कार्यशाळा
प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची 'शूट अ शॉट' लघुपट कार्यशाळा
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा उपक्रम
मुंबई, दि. २२: सांस्कृतिक कार्य विभागाचे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची चार दिवसांची 'शूट अ शॉट' लघुपट कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा दिनांक २९ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते ५ यावेळेत गोरेगाव चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोदणी आणि अधिक तपशीलासाठी 8600918147,9028192475,9167677801 संपर्क करावा.
Comments
Post a Comment